संभाषण कौशल्य व
यश
संभाषण
प्रक्रिया :
१)
विचार
:
आपण इतरांना
काय बोलणार आहे,
संदेश कोणता देणार
आहोत याबाबत आपले
विचार स्पष्ट असावेत.
२)
मांडणी
:
·
आपले
विचार मांडण्यासाठी शब्दांची
उचित निवड करावी.
आपण कोणती वाक्ये
बोलू यावर विचार
करावा. आपले विचार
एका साखळीप्रमाणे आहेत
का?
·
त्यातून
काही सार्थक संदेश
तयार होतो का?
·
हे
पाहावे. मांडणीत आपली
भाषा इतरांना समजेल
अशी आहे का?
·
मग
तुम्ही पत्राद्वारे किंवा
टेलिफोनद्वारे संवाद साधा.
३)
प्रसारण
:
आपले विचार,
मांडणी, माहिती इतरांसाठी
प्रसारित करण्यास तयार झाल्यानंतर
माध्यम ठरवावे. आपण
समोरासमोर संभाषण करणार
आहात का, दूरध्वनीद्वारे
का पत्राद्वारे, आपणासाठी
उत्कृष्ट माध्यम परिस्थितीनुसार
काय असेल ते निवडून त्याचा
वापर करावा.
४)
स्वीकार,
समज, पोचपावती व
कृती :
आपली माहिती
इतरांकडे पोचल्यावर ती त्यांना
व्यवस्थितरीत्या समजली आहे
का? हे पडताळून
पाहावे. त्यांना ती
समजली असेल तर त्यावर कृतीस
सुरुवात होईल.
संस्थांतील संभाषण :
आधागिक
संस्था, व्यापारी संस्था
यांच्यात होणारे संभाषण
खालील प्रकारचे असते.
1. चक्र प्रक्रिया
:
एका वर्तुळाच्या
केंद्राप्रमाणे एका ठिकाणी
सत्ता एकवटलेली असन
बहतांश वेळी संदेश
तेथून प्रस्थापित होतात.
ती आदेशात्मक व
सल्यान स्वरूपात असतात.
येथेही दुहेरी संभाषण
होते. ही प्रक्रिया
लहान संस्थांमध्ये वापरतात.
2.
साखळी
प्रक्रिया :
साखळी प्रक्रियेतील
संभाषण हे एका सरळ रेषेत
जाणारे संभाषण असू
शकते. यामध्ये एका
स्तरावरून दुसऱ्या स्तरावर संदेश
जातात. अशा प्रकारच्या
संभाषणामुळे शिस्तीचा प्रत्यय येतो.
3.
जाळे
प्रक्रिया :
यामध्ये सर्व व्यक्ती
एकमेकांशी मुक्तपणे संभाषण करू
शकतात. त्यामुळे या
प्रक्रियेत संभाषण, संदेश उत्कृष्टपणे
समजला जाऊ शकतो
व त्यावर कृतीही
लवकर होते. एकंदरीत
त्वरित निकालांसाठी ही
संभाषण प्रक्रिया वापरण्यात
येते. २१ व्या शतकातील बहुतेक औद्योगिक
संस्था, तांत्रिक संस्था
हीच प्रक्रिया वापरून
विचारांना जास्तीत जास्त मुक्तपणे
संचारू देतात. आपणासाठी
हे महत्त्वाचे आहे
की, कोणत्याही वातावरणात वावरताना
आपले विचार, भावना
इतर लोकाना सन
व त्यांच्याही भावना,
विचार आपल्याला समजून
आपण आपली कामे, उद्दिष्टे साध्य करू
अशा प्रकारे आपण
इतरांशी संभाषण करावे.
सांकेतिक भाषेकडे लक्ष द्या :
आपण संभाषण
करीत असताना आपल्या
चेहऱ्यावरून, हातांच्या हालचालीवरून व
इतर हावभाव यांच्यावरून
आपल्या मनातील भावना
इतरांना समजतात. इतरांच्याही
भावना आपल्याला याद्वारे
समजतात. तेव्हा बोलताना
चेहरा प्रसन्न ठेवा.
स्मितहास्य असू द्या.
तुम्हाला कधी राग
आलाच तर तो चेहऱ्याद्वारे प्रकट करू
नका. चिंता, द्वेष,
उत्सुकता या चटकन
लक्षात येतात. इतरांच्या
हावभावातून नेमकी कोणती
भावना प्रकट होत
आहे हे बघा. नैराश्य, आत्मविश्वास, आनंद,
नियंत्रण, सहकार्य, सहानुभूती, कनवाळा,
समज, कंटाळा, पश्चात्ताप,
निवांतता, बेफिकीरपणा, आळस इ. अनेक भावना
आपण इतरांच्या चेहऱ्यावरून,
त्यांच्या हावभावावरून ओळखू शकतो.
कधी कधी व्यक्ती
आपल्याला भावनाशून्यही आढळून येतात.
चेहऱ्यावरचे हास्य, प्रसन्नता,
कपाळावरच्या आठ्या, मुखाची
हालचाल, नाकावरचा तणाव,
भुवयांची चरचर, डोळ्यातील
शांत भाव आपण बारकाईने निरीक्षण केल्यास
इतरांच्या भावना समजण्यास
आपणास मदत होईल.
तसेच त्यांची बसण्याची
पद्धत, चालण्याची पद्धत,
हस्तांदोलनाची पद्धत याने
ती व्यक्ती नेमकी
कशी आहे त्याचा
प्रत्यय तुम्हाला येतो.
आपण संभाषण करीत
असताना आपल्या बोलण्याचा
त्यांच्यावर काय परिणाम
झाला आहे हे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या
शारीरिक संकेतभाषेवरून आपल्याला
कळून येते. ते
निराश आहेत की उत्साही आहेत, ते
कंटाळले आहेत की अजून त्यांना
काहीच समजलेले नाही,
त्यांना काय हवे हेदेखील तुम्ही सांगू
शकता. तेव्हा या
शारीरिक संकेतांना ओळखण्यास
शिका, याचा तुम्हाला
संभाषणात फायदा होईल.
तक्रार करताना :
१)
तक्रार फक्त त्या
व्यक्तीविरुद्ध करा जी
व्यक्ती फक्त तुमचे
नुकसान करीत आहे.
२)
तक्रार चारचौघात करू
नये. त्या व्यक्तीस
एकांतात करावी.
३)
ज्या व्यक्तीबाबत तक्रार
आहे त्याची तुलना
इतरांशी करू नये.
अमूक व्यक्ती किती
चांगली आहे व तुम्ही असे,
असे म्हणू नये.
४)
शक्य तितक्या लवकर
तक्रार करावी.
५) एकच मुद्दा,
गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नये.
६) दुसऱ्या व्यक्तीकडून चुकांच्या कबुलीची अपेक्षा करू नये.
७) आपली तक्रार आपल्या वाणीनेच करा, चेहऱ्यावरच्या भावाने करू नये
८) एका वेळी एकच तक्रार करा.
९) तक्रार केल्यावर त्याबद्दल माफी मागू नका.
१०) इतर व्यक्ती तुम्हाला पटत नाही, अशी गोष्ट करीत असेल तर तक्रार करण्यापेक्षा त्याला स्पष्टपणे थांबण्यास सांगा.
तक्रार ऐकताना :
१) आपल्याविरुद्ध एखादी तक्रार असेल तर ती शांत चित्ताने ऐकून घ्यावी.
२) कोणतेही कारण देण्याची काहीही गरज नाही.
३) इतरांच्या डोळ्यात डोळे घालून समर्थपणे तक्रार ऐकावी.
४) इतरांच्या चुका शोधू नये.
५) विषय बदलण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नये.
६) इतरांची तक्रार समजली आहे, असे सांगून तुम्ही पुढे सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल, असे आश्वासन द्यावे.
७) तक्रारींचा आपणाला काय फायदा होतो याकडे लक्ष द्या. आपण आपणात काय सुधारणा घडवून आणू शकतो हे पाहा.
संवाद, संभाषण कशासाठी?
संभाषण हे माणसाच्या गरजा भागवण्यासाठी आहे. आपल्याला काय हवं आहे, याची माहिती आपण संभाषणाने दुसऱ्याला देतो. संभाषण हे सबंध हितकर बनविण्यास मदत करतात. संभाषण माहिती समजण्यासही मदत करते. संभाषणामुळे चांगल्यात व वाईटात फरक करता येतो. संवादामुळे संकल्पनाना दिशा देता येते.
संवाद संभाषणासाठी काय लागते?
संवाद साधारा (प्रेषक) –
संवाद कोणाला साधायचा? तुम्हाला संवाद साधायचा वा संभाषण करायचे असेल तर तुम्ही प्रेषक असणार.
संभाषण ऐकणारा, संवाद करणारा (प्रति) –
तुम्ही दिलेली माहिती काणापर पोचली, कुणी ती ऐकली किंवा कुणाला त्याबाबत माहिती मिळाली, ही व्यक्ती, जी तुम्ही दिलेली माहिती मिळवते ती 'रिसिव्हर' किंवा संभाषण ऐकणारी असते.
माहिती, समाचार –
तुम्ही एकमेकांशी संवादाद्वारे माहितीचा प्रसार करता. 'प्रेषक' हा 'प्रति' ला माहिती देतो."
माध्यम –
तुम्ही माहिती ही कोणत्या माध्यमाने देणार आहात, हे माध्यम महत्त्वाचे असते, मग तुम्ही माहिती मौखिक रूपाने (बोलून), पत्राद्वारे, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणीने, ई-मेलने देत आहात, तर या साधनांचा, माध्यमांचा उपयोग करणे माहीत असणे आवश्यक आहे.
संभाषणाने माणसाची बौद्धिक पातळी चटकन लक्षात येते. तेव्हा कौशल्यपूर्वक संवाद कसा साधावा, हे यश मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
संवादाचे प्रकार स्व-संभाषण –
तुम्ही तुमच्यात उत्पन्न होणाऱ्या विचारांपासून तुमच्याशिवाय जो संवाद साधता तो आहे स्व-संवाद, मग तुम्ही चिंता, चिंतन, स्वप्न, भक्ती, मनन याद्वारे स्व-संवाद साधता. स्व-संवादाची मुख्य साधने कान व डोळे आहेत. - सामान्य चर्चा व संवाद - एकमेकांशी, इतर लोकांशी, एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांशी होणारा संवाद ही सामान्य चर्चा असते. यामध्ये मौखिक, पत्र व दूरध्वनीचा वापर जास्त होतो. आपण साधारणतः या प्रकारचा संवाद जास्त करतो. कारण हा संवाद सरळ असतो, ज्यात संभाषण करणारा व ऐकणारा एकदम जवळ असतात.
संघटित संवाद, संभाषण –
जो संवाद दहा, बारा किंवा त्यापेक्षा कमी लोकांमध्ये किंवा संघटनात्मक साच्यातील लोकांमध्ये होतो, त्याला संघटित संवाद म्हणतात. जसे आपण आपल्या नातेवाईकांशी, आई-बाबांशी संवाद साधतो. त्याला 'घरेलू संवाद' म्हणतो. घर हे एक संघटकच आहे, तसेच मित्र, शेजारी इ. लोकांशी होणारा संवादही संघटितच आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे, येथे होणारा संवाद संघटित स्वरूपात असतो.
जनसंवाद –
एक वक्ता जेव्हा अनेक लोकांशी बोलत असेल त्याला जनसंवाद म्हणावे. नेता, साधू, संत प्रवचन,
भाषण इत्यादी प्रकारात मोडतात. हा संवाद साधारण स्थळांवर होत नाही. याला सार्वजनिक स्थळेच लागतात.
प्रचार व प्रसार –
याला 'मास कम्युनिकेशन' ही म्हणतात.
एका जनसमुदायात तुम्ही एक लाख, दोन लाख व्यक्तींशी संवाद साधू शकता; परंतु जर तुम्हाला करोडो व्यक्तींशी संवाद साधायचा असेल तर? तेव्हा वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही याद्वारे तुम्ही तुमच्या माहितीचा प्रचार व प्रसार करतात.
संवादाची प्रक्रिया –
तुम्हाला संवाद साधायचा असेल तर तुमचा विचार संकल्पना स्पष्ट असली पाहिजे. नेमके काय बोलायचे आहे, काय सांगायचे आहे, ते ठरवावे. माहिती देण्याचे साधन निश्चित करावे. योग्य ठिकाणी योग्य साधन वापरावे. माहिती दिल्यावर, पाठवल्यावर ती व्यवस्थित पोचली का ते पाहावे. माहिती ज्याला, ज्यांना दिली त्यांच्याकडून पुन्हा उत्तरे मिळवावीत. मिळालेल्या माहितीवर काय करावे. संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य कसे वाढवाल?
भाषेवर प्रभुत्व –
संभाषण करताना शक्यतो एकाच भाषेत करावे. अर्थात काही तांत्रिक बाबींसाठी दुसरा शब्द वापरला तरी चालेल; पण एकाच भाषेतला संवाद हा अत्यंत प्रभावी असतो. म्हणजे अर्धे मराठी, अर्धे हिंदी असे बोलू नये.
व्याकरणावर प्रभुत्व –
बोलल्या जाणाऱ्या भाषेचे व्याकरण कसे आहे? त्यात सुधारणा आवश्यक आहे का? हे पाहावे. तुम्ही एक भाषा बोलालही; परंतु ती शुद्ध बोलली तर आणखी प्रभावी ठरेल.
भरगच्च शब्दकोश –
बहुतेक वेळा बोलताना योग्य शब्द सापडत नाही. शब्दाने प्रभाव पडतो. माणसे जुळतातही व तुटतातही, तेव्हा आपला शब्दकोश वाढवा व योग्य वेळी योग्य शब्द वापरा. सुरुवात म्हणून तुम्ही शब्दकोडे सोडवू शकता.
प्रस्तुती –
बोलताना तुम्ही तुमचे म्हणणे कशाप्रकारे प्रस्तुत करतात यावर बारकाईने लक्ष द्या. सरळ, शांत राहा. शब्दांचा उच्चार व्यवस्थित करा. हातवारे योग्य वेळी दाखवा. डोळ्यात डोळे घालून बोला.
आदर ठेवा –
बोलताना तुम्ही समोरील व्यक्तीला योग्य तो आदर द्या. त्याला आपल्या संभाषणातून आपलेसे करा. आपल्यापेक्षा लहानांनाही आदराने वाढवा.
हास्य उत्पन्न करा –
तुमच्या संभाषणाने दुसऱ्या माणसाला कंटाळा येता कामा नये. तेव्हा जमेल तेथे हास्य उत्पन्न करा. यामुळे वातावरण मैत्रीचे होते व प्रसन्नता येते. हास्य उत्पन्न करताना मानवीय दृष्टिकोन ठेवावा. कुणाला त्यामुळे दुःख होऊ नये ही काळजी घ्यावी.
लक्षात ठेवा :
a. उत्तम संवाद साधायचा असेल तर सर्वप्रथम ऐकण्यास शिका. दुसऱ्यांना चांगल्याप्रकारे समजून घेतले तर इतरही आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेतील.
b. जाणारा प्रत्येक क्षण, धनुष्यातून सुटलेला बाण व मुखातून निघालेले शब्द कधीच परत येत नाही, तेव्हा बोलताना आपण कोणते शब्द वापरतो याकडे लक्ष द्या. आपल्या
शब्दांमुळे नुकसान होणार नाही, इतरांना दुःख होणार नाही याची दक्षता घ्यावी.
c. चहा, कॉफीचे सेवन केल्याने जसे झोपता येत नाही, तसेच जर संभाषण चांगले झाले असेल तर माणूस स्वस्थ बसू शकत नाही.
d. आपल्या मुखातून निघणाऱ्या वाईट, खराब शब्दांकडे लक्ष द्या, इतर लोक त्यांना सोन्याचे नाणे उचलल्याप्रमाणे उचलतात.
e. बोलताना सहकारात्मक भाषेत बोलावे. सल्ल्याच्या भाषेत बोलू नये. इतरांना काही शिकवायचेच असेल तर त्यांना विचार करायला शिकवा.
f. भावना स्पष्टपणे व्यक्त करा. तक्रार, कृतज्ञता, अभिवादन,
अभिनंदन, आनंद, दुःख, राग, चिंता इ. स्पष्टपणे व्यक्त करा. याने इतर लोक आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतील.
आपण संवाद का
साधतो?
माणूस हा आपल्या
भावना व्यक्त करण्यासाठी
आपले काम करण्यासाठी
माहिती मिळविण्यासाठी संवाद
साधत असतो, संभाषण
करत असतो. आपल्या
संभाषण कौशल्यावर त्याला
मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे
निर्भर असतो. संवादामळे
संकल्पनांना पोषण मिळते,
माहितीचा प्रसार होतो.
संवाद, संभाषण काय
आहे?
संवाद, संभाषण एक
प्रक्रिया आहे, ज्यामुळे
आपले काम होते.
आपल्याला हव्या असणाऱ्या
गोष्टी घडतात. संवाद
हा विचारयुक्त माहितीचा
प्रसार आहे. संवादासाठी,
संभाषणासाठी माध्यमांचाही उपयोग करता
येतो. संवादामुळे आपल्या
गरजा मागतात.
कार्यबिंदू
१)
तुम्ही
लोकांशी संवाद का
साधता?
२)
तुमचे
संभाषण लोकप्रिय आहे
का?
३)
तुम्ही
नेमकेच, कामाचेच बोलता
का?
४)
तुमची
माहिती इतरांकडे व्यवस्थित
पोचते का?
५)
तुमच्या
संकल्पना स्पष्ट आहे
का?
६)
संभाषणामुळे
तुम्हाला काय हवे
ते साध्य होते
का?
७)
तुम्ही
किती भाषांत संवाद
साधता?
८)
भाषेवर
प्रभुत्व आहे का?
९)
व्याकरण
व शब्दकोश कसे
आहेत?
१०)
तुमची
प्रस्तुती चांगली आहे
का?
११)
तुमच्या
संवादामुळे, संभाषणाने वातावरण कसे
होते?
0 Comments
Thank you for your response. It will help us to improve in the future.