मुलांचे लाडके चाचा नेहरू

 

मुलांचे लाडके चाचा नेहरू

 

मुलांचे लाडके चाचा नेहरू

Photo from Google Images

बालदिन म्हणजे आम्हा मुलांचा दिवस. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांचा जन्मदिवस. १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन. त्यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू नेहरूंचे वडील प्रसिध्द वकील होते. ते खूप श्रीमंत होते. जवाहर एखाद्या राजकुमारासारखा राहात असे. __ जवाहरचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले पुढचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. पुढे उच्च शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. ते बॅरिस्टर होऊन परतले.

 

त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे विचार होते. राजकारण करावेसे वाटत होते. त्यामुळे त्यांनी वकिलीचा व्यवसाय फार काळ केला नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोखले, टिळक, गांधी यांच्या प्रभावामुळे ते भारावून गेले. ते स्वातंत्र्य चळवळीत जोमाने काम करू लागले. ते फक्त चार तासच झोप घेत. घरात खूप कमी वेळ थांबत. त्यांच्या देशभक्तीमुळे इंग्रजांनी त्यांना अनेकदा शिक्षा केली, पण नेहरूंनी आपले कार्य थांबवले नाही. पुढे आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी मिळविला.

           

भारताचे महामंत्री म्हणून त्यांनी १७ वर्षे काम पाहिले. आपल्या देशाची औद्योगिक तसेच वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने त्यांनी खूप परिश्रम घेतले. पं. नेहरू हे शांतताप्रिय होते. जगात सर्वत्र त्यांना मान होता. 'शांतिदूत' म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात ते ओळखले जात होते. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिल्यामुळे भारताची अंतर्गत सर्व व्यवस्था नव्याने उभी करायची होती, पण नेहरूंनी हे काम यशस्वीपणे केले.

 

नेहरू उत्तम लेखक होते. त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजले. 'डिसकव्हरी ऑफ इंडिया ' हे त्यांचे पुस्तकही खूप माहितीपूर्ण आहे. नेहरू मुलांवर खूप प्रेम करीत. ते मुलांचे लाडके 'चाचा' होते. म्हणूनच त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या थोर स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!

 

 

Post a Comment

0 Comments