पू. विनोबा भावे

 

पू. विनोबा भावे

 

पू. विनोबा भावे

Photo from Google Images

भगवद्गीतेची माहिती अनेकांना आहे, पण ही गीता तर संस्कृतमध्ये. मी ती वाचावी कशी, पाठ कशी करावी हा प्रश्नच. मग समजणे तर दूरच अशी सामान्य जनांची स्थिती. आणि म्हणून विनोबांची 'गीताई' सर्वतोमुखी झाली.

या विनोबांचे मूळ गाव तसे सातारा जिल्ह्यातील वाई. पण वर्धा येथे त्यांनी आश्रम स्थापन केला होता.

 

विनोबा भावे हे राष्ट्रीय संत होते. . गांधीजींच्या विचारसरणीवर त्यांची श्रध्दा होती. ग्रामीण विकासाचे त्यांचे स्वप्न होते. आर्थिक सामाजिक समता या देशात यावी यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले.

 

विनोबाजी हे स्वातंत्र्यलढ्यातील एक ज्येष्ठ नेते होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वत:ला पक्षीय राजकारणापासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले. जीवनातील उच्च नैतिक मूल्यांचे पालन त्यांनी काटेकोरपणे केले. त्यांना संस्कृत, तामिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली या स्वदेशी भाषांबरोबरच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, अरेबिक अशा परकीय भाषाही अवगत होत्या.

 

अध्यात्माची लहानपणापासून त्यांना आवड होती. वेदवेदांग, छंदशास्त्र यावर त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. बुध्दी चौकस होती आणि ते साक्षात कर्मयोगी होते.

 

भूदान, ग्रामदान ही चळवळ हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. गीताई, गीतेवरील प्रवचने, संतवाणी, उपनिषदांवरील भाष्य यामुळे त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील. १५ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या थोर महात्म्यास माझे विनम्र अभिवादन!

 

Post a Comment

0 Comments