गुलाम महाराजांचा उदय वा गुलाम महाराजांना आत्मसाक्षात्कार

गुलाम महाराजांचा उदय वा गुलाम महाराजांना आत्मसाक्षात्कार 

गुलाम महाराजांचा उदय वा गुलाम महाराजांना आत्मसाक्षात्कार

Photo by Chaly Al Vito from Pexels

    अशिक्षित , अत्यंत लाजाळू , कमी बोलणाराआणि रोजच्या पोटाच्या विवंचनेत राहून दिवसभर कष्ट उपसणारा गुल्या वयाच्या पस्तीशीत अचानक गूढपणे बोलू लागला , त्यांच्या अंर्तयामी होणारी उलथा - पालथ अस्पष्ट , गूढशब्दांमधून व्यक्त होऊलागली . या स्पष्टीकरणाची त्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती पण गुल्याकडून आश्चर्यकारकवचने ऐकायला मिळत होती हे खरे या सामान्य कष्टकरी गुल्याचा गुलाममहाराज कसा झाला हेच या प्रकरणातून स्पष्ट होऊ शकेल . सत्यनिष्ठ आचरण करणारा , मनाने निर्मळ सत्पुरुष कोणत्याही जाती - जमातीत जन्माला येऊ शकतो . कारण सत्कर्म करण्यासाठी कुळ किंवा जात महत्त्वाची नसते तर त्या व्यक्तींची वृत्ती - प्रवृत्ती महत्त्वाची असते . 

    यातूनच गोरा - कुंभार , नामा शिंपी , चोखोबा , कबीर , गाडगेमहाराज यासारखे संत कनिष्ठ मानलेल्या जातीत जन्मले , संत जनाबाई तर निराधार , दासी म्हणून जीवन व्यतीत करणारी पण कर्म आणि भक्तीमुळे या साऱ्या व्यक्ती संत पदाला पोहचल्या . म्हणूनच संत शिरोमणी संत तुकाराम महाराज म्हणतात , बरे झाले देवा कुणबी झालो । नाही तर दंभेची असतो मेलो ॥ ' आपण म्हणतोच की , ' टाकीचे घाव सोसल्याखेरिज देवपण येत नाही ' या उक्तीप्रमाणे सत्पुरुषाला काळसुद्धा वेगवेगळ्या कसोट्यांवर पडताळून पहात असतो . काळाने समाजाने लावलेले निकष आणि समाज मान्य उक्तीनुसार संत किंवा सत्पुरुष काळाबरोबर घडत जातात आणि आपल्या सत्कमनि काळावर आपली नाममुद्रा उमटवित असतात . 

    गुल्यासुद्धा अत्यंत मागासलेल्या , हीन जीवन जगणाऱ्या भिल्ल जमातीत जन्माला आला . भिल्ल समाजातील तत्कालीन परिस्थितीनुसार सर्वसामान्य लोकांप्रमाणे दैनंदिन जीवन जगत होता . आपल्या समाजाचा दारिद्य आणि कष्टमय जगण्याचा वारसा घेऊनच तो जन्माला होता . मात्र स्वच्छ राहण्याच्या ध्यासाने आणि सत्यनिष्ठ आचरणामुळे त्याला वेगळीच जीवनदृष्टी प्राप्त झाली आणि त्यामुळे तो थोडासा वेगळा वाटू लागला होता . कामाशिवाय कुणाशीही न बोलणारा गुल्या मनोमन आपल्या समाजाची तुलना इतर समाजाशी करीत असावा . 

    समाजाचे अवलोकन निरीक्षण करून समाजातील वाईट आणि अनिष्ट प्रथांचे निराकरण करण्याचे त्याने ठरविले म्हणूनच त्याने सर्वप्रथम हात लावला तो भिल्ल समाजाच्या स्वच्छतेच्या कल्पनेला . गुल्या रोज आंघोळ करू लागला . शौचाला जातांना नियमित पाणी नेऊलागला , रोज सूर्यदर्शन घेणे , महादेवाला पाणी देणे आणि महादेव व मारूतीची नियमित पूजा करणे , मद्य - मांसाहार यांचे सेवन न करणे यासारख्या सदाचाराला त्यांनी श्रद्धेचे अधिष्ठान दिले . तत्कालीन भिल्ल समाजाच्या परंपरागत वर्तनाच्या उलट गुल्याचे वर्तन होते . 

    त्यामुळे त्याच्या या सदवर्तनाची आणि त्याने स्विकारलेल्या व्रतस्थआचरणाची प्रारंभी थट्टाच होऊ लागली मात्र नंतरच्या काळात स्वजातीय व परजातीय त्यांच्याकडे आदराने पाहू लागले . आईवडिलांच्या दरिद्रीनारायणाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी गुल्या लहानपणापासूनच काही ना काही दोन पैसे मिळविण्याचे काम करीतच होता . तरूण झाल्यावर सालदार म्हणून कष्टाचे काम करू लागला . जगरहाटी प्रमाणे संसारही तोपर्यंत सुरू झालेला होता . 

    गुजर पाटलांकडे तो सालदारम्हणून काम करीत होता.आत्ममग्न राहणारा गुल्या आपल्या आजूबाजूचे निरीक्षण मात्र बारकाईने करीत होता . आजूबाजूचे आवाज अत्यंत संवेदनशील मनाने टिपून घेत होता . आपल्या समाजाच्या उद्धारासाठी इतर समाजातील लोक तळमळीने आणि एकनिष्ठेने कार्य करीत आहेत हे त्यांना वेळ मिळेल तेव्हा होणाऱ्या त्यांच्या भटकंतीतून त्यांना कळत होते.त्यांचाहेर जारंभाऊस ! ' म्हणून समाजाशी संवाद होत होता.समाज आणि राजकारण यात घडणाऱ्या बदलाचे वारे त्यांच्यापर्यंत पोहचत असावेत.याच सुमारास श्री . ठकारही तळोदा भागात फिरत होते . त्यांच्याही कार्याची झुळूक त्यांच्यापर्यंत पोहचली असावी . 

    कुकरमुडा सस्थानातून दरवर्षी पंढरपूरला वारी जाते . सुमारे शतकाची परंपरा या वारीला आहे .. गुलाम महाराज या कुकुरमंडा संस्थानच्या वारीबरोबर एक दोन वेळा पंढरपुरलाही जाऊन आले होते . या वारीतच कुठेतरी त्यांनी गाडगेमहाराजांना पाहिले वा ऐकले असावे . सद्वर्तनी , सदाचारी , स्वयंशिस्त , स्वतः आचरणात आणलेल्या , स्वच्छ आणि सत्यनिष्ठ राहणीशीकुठलीही तडजोड न करता त्यांचे दैनंदिन जीवन प्रकाशमय होऊ लागले होते पण कष्टाची कामे सुटली नव्हती अर्थात ती त्यांच्या उदरनिर्वाहाची कामे होती . त्यामुळे गुल्यात होणारे परिवर्तन कुणाच्याही लक्षात येत नव्हते . कष्ट करीत असतांनाच भोवतालच्या परिस्थितीचे आणि समाजाचे निरीक्षण सुरू होते . आता अबोल असलेल्या आणि अक्षरज्ञान नसलेल्या गुल्याला त्याच्या शुद्ध स्वच्छ आचार विचारांमुळे आणि सत्य व नम्रताप्रीय स्वभावामुळे लोक महाराज ' म्हणू लागले . 

    गुला , गुल्यासालदार , गुल्या रखवालदार म्हणून सगळ्यांना परिचित असलेला ' गुल्या ' , ' गुला महाराज ' , ' गुलाम भगवान ' कधी झाला हे कुणाच्या लक्षातही आले आहे . इतका प्रवास गुल्याचा झाला तो साऱ्यांच्या देखत कळत नकळत . त्याच्यात आंतरिक परिवर्तन घडून आल्याचे कळायला मात्र खूप उशीर झाला . तोपर्यंत गुल्याचे अवतारकार्य समाप्तीकडे झुकले होते . गुल्याला आत्मसाक्षात्कार कधी आणि कुठे झाला याबद्दल प्रवाद आहेत . जन्मत : च गुल्यात काही दैवी गुण असावेत . त्या गुणांच्या प्रभावानेचगुल्याची राहणी तत्कालीन भिल्ल समाजातील इतरांपेक्षा वेगळी होती . स्वच्छ राहणी आणि निर्मळ आचार हीच त्याची बलस्थाने होती . त्यामुळेच गुल्या इतरांपेक्षा वेगळा भासू लागला . लोक त्याच्याकडे हळूहळू आदरयुक्त श्रद्धेने पाहू लागले . त्याच्या वागण्या बोलण्यात चमत्कारिकबदल अनेक  जाणवू लागले . 

    गुल्या अधिाकधिक आत्ममग्न आणि अंतर्मुख होत गेला . ज्यावेळी तो अशा समाधीअवस्थेत जात असे त्यावेळी काही तरी अनाकलनीय शब्द उच्चारित असे . सर्वसामान्य गुल्याचा हा नवा अवतार पाहून लोकत्याच्याजवळ येऊन बसू लागले . गुल्याची भ्रमंती आता थांबली होती . लोकांच्या मनाची मशागत पूर्ण झाली होती . लोक आता स्वतः त्याला शोधू लागले . त्यांचे शब्द कळो न कळो पण ते ऐकण्यात त्यांना आनंद वाटू लागला . गुल्याचे व्रतस्य जगणे फळाला आले होते . पण गुल्याचा गुलाम महाराज झाला कसा हे पाहणे म्हणजे एक आनंदाचे झाड शोधण्यासारखे आहे . आपण म्हणतो ' गुरु विना ज्ञान नही ' , सद्गुरु वाचून ज्ञान नाही , मग तो सद्गुरु मूर्त असेल वा अमूर्त असेल , स्वप्नी येऊन दृष्टांत दिलेला असेल किंवा मानसीचा असेल . पण सद्गुरुवाचून बोध नाही हे त्रिकाल सत्य आहे . मग ती ज्ञानेश्वरादी भावंडे असोत , संत तुकाराम , जनाबाई , बहिणाबाई , एकनाथ महाराज असोत व समर्थ रामदासादी संत असोत . 

    त्यांनी सत्प्रवृत्तीने आपले जीवन तर घडविलेच पण समाज प्रबोधनातून समाजही घडविला . त्याच परंपरेतील गुलामहाराज यांनी रुढार्थाने निरक्षर असूनही अज्ञानी अशा भिल्ल समाजात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणले . मात्र अज्ञानी , अशिक्षित भिल्ल समाजाला हे अद्भूत कार्य कळलेच नाही . आणि निरक्षर , अबोल , आत्ममग्न गुल्याच्या तोंडूनही आपल्याला कुणाचा साक्षात्कार झाला हे कधी बाहेर पडले नाही . त्यामुळे त्याला झालेल्या दृष्टांताची किंवा सद्गुरुकृपेची फारशी चर्चा झाली नाही . मात्र गुलाम महाराजाना अध्यात्मावर अधिकार वाणीने बोलण्याचे ज्ञानवा बोध प्राप्त झाला हे सत्य आहे . त्याशिवाय त्यांचा शब्द या भिल्लांनी स्विकारलाचनसता . त्या आत्मज्ञानाच्या बळावर त्यांनी भिल्ल समाजाचा उद्धार केला . हे महत्कार्य व पुण्यकार्य भिल्ल समाजातील व्यक्तीच्याच हातून घडावे हे त्या समाजाच्या सोशिकतेचे आणि अगतिक जगण्याच्या पद्धतीस आलेले परमोच्चकोटीचे फळच म्हणावे लागेल . 

    तत्कालीन समाज परिस्थितीच्याही नकळत काळाच्या उदरातून एकसुदर  सत्शील व्यक्तीत्व घडले होते.जे पुढच्या काळात , भविष्यात समाजाला एकनवी दिशा देणार होते.समाजाच्या जीवनाचे चक्र फिरवणार होते आणि समाजाला श्रद्धेय , ललामभूत होऊन काळाच्या पडद्यावर आपली नाममुद्रा उमटवून संपूर्ण समाजाला आपण तयार केलेल्या पाऊलवाटेवर चालण्यास , आपल्या वागण्या - बोलण्याचे अनुकरण करण्यास व अनुयायी बनण्यास भाग पाडणारे होते . गुल्यातील हे बदल सर्व प्रथम तो ज्यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करीत असे त्यांच्या लक्षात येऊलागले . गुल्याच्या आत्मसाक्षात्काराविषयी एककथा सांगितली जाते . ती अशी आपला समाज कधी आणि कसा सन्मानाने जगू शकेल या विचारमग्न अवस्थेत अस्वस्थ असलेला गुल्या आपण काहीच करू शकत नाही . या हताश अवस्थेत भल्या पहाटे घराबाहेर पडला तो सरळ जंगलात सरपण आणण्यासाठी गेला . त्याच्याकडे नित्य नेमाने येणारी काही मंडळी त्याच्या घरी आली . कारण गुल्याची मंदिरात येण्याची वेळ निघून गेली होती . बराच उशीर झाला तरी गुल्या मंदिरात येण्याची चिन्ह दिसत नव्हती . 

    लोकघरी आली तेव्हा दगुमातेने गुल्या जंगलात गेला तो अजून परत आलाच नाही . असे सांगितल्यावर थोडावेळ थांबून लोक जंगलाच्या दिशेने निघाले तो त्यांना डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन गुल्या येतांना दिसला . त्याच्या दिशेने थोडेसे चालत गेल्यावर त्याचा अवतार थोडासा वेगळा वाटला . लोकांनी त्याच्या डोक्यावरची लाकडाची मोळी उतरवून घेऊन प्रत्येकाने एकेक लाकुड हातात घेतले व गुल्याच्या झोपडीकडे आले . गुल्या सोबत गप्पा मारतांना त्याच्या बोलण्यातील वेगळेपणा जाणवला . त्याच्या मुखातून जणू सरस्वतीची वाणी निनादत होती . अशिक्षीत गुल्या काहीतरी बोलत होता पण लोकांना त्यातील थोडेसेच कळत होते . गुल्याला जंगलात असे काहीतरी सापडले होते ज्यायोगे त्याचे जीवन बदलले . या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात . पहिला गुल्याला रामाचे दर्शन झाले , दुसरा गुल्याला शबरीचा कृपाप्रसाद मिळाला . 

    यापैकी सत्य काहीही असो पण जंगलात असे काहीतरी घडले होते हे सत्य आहे . आपल्या समाजाकरिता काहीतरी करावे ही आंतरीकतळमळ त्याच्या मनात होती पण दिशा सापडत नव्हती . आपल्या समाजाच्या उद्धारासाठी दिशा मिळत नाही तोपर्यंत घरी परतायचे नाही असा दृढ निश्चय करून गुल्या घराबाहेर पडला होता . क्षणभर त्याच्या मनात एक विचार येऊन गेला जर आपण आपल्या समाजासाठी काहीच करू शकणार नसलो तर हा देह काय कामाचा ? हा विचार मनात येताच तो अस्वस्थ झाला आणि या नैराश्यावस्थेत त्याच्या मनात आत्मनाशाचा विचार आला . त्याचक्षणी लख्खकन वीज चमकावी तसा त्यांना साक्षात्कार झाला.हा संदर्भ मौखीक परंपरेतील आहे . कुणाला वाटते त्यांना जंगलात रामाचा साक्षात्कार झाला . तर कुणाला शबरीमातेचासाक्षात्कार झाला असे वाटते . 

    काहीही असो यापैकी एक वा दोनही संदर्भ गृहीत धरूनच गुल्याला झालेल्या आत्मज्ञानाचा आत्मप्रत्यय घ्यावा लागतो . त्यानंतर पुन्हा एकदा असे घडले त्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला दगुला सांगितले मी निघतो आहे मला शांतता हवी आहे जर मी परत आलो तर तू वेशीजवळ आरती घेऊन ये . हा प्रसंग मोठा बोलका आहे . एका सत्शील , सदाचारणी व्यक्तीच्या दृढ निश्चयाला आलेले हे फळ , त्या अदृश्य शक्तीचा वरदहस्त म्हणू या . त्या दिवशी दगू माता आरती घेऊन सामोरी जाताच त्या निरक्षर दगुमातेच्या वेडी - वाकडी शब्द फुले बाहेर पडू लागली . अचानक सरस्वती मुखातून त्यांच्या जिव्हेवर नाचू लागली . गंमत म्हणजे कुठल्याही एका भाषेतील ही शब्दफुले नव्हती . परिचीत अपरिचीत शब्दांची माला त्यांच्या मुखातून प्राजक्ताच्या फुलांसारखी टपटप पडत होती . त्या शब्दफुलांचीच तेव्हांपासून न आजपर्यंत जीआरती तयार झाली तीच आपमंडळातील लोक म्हणातत . त्या आरतीला ' बडी आरती ' असे संबोधले जाते.गुल्याचा गुलाम महाराज म्हणून उदयाला येण्याचा हा पहिला प्रसग आहे . 

    या आरतीच्या अद्भूत प्रसंगापासूनच गुलाम महाराजांच्या भोवती लोक जमू लागले . भोळ्या  भावड्या आणिकष्टमय जीवन व्यतीत करणाऱ्या भिल्ल समाजाला गुल्यातील हाबदल लक्षात येण्यास उशीर झाला . गुल्याचागुलाममहाराज वागुलाम भगवान म्हणून उदय झाल्यावर मी आता ' मोरवड'ला प्रती ' पंढरपूर ' करेन असे त्यांनी म्हटले आणि त्या दिशेने प्रयत्न सुरु केले . आता समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केल्याने एकवेगळेचतेज आणि आत्मबल जागृत झाले होते . त्यामुळे एकदा त्यांनी आपल्या आईला सांगितले , की मी दहा दिवस स्वतःला गाडून घ्यायचे ठरवतो आहे मी जीवंत येईन . मला काहीच होणार नाही . माझ्यावर विश्वास ठेव . त्यावेळी आई काहीच बोलली नाही . कुठली प्रतिक्रिया वा भावनाही व्यक्त केल्या नाहीत . हीच गोष्ट गुल्याने आपल्याजवळ येऊन बसणाऱ्यांनाही सांगितली . 

    लोकांना आश्चर्य वाटले . गुलाम महाराज असे का बोलत आहेत . पण आपल्या ह्या विचारावर ते ठाम हाते . दहा दिवसानंतर धरणीमातेच्या उदरातून मी जीवंत निघालो तर आपले गाव निश्चितच प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाईल , पण भिल्ल समाजाच्या नशिबात हे नव्हते . गुला महाराजाने स्वत : ला गाडून घेतल्यावर त्याच्या भोवती लोकांची गर्दी जमत होती . काय होईल याची आतुरतेने लोक वाट पाहत होते . कुणाच्याही मनात शंका नव्हती . गुला महाराज जीवंत आणि सुखरुप बाहेर येतील हा अढळ विश्वास व श्रद्धा लोकांच्या मनात होती . पण मातृहृदय कळवळले गुला महाराजांची आईलोकांना बोलू लागली , भांडूलागली तो तुमचा असेल महाराज पण माझा मुलगा आहे . माझ्या डोळ्यादेखत मी त्याला मरू देणार नाही . माझ्या मुलाला बाहेर काढा असा तीचा आक्रोश सुरु झाल्यावर लोकहळहळले आणि गुल्याला ७ व्या दिवशीच बाहेर काढले गेले त्यावेळी तो आईला एवढेच म्हणालातूथोडा धीर धरला असता तर बरे झाले असते . माझे कार्य आता अपूर्णच राहिल . तूंसमाजाचे खूप नुकसान केले . अशीही माहिती अमलाडच्या एक वृद्धेने दिली . अशाप्रकारे गुल्याहळुहळू आपल्याला आत्मबोध प्राप्ती व्हावी म्हणून वेगवेगळे प्रयोग करून पहात होता . 

    साहजीकच लोकांचा त्याच्यावरचा विश्वास आणि श्रद्धा अधिकच वाढत होती . केवळ गावातीलच नव्हे तर आजूबाजूचे लोकही आता ' महाराज म्हणून मोरवडला गुलाममहाराजांकडे  येऊलागले . गुल्यामधील आत्मशक्तीचा प्रत्यय गुल्या ज्या गुजर पाटलाच्या शेतात रखवालदार म्हणून काम करीत होता त्या शेतकऱ्याला आला . त्या गुजर पाटलाने आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचे ठरविले . गुल्याला तसे सांगून आणि शेतीची नीट रखवाली करण्याची ताकीद वजा सूचना देऊन तो निघाला . पंढरपूरला पोहाचला तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच त्याला गुल्या दिसला . तो आश्चर्यचकीत होऊन पाहू लागला . 

    माझ्या आधी हा पोहचला कसा त्याच्याशी बोलावे असा विचारही आपला पण नंतर हा विचार बाजूला ठेवून मनाशीच ठरविले नका घरी परत गेल्यावर त्याची हजेरी घेऊ . या विचारातच त्या गुल्याच्या मालकाने विठ्ठलाचे दर्शन घेतले व दोन दिवसांनी घरी परत आले . घरी जाताजाता शेतकडे चक्कर मारून घरी जाऊ . या विचाराने तो शेतावर आला तर गुल्याला शेतात रखवाली करतांना पाहून तोआश्चर्यचकीत झाला . जवळच्या शेतवाल्यांकडे चौकशी केली तर त्याला कळले गुल्या कुठेच गेला नाही . तो प्रामाणिकपणे त्याचे काम करतांना आम्हाला रोजच दिसतो आहे . गुल्याचा मालक या प्रसंगाने चक्रावला . 

    त्याला गुल्यात काहीतरी आहे , तो जादुटोणा करतो असे वाटले . कालांतराने असे प्रसंग वारंवार घडू लागले . गुल्या एकाचवेळी चार चार लोकांना चार - चार ठिकाणी दिसू लागला . लोकांची श्रद्धा अधिकच वाढू लागली . गुल्याची गुला महाराज वा गुलाम भगवान म्हणून उदयाला येण्याचे असे अनेक प्रसंग गुला महाराजांच्या चळवळीतील वयोवृद्ध लोक भक्ती भावाने सांगताना दिसतात . पंढरपूरला गुला महाराज गेले होते . विठ्ठलाची मूर्ती डोळ्यात साठवून ते परत आले आणि आपल्याही गावाला आपण प्रती पंढरपूर करावे असा त्यांचा दृढनिश्चय होता आणि आपल्या आत्मज्ञानावर अढळ श्रद्धा त्यांची होती . 

    सामान्य गुल्याचा ' गुलाम महाराजापर्यंतचा प्रवास . आपल्या एका समाचारातून सांगितला होता अशी  माहिती पिरमोदला गावातील आप चळवळीतील ज्येष्ठ व्यक्ती लक्ष्मण महाराज यांनी दिली.गुलाम महाराजम्हणतात ' मीराम पाहण्याकरीता झाडी जंगल फिरलो , दरी - खोरी फिरलो , धोंगी नख घेतले , फाशी घेतली , इतके करता करता सवताहा मीच राम बनलो आहे यावरून गुल्याला रामाचा साक्षात्कार झालाहोता असे गृहीत धरावे लागते . आपल्यातील शक्ती आपण जागृत करा हाच विश्वास त्यांनी लोकांना दिला . त्यादिशेने त्यांनी कोणते आणि कसे कार्य केले याचा तपशील आपण पुढच्या प्रकरणात पाहू .

Post a Comment

0 Comments