निर्णय कसे घ्यावेत?


निर्णय कसे घ्यावेत?

 

निर्णय कसे घ्यावेत?

Photo by cottonbro from Pexels

तुम्ही आतापर्यंत काही उचित निर्णय अगोदरच घेतलेले आहेत. निर्णय बरोबर, अचूक उचित असला तर नियोजित केलेल्या वेळेचे सार्थक होते. सकारात्मक विचारामुळेच उचित निर्णय तुम्ही घेत असता. परंतु नेमक्या वेळेस अडचणी येतातच, तेव्हा निर्णय कसा घ्यावा' हे शिकलेच पाहिजे. निर्णय काय आहे?

 

निर्णय घेणे म्हणजे समोरील विकल्पातून एखादा विकल्प निवडणे. निर्णय घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुरेपूर लाभ कसा मिळवता येईल याचा सारासार विचार करणे. निर्णय वस्तुस्थिती बघून घेतला जातो. 'समोर किती प्रमाणात धोका आहे?', 'त्यामुळे काय होईल?', 'असे केले तर चालेल का?', 'हे करायला नको', 'हे करायला हवे' हे ओळखणे पर्याय निवडून त्यावर काम करणे म्हणजे निर्णय. निर्णय घेताना....

 

पर्याय कसे ओळखावेत : निर्णय घेताना बऱ्याचदा तडजोड करावी लागते. काही गोष्टी मनासारख्या घडतील, काही घडणार नाहीत. उत्कृष्ट निर्णय फायद्याचे निर्णय घ्यावयाचे असतील तर आपले पर्याय किती कसे आहेत हे ओळखण्यास शिका. बहुतेकदा आपणाला पर्याय सुचत नाही किंवा दोन पर्यायांपैकी एखादा निवडून आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. 'पर्याय मिळत नाही,' असे म्हणणाऱ्यांमध्ये विश्लेषण करण्याची क्षमता कमी असते. पर्याय शोधणे म्हणजे सर्वप्रथम परिस्थितीचे विश्लेषण करणे, तसेच त्यांच्यात कल्पनाशक्तीची कमतरता हे दुसरे कारण असू शकते.

 

परिस्थिती समोर ठेवून कल्पक पर्याय मांडणे एक जिकिरीचे काम आहे. पर्याय निवडताना, मांडताना संपूर्णपणे पर्यायांवर वेगळेपणाने विचार करण्याची गरज आहे. पर्याय मांडताना स्वतःचे दोष काढू नका. आपल्या विचारांना मुक्तपणे संचार करू द्या. मनात येणाऱ्या विचारांना कागदावर मांडण्यास सुरुवात करा. शक्य झाल्यास इतरांची पुरेपूर मदत घ्या.

 

विश्लेषण केल्याने निर्णयाचा गुंता सुटण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो.

 

परिणामांचे मोजमाप कसे कराल? निर्णय घेणे म्हणजे धोका पत्करावा की नाही यावर विचार करणे मुळीच नाही तर कामापुरता धोका पत्करून त्याच्या परिणामांचे मोजमाप करून कामास सुरुवात करणे हेच होय. आपण निवडलेल्या प्रत्येक पर्यायांवर तुम्ही पत्करू शकाल इतका धोका कोणत्या पर्यायात आहे?

 

परिणामांचे मोजमाप करताना धोके कमी कसे करता येतील यावर विचार करा. आपण होणाऱ्या नुकसानीस तयार आहात का? नुकसान होणारच याची शक्यता किती प्रमाणात आहे? परिणामांच्या मोजमापाने नफा-नुकसान ओळखा

एका व्यक्तीला धूम्रपानाच्या व्यसनाबाबत निर्णय घ्यायचा आहे. जर त्याने व्यसन सुरू ठेवले तर तो अनेक आजारांना बळी पडू शकतो. जर व्यसन सोडले तर तो धूम्रपानामुळे होणाऱ्या आजारापासून वाचू शकतो. त्याचा व्यसनात जाणारा पैसाही वाचेल. त्या व्यक्तीस मुखशुद्धीचाही फायदा होईल. कदाचित समाजात त्याचा मानही वाढेल. दुसरीकडे व्यसन सोडल्यामुळे तंबाखू सेवनाची तलफ त्या व्यक्तीस त्रासदायक ठरू शकते. हा धोका त्याने पत्करल्यास तो व्यसन सोडू शकतो. ती तलफ भागवण्यासाठी जर त्याने पर्यायांचा विचार केला तर त्याची ही समस्याही सुटू शकते. कदाचित सुपारी खाऊन चॉकलेटस्, च्युइंगम, सुगंधित इत्यादी वापरून तो त्याच्या या समस्येवर उपाय करू शकतो. त्याने व्यसन वल्यास दमा, खोकला, टी.बी. इत्यादीसाठी तयारी ठेवावी लागेल. यावर चारांसाठी पूरक पैसाही ठेवावा लागेल. येथे धोके वाढलेले आहेत. तेव्हा धूम्रपान करणे हा पर्याय अगदी शेवटच्या क्रमात बसेल.

 

 

निर्णयाची पुनर्पडताळणी :

 

आपण घेतलेल्या निर्णयाची पुनर्पडताळणी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम गरज भासते ती त्या निर्णयाशी निगडित दुसरे निर्णय घेताना. अशा वेळेस एका त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे आपण आपल्या घेतलेल्या निर्णयाकडे पाहावे. याने का कसे हे प्रश्न सुटण्यास दडलेल्या संधी ओळखण्यास मदत होते. तसेच निर्णयाची कालबद्ध पडताळणीही करण्याची गरज असते. विद्यार्थी दर सहा महिन्यास करू शकतो. व्यापारी असेल तर त्रैमासिक वार्षिक पडताळणी करू शकतो. नवीन माहिती मिळाल्यास बदल घडल्यास निर्णयांची पडताळणी जरूर करावी आवश्यकतेनुसार बदल करून घ्यावेत.

 

अचूक विश्लेषण कसे करणार? निर्णय घेताना परिस्थिती समजून घेत पर्यायांचे विश्लेषण करावे लागते. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणे गरजेचे नाही तेव्हा नेमके कोणत्या गोष्टीचे करणे गरजेचे आहे हे ठरवावे. हे विश्लेषण आपण स्वतः इतरांची मदत घेऊन करू शकता. विश्लेषण करताना त्या गोष्टीतून शेवटी काय बाहेर पडते हे पाहावे. विश्लेषण करताना समस्या, परिस्थिती स्पष्टपणे समोर आली पाहिजे. ते करताना अघटित, घडणाऱ्या गोष्टींचाही विचार करावा. विश्लेषण करताना अनिश्चितता कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे हे स्पष्ट असू द्यावे. धोके कोणते, फायदे कोणते, पासाला काय काय त्याग करावा लागेल, त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागणार या बाबींचा विचार करावा. 'असे घडले तर' किंवा 'असे होऊ शकते मा. या प्रश्नांचा विचार नेहमी करावा.

 

समजा में महिना संपत आला आहे आपणाला आपल्या शहरात जोरदार 1 पडल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तेव्हा जर आपण छत्री, पऊन बाहेर पडाल तर पावसात भिजणार नाही म्हणून पावसापासून करणाऱ्या गोष्टींची जमवाजमव सुरू करता. तेथेच हवामान खात्याने का अतिवृष्टी होईल सात ते आठ दिवस संततधार राहील तेव्हा संरक्षण करणाऱ्या गाष्ट सांगितले की अतिवृष्टा आपण घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू मुबलक प्रमाणात ठेवता.

जर हवामान खात्याने सांगितलेच की महिनाभर पाऊस पडेल किंवा दीर्घकाळ मसळधार पाऊस होऊन शहराचे नुकसान होईल तेव्हा आपण काही दिवसांची सुटी घेऊन दुसऱ्या शहरात जाल. हे निर्णय घेताना आपण परिस्थिती पूर्णपणे समजन घेतलेली आहे. परिस्थितीनुसार पर्यायही आपणाकडे आहेत त्यांचे विश्लेषण केल्यामुळेच आपण ठामपणे म्हणू शकता की आपणाला छत्रीची गरज आहे, का घरी बसणे सोयिस्कर आहे, का दुसऱ्या गावी जाणे.

 

 

निर्णय घेताना :

 

1.    जो पर्याय प्रभावी आहे जास्त काळ टिकून राहील, अशा पर्यायांवर विचार करावा.

2.    निर्णय कोण घेणार?

3.    जबाबदारी कोण स्वीकारणार?

4.    कोणाची मदत घेणार? निर्णयाचा परिणाम कोणाकोणावर होईल हे स्पष्ट करावे.

5.    विवेकी, भावनात्मक उन्नतीबाबत विचार जरूर करावा. मला यातून काय मिळेल?

6.    या निर्णयाचा माझ्या आयुष्यावर कोणता कसा परिणाम होईल?

7.    यासाठी लागणारी किंमत काय?

8.    यातून फायदे कोणते?

9.    काम खरंच होणार आहे का?

10.  वेळ किती लागेल?

11.  मला पुढे नेण्यासाठी पूरक असे वातावरण तयार होईल का?

12.  ह्या प्रश्नांचा विचार करावा. समस्या असतील तर त्या समस्येचे मूळ शोधा. ती उत्पन्न कशी का झाली ते बघा.

13.  'आता पर्यायच नाही' ही परिस्थिती टाळा. पर्याय शोधा. अनुभवांवरून शिक्षण घ्या. आपल्याही इतरांच्याही.

14.  माहितीचे विश्लेषण व्यवस्थित करा. मुद्याच्या गोष्टी नीट ओळखा. बदल हा होणारच असे गृहीत धरून पुढे चालत राहा.

15.  इतरांना आपल्या निर्णयात भागीदार बनवा. त्यांचा फायदा का आहे है त्यांना पटवून द्या.

16.  कोणती कामे त्वरित करावयाची आहेत कोणती महत्त्वाची आहेत याची यादी करून त्यावर काम करा.

17.  गरज भासल्यास इतरांची मदत घ्या.

18.  निर्णय घेताना सर्वप्रथम आपल्याला तो का घ्यावा लागत आहे हे बघावं.

 

 

 

19.  याला खरंच काही ठरवायचे आहे का, निर्णय घेण्याची गरज किती हे पासावे.

20.  नंतर परिस्थितीचे संपूर्ण विश्लेषण करावे. सर्वात शेवटी निर्णयामुळे उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीची कल्पना करावी. जेव्हा अनिश्चिततेचे वातावरण असेल तेव्हा निर्णय घेणे जड जाते.

 

परिस्थिती तुमच्यासाठी संपूर्ण नवा अनुभव आणते.

 

1.    बहुतेक वेळा तडजोड करावी लागते....

2.    सकारात्मक विचारसरणीचे निर्णय घेताना होणारे फायदे :

3.    गुंतागुंतीचे विषय समजण्यात वेळ जात नाही.

4.    वस्तुस्थिती चटकन कळते.

5.    नेमकी कुठली अनिश्चितता आहे हे समजते ती कशी दूर करता येईल याचे

6.    नियोजन करता येते.

7.    अचूक विश्लेषण करून अंदाज काढता येतात.

8.    एकाच वेळी अनेक प्रकारे एक काम किंवा कामे करण्यात मदत होते.

9.    निर्णय घेताना काय टाळावे?

10.  घाई करू नये गोंधळून जाऊ नये.

11.  झटका बसला असेल किंवा मानसिक

12.  त्रास झाला असेल तर सबुरीने घ्या.

13.  परिस्थितीची गंभीरता ओळखावी इतरांना दोष देणे टाळावे.

14.  शॉर्ट कटचे सर्व मार्ग टाळावेत.

15.  अति आत्मविश्वास टाळावा.

16.  नशिबावर सर्व काही सोडू नका.

17.  अचूक निर्णय कसा घ्यावा निर्णयाला व्याख्या द्या

18.  निर्णय घेण्याची वेळ का कशी आली हे तपासा. आपण हा निर्णय का घेत आहात?

19.  हा निर्णय घेण्यामागे काय उद्देश आहे हे स्पष्ट असू द्या.

20.  निर्णय घेण्यासाठी कोणत्या वस्तूंची, गुणांची, गोष्टींची, लोकांची आवश्यकता पडेल हे पडताळा.

21.  'काम कसे होईल' यापेक्षा 'मी हे काम करण्यासाठी काय काय करू शकतो' असा मानस ठेवावा.

22.  तसेच आपल्या मूलभूत गरजा दैनंदिन गरजा ओळखा त्यात फरक करण्यास शिका.

 

 

मूलभूत गरजा :

शिक्षण, नोकरी, घर - वाहन खरेदी, पेन्शन

 

इत्यादी दैनंदिन गरजा :

 

1.    ज्या मूलभूत गरजांना पूर्ण करण्यास मदत करतात.

2.    निर्णय घेताना मूलभूत दैनंदिन गरजांवर काय फरक पडेल ते बघा.

 

स्वतःला विचारा :

 

1.    ध्येय स्पष्ट आहे का? सर्व विकल्प बरोबर आहेत का?

2.    तुम्ही जमा केलेली माहिती संपूर्ण आहे का ?

3.    पुढे कुठला धोका निर्माण होऊ शकतो त्याची तीव्रता किती राहील?

 

 

परिस्थितीला नीट समजा सामोरे जा :

 

सर्व प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा नवीनच असते. तेव्हा घाबरू नका, त्याला सामोरे जा. परिस्थितीची समीक्षा करा. त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. त्यामधील भिन्नता ओळखा. या परिस्थितीस नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत हे पाहा. या कारणांमुळे भविष्यावर कोणता परिणाम होणार याची शहानिशा करा. या परिस्थितीतील महत्त्वाचे बिंदू कोणते आहेत, ते ओळखा. निर्णय घेताना आणखी कोणाची मदत होऊ शकेल ते बघा. शक्यतो जास्तीत जास्त माहिती जमा करा, ज्यामुळे धोका कमी होईल. तुम्हाला काय माहीत आहे? काय माहीत नाही? जी माहिती तुम्हाला हवी आहे ती कोठून मिळेल? मिळालेल्या माहितीचा निर्णय घेण्यात काय मदत होईल? कशी होईल? हे पाहावे.

 

व्यवस्थित विकल्प ओळखा पर्याय शोधा :

 

निर्णय घेताना बहुतेक वेळा असे वाटते, ‘याशिवाय पर्याय नाही', परंतु पर्याय असतात. ते ओळखावे लागतात. तुमच्या बुद्धिमत्तेवरून येणाऱ्या नवनवीन संकल्पनांना एकत्रित करा. त्यांना मोकळेपणाने बाहेर येऊ द्या. पर्याय सुचवताना स्वतःवर टीका करू नका. नकारार्थी राहू नका. इतर लोकांशी चर्चा करून त्यांच्याकडून काही पर्याय मिळतात का है बघा.

 

 

पर्यायांचे, विकल्पांचे विश्लेषण करा :

 

निर्णय घेणे म्हणजे 'कमी प्रमाणात धोका पत्करणे' असेही आहे; परंतु हापत्करलेला धोका' तुमच्या निणयात पहिल्यापासूनच गणला गेला असल्यानेच उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीची उत्तरह। तुमच्याजवळ असतील. पर्यायांचे व्यवस्थितपणे विश्लेषण करा. कोणत्या पर्यायामुळे अडचण सुटेल ते पाहा. होणारे नफा, नुकसान यासाठी आपण तयार आहात का हे तपासा. हिंमतही दाखवा सावधानतासुद्धा बाळगा. वेळ पैसा किता खर्च होईल हे पाहा.

 

पर्यायांना त्यांच्या महत्तेनुसार क्रमांक द्या : हे प्रथम करावे, हे नंतर असे आपल्याला अचूक विश्लेषण केल्यावरच समजेल. एक संपूर्ण नवीन रस्ता तयार होईल. पर्याय निवडल्यावर तुम्हाला कळेल की, समस्या ही तुकडे केल्यावर हाताळण्यास सोपी जाते. त्याचे भाग करावे. महत्त्वानुसार प्रथम कोणता हाताळावा याचा निर्णय घ्यावा. कोणते पर्याय निवडले, कोणते विचाराधीन आहेत कोणत्या पर्यायांचा विचार करायचाच नाही याचा तक्ता तयार करावा. यानंतर त्वरित' कोणता पर्याय अमलात आणू शकता हे पाहावे. इतर पर्यायांना वेळेच्या साच्यात न्याय द्यावा. शक्यतो तडजोड टाळावी.

 

निर्णयाची पुनःपडताळणी करा :

 

कोणते पर्याय अमलात आणायचे आहे हे पुन्हा पुन्हा पाहत राहावे. घेतलेल्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात याचा मागोवा वेळोवेळी घेत राहावा. हा निर्णय चांगला, तो का चांगला? हा वाईट, तो का वाईट? याची कारणे शोधावीत.

 

 

घेतलेला निर्णय अमलात आणा :

 

घेतलेल्या निर्णयावर लवकरात लवकर काम सुरू करा. पर्यायांना वेळेच्या सीमा द्या. अमूक काम या वेळेत पूर्ण झालेच पाहिजे, तमुक तारखेपर्यंत हे काम झालेच पाहिजे असा हट्ट स्वतःशी करा. आपले ध्येय साध्य होते का ते बघा. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत दुसऱ्यांना विश्वासात घ्या आपल्या निर्णयावर ठाम राहा.

 

लक्षात ठेवा :

 

1.    अनिर्णायकता तुम्हाला अस्ताव्यस्ततेकडे नेऊन नैराश्य देऊ शकते, तेव्हा अत्वक वेळी आपल्या समोरील असणाऱ्या विकल्पांवर विचार करा.

2.    आपल्याला रस्ता माहीत नसेल तर सावकाश चालत राहणे, थांबण्यापेक्षा कधीही चांगले आहे.

3.    आपण कोठे पडणार यापेक्षा कोठे घसरू शकतो याकडे लक्ष द्या.

4.    प्रश्न शोधण्यापेक्षा उदभवणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधा.

5.    उसबाना बरे वाटेल म्हणन निर्णय घेऊ नका.

6.    आपल्या निर्णयामुळे स्वतःचे नुकसान जास्तीत जास्त फायदा होईल इतरांनाही याचा त्रास कमीत कमी नुकसान जास्तीत जा होणार नाही अशा प्रकारे निर्णय करा.

7.   'आम्हीही जिंकू-तुम्हीही जिंका' हे तत्त्व अवलंबवावे.

8.   निर्णय घेताना भिऊ नका, अंगी धीटपणा बाळगा.

9.    चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे करा.

 

 

कार्यबिंदू

 

1.    निर्णय घेण्याची वेळ का आली?

2.    तुम्ही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहात का?

3.    तुमच्याकडे निर्णय घेण्याच्या विषयाची किती माहिती आहे?

4.    निर्णय घेण्यासाठी पर्याय किती आहेत?

5.    या पर्यायांमध्ये कामाचे पर्याय कोणते?

6.    निर्णय घेताना होणाऱ्या परिणामाची माहिती आहे ना?

7.    निर्णयाची पुनःपडताळणी केली आहे का?

 

Post a Comment

0 Comments