मुलांचे लाडके साने गुरुजी

 

मुलांचे लाडके साने गुरुजी

 

मुलांचे लाडके साने गुरुजी

Photo from Google Images

आज आपण साने गुरुजींची माहिती घेणार आहोत. तुम्ही 'श्यामची आई' या पुस्तकाचं नाव ऐकलं असेल. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं तेच हे साने गुरुजी. यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म कोकणात पालगड या दापोली तालुक्यातील गावी झाला. तो दिवस होता २४ डिसेंबर १८९९ चा. __मुलांनो, साने गुरुजी हे अतिशय गरीब परिस्थितीत वाढले. त्यांनी एम. . पर्यंतचे शिक्षण स्वावलंबनाने पूर्ण केले. पुढे काही दिवस अमळनेर येथे एका हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी केली. पण पुढे १९३० पासून त्यांनी आपले सारे आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. ते उत्तम वक्ते होते. अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास होता.

 

साने गुरुजींचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. ते आपल्या आईवर खूप प्रेम करीत. आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी लिहिलेले 'श्यामची आई' हे पुस्तक खूपच गाजले. त्यावर चित्रपटही निघाला. त्यांचासुंदर पत्रे' हा पत्रसंग्रह तर मुलांवर चांगले संस्कार करणारा आहे. तो मुलांनी अवश्य वाचावा.

 

साने गुरुजी अस्पृश्यतेच्या विरुध्द लढले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन कारावास भोगला. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. म्हणून तर साने गुरुजींचे नाव आजही सर्वजण घेतात. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!

 

 

Post a Comment

0 Comments