वंदे मातरमचे जनक – बंकिमचंद्र


वंदे मातरमचे जनक – बंकिमचंद्र

 

वंदे मातरम्चे जनक – बंकिमचंद्र

Photo from Google Images

रोज सकाळी रेडिओवर कार्यक्रम सुरू होताना राष्ट्रगीत लागते. कोणते ठाऊक आहे? 'वंदे मातरम्'. प्रभातीच्या प्रसन्न वातावरणात आपल्या मातृभूमीला वंदन करणारे गोड स्वरातले हे गीत ऐकायला खूपच चांगले वाटते. पण मित्रांनो, अतिशय चांगल्या अर्थपूर्ण शब्दात आपल्या भारतमातेचे हे वर्णन कोणी केले हे ठाऊक आहे का? नाही ना..... हं, काही जणांना माहिती असेलही. तर हे गीत लिहिणाऱ्या गीतकाराबद्दल आज मी बोलणार आहे.

 

'वंदे मातरम्' म्हटले की एकदम एक प्रकारची स्फूर्ती येते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तर हा वेदमंत्राहून श्रेष्ठत्व लाभलेला - वंदनीय ठरलेला मंत्र होता. या 'वंदे मातरम्' च्या उच्चाराने इंग्रज अधिकारी भयभीत होत, चिडत असत आणि या 'वंदे मातरम्ने' सारा देश जागृत झाला. अगदी तुमच्यासारख्या लहान वयात शिरीषकुमारसारखे विद्यार्थी 'वंदे मातरम्' म्हणत देशासाठी हुतात्मा झाले.

 

- अशा या पवित्र मंत्राचे - राष्ट्रगीताचे जनक म्हणून 'बंकिमचंद्र' यांचे नाव घेतात. या बंकिमचंद्रांचा जन्म २७ जून १८३८ रोजी झाला. बंगाल प्रांतात कंतलपाडा हे त्यांचं जन्मगाव. लहानपणापासून बंकिम अतिशय हुशार होता. त्याचे वडील यादवचंद्र हे डेप्युटी कलेक्टर होते, तर आई अतिशय प्रेमळ, धार्मिक, पतिव्रता होती.

 

खेळापेक्षा वाचनाची आवड जास्त. त्यातही संस्कृत तर अधिक आवडीचे. संस्कृतमधील भाषासौंदर्याने बंकिमचे मन प्रभावित झाले. त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी वकिलीची परीक्षाही दिली होती. सरकारी क्षेत्रात अधिकारपदावर त्यांनी नोकरी केली, पण ते इंग्रज अधिकाऱ्यांना कधी घाबरले नाहीत. त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. शेवटी सरकारी खात्यात सतत संघर्ष होत राहिल्याने वाचन लेखनाचे निमित्त करून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. काही काळानंतर १८९४ मध्ये त्यांचे निधन झाले.

 

बंगालीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी १५ कादंबऱ्या लिहिल्या. बंगदर्शन' नावाचे मासिकही चालवले. 'आनंदमठ' ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. याच कादंबरीत 'वंदेमातरम्' हे गीत आहे. भारतमातेचे यथार्थ वर्णन करणारे हे संपूर्ण गीत अतिशय प्रेरणादायक आहे. आपण सध्या त्यातले अर्धेच म्हणतो. दुर्दैवाने काही स्वार्थी लोकांच्या आग्रहामुळे आपल्या देशाचे जसे तुकडे झाले तसेच या गीताचाही पुढचा भाग कापला गेला. ते संपूर्ण गीत पाठ करून त्याच्या प्रेरणेने आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यादवचंद्र हे डेप्युटी कलेक्टर होते, तर आई अतिशय प्रेमळ, धार्मिक, पतिव्रता होती.

 

खेळापेक्षा वाचनाची आवड जास्त. त्यातही संस्कृत तर अधिक आवडीचे. संस्कृतमधील भाषासौंदर्याने बंकिमचे मन प्रभावित झाले. त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी वकिलीची परीक्षाही दिली होती. सरकारी क्षेत्रात अधिकारपदावर त्यांनी नोकरी केली, पण ते इंग्रज अधिकाऱ्यांना कधी घाबरले नाहीत. त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. शेवटी सरकारी खात्यात सतत संघर्ष होत राहिल्याने वाचन लेखनाचे निमित्त करून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. काही काळानंतर १८९४ मध्ये त्यांचे निधन झाले.

 

बंगालीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी १५ कादंबऱ्या लिहिल्या. बंगदर्शन' नावाचे मासिकही चालवले. 'आनंदमठ' ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. याच कादंबरीत 'वंदेमातरम्' हे गीत आहे. भारतमातेचे यथार्थ वर्णन करणारे हे संपूर्ण गीत अतिशय प्रेरणादायक आहे. आपण सध्या त्यातले अर्धेच म्हणतो. दुर्दैवाने काही स्वार्थी लोकांच्या आग्रहामुळे आपल्या देशाचे जसे तुकडे झाले तसेच या गीताचाही पुढचा भाग कापला गेला. ते संपूर्ण गीत पाठ करून त्याच्या प्रेरणेने आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

 

Post a Comment

0 Comments