गुरुचा महिमा

गुरुचा महिमा 

गुरुचा महिमा

Photo by Roxanne Shewchuk from Pexels
    

    वास्तविक गुरुच्या महिम्याचे पूर्ण वर्णन कोणी करुंच शकत नाही . गुरुचा महिमा भगवंतापेक्षा अधिक आहे . म्हणून शास्त्रात गुरुचा महिमा खूप वर्णन केला आहे . पण तो महिमा खरेपणाचा आहे , दम्भ पाखण्ड यांचा नाही . आजकाल दम्भ - पाखण्ड फार झाले आहे आणि वाढतच चालले आहे . कोण चांगला आहे कोण वाईट आहे याचा लवकर पत्ताच लागत नाही . जो वाईटपणा , वाईटपणा म्हणूनच समोर येतो तो नष्ट करणे सुगम असते . पण जो वाईटपणा चांगल्याचे रूप धरून समोर येतो त्याला नष्ट करणे फार कठीण असते . 

    सीते समोर रावण , राजा प्रतापभानु समोर कपटमुनि आणि हनुमंता समोर कालनेमि आला तर ते या कुणलाही ओळखू शकले नाहीत . त्यांच्या जाळयांत सांपडले कारण त्या सर्वांनी साधूचे सोंग घेतलते होते . आजकाल ही शिष्यांची आपल्या गुरुबद्दलजी श्रद्धा दिसून येते तसे ते गुरु स्वत : नसतात . म्हणून शेठजी श्रीजयदयालजी गोयन्दका म्हणत असत की आजकालच्या गुरुंच्या ठिकाणी आमची श्रद्धा नाही उलट त्यांच्या शिष्यांच्या ठिकाणी श्रद्धा असते कारण शिष्यांच्या ठिकाणी त्यांच्या गुरुच्याबद्दलजी श्रद्धा असते ती आदरणीय आहे . 

    शास्त्रांमध्ये आलेला गुरुमहिमा योग्य असला तरीही वर्तमान काली प्रचार करण्यास योग्य नाही . कारण की आजकाल दम्भी पाखण्डी लोक गुरु - महिम्याच्या आधारे आपला स्वार्थ सिद्ध करतात . यांत कलियुगही सहायक आहे , कारण कलियुग अधर्माचा मित्र आहे . ' कलिनाधर्ममित्रेण ' ( पद्मपुराण , उत्तर ० १ ९ ३ । ३१ ) . वास्तविक गुरु - महिमा प्रचार करण्यासाठी नसून धारण करण्यासाठी आहे . कोणी गुरु स्वत : च गुरु महिम्याचे वर्णन करीत असेल , गुरुच्या महिम्या सम्बन्धी पुस्तकांचा प्रचार करीत असेल तर यावरून सिद्ध होते की त्याच्या मनांत गुरु बनण्याची इच्छा आहे . ज्याच्या मनांत गुरु बनण्याची इच्छा असते त्याच्याकडून दुसऱ्यांचे भले होऊ शकत नाही . म्हणून मी गुरुचा निषेध करीत नाही तर पाखण्डाचा निषेध करतो . गुरुचा निषेध तर कुणी करूच शकत नाही . 

    गुरुचा महिमा वास्तविक शिष्याच्या दृष्टिने असतो , गुरुच्या दृष्टिने नाही . एक गुरुची दृष्टि असते , एक शिष्याची दृष्टि असते आणि एक त्रयस्थाची ( तिसऱ्या व्यक्तीची ) दृष्टि असते . गुरुची दृष्टि अशी असते की मी तर काही केलेच नाही उलट जे स्वतः स्वाभाविक वास्तविक तत्त्व आहे त्याच्याकडे शिष्याची दृष्टि वळवली . तात्पर्य हे की मी त्याच्या स्वस्वरूपाचा बोध केला आहे , माझ्याजवळील काहीही मी त्याला दिलेले नाही . शिष्याची दृष्टि अशी असते की गुरुने मला सर्व काही दिले आहे . जे काही झाले आहे सर्व गुरुच्या कृपेनेंच झाले आहे . त्रयस्थाची दृष्टि अशी असते की शिष्याच्या श्रद्धेमुळेच त्याला तत्त्वबोध झाला आहे . 

    ज्यांनी गोविंदाची प्राप्ति करून दिली असेल त्याच गुरुचा महिमा खरा होय . जो गोविंदाची प्राप्ति तर करून देत नाहीं , नुसत्याच गप्पा मारतो तो ( खरा ) गुरु नसतो . अशा गुरुचा महिमा नकली आणि दुसऱ्यांना ठकविण्यासाठी असतो .


गुरुची कृपा 

    गुरु - कृपा अथवा सन्त - कृपा यांचे खूप विशेष माहात्म्य आहे . भगवंताच्या कृपेनें जीवाला मानवी शरीर मिळते आणि गुरुकृपेनें भगवान् मिळतात . लोक समजतात की आम्ही गुरु करूं म्हणजे मग ते कृपा करतील , परन्तु ही काही महत्त्वाची गोष्ट नाही . आपापल्या बालकांचे पालन सर्वच करतात . कुत्री सुद्धा आपल्या पिलांचे पालन करते . परन्तु सन्त - कृपा फार विलक्षण असते . दूसरा शिष्य बनो अगर न बनो , त्यांच्यावर प्रेम करो अथवा वैर करो , त्याकडे सन्त पाहत नाहीत . दीन - दु : खी लोकांना पाहून सन्तांचे हृदय द्रवीत होते तर त्यामुळे त्यांचे काम बनून जाते . * जगाई मधाई प्रसिद्ध पापी होते आणि साधुशी वैर करीत असत पण चैतन्य महाप्रभुनी त्यांच्यावरही दया करून त्यांचा उद्धार केला . 

    सन्त सर्वांवरच कृपा करतात , पण परमात्मतत्त्वाचा जिज्ञासुच त्या कृपेला ग्रहण करतो , जसे तहानलेला माणूसच जलाचे ग्रहण करतो . वास्तविक आपल्या उद्धाराची तळमळ जितकी तीव्र असेल , सत्य तत्त्वाची जिज्ञासा जितकी अधिक असेल तितकी - तितकी अधिक कृपा तो ग्रहण करतो . सच्चा जिज्ञासूवर सन्त - कृपा अथवा गुरु - कृपा आपल्या आपण होत असते . गुरु - कृपा झाल्यावर मग काही शिल्लक राहतच नाही . परन्तु असे गुरु अत्यंत दुर्लभ असतात . 

    परीसामुळे लोखंडाचे सोने होते पण त्या सोन्यांत अशीताकद नसते की दुसऱ्या लोखंडालाही सोने बनवेल . परन्तु असली गुरु मिळाला तर त्याच्या कृपेनें चेला ( शिष्य ) पण गुरु महात्मा बनतो . 

पारस में अरु संत में , बहुत अंतरौ जान । 

वह लोहा कंचन करे , वह करै आपु समान ॥ 

    ही गुरुकृपेची विलक्षणता आहे ! ही गुरुकृपा चार प्रकारांनी होते . 

    स्मरणाने , दृष्टिने , शब्दाने आणि स्पर्शाने ! जसे कासवी वाळू मध्ये अंडी घालते आणि स्वत : पाण्यांत राहून या अंड्यांचे स्मरण करीत राहाते तर तिच्या त्या स्मरण करण्याने अंडे परिपूर्ण होते . तसेच गुरुनी केवळ स्मरणमात्र केल्याने शिष्यास ज्ञान प्राप्त होते , ही स्मरण - दीक्षा आहे . जसे मासळी पाण्यांत आपल्या अण्ड्यांकडे थोड्या - थोड्या वेळाने बघत राहते आणि तिच्या त्या दृष्टिने अंडे पिकते ; तसे गुरुच्या केवल कृपादृष्टिने शिष्याला ज्ञान होते . ही दृष्टि - दीक्षा होय . जसे कुररी पृथ्वीवर अंडी घालते आणि आकाशात शब्द करीत घिरटया घालीत राहाते तर तिच्या त्या शब्दाने अंडयाची परिपूर्ण वाढ होते तसे गुरु आपल्या शब्दांनी शिष्यास ज्ञान प्रदान करतो . ही शब्द - दीक्षा आहे . जसे लांडोर आपल्या अंड्यांवर बसून राहते तेव्हां तिच्या स्पर्शाने अण्डे परिपक्व होते तसे गुरुच्या हस्त - स्पर्शाने शिष्याला ज्ञान होते - यास स्पर्श - दीक्षा म्हणतात . 

    ईश्वराच्या कृपेने मानव शरीर मिळते , ज्या योगें जीव स्वर्गांत अथवा नरकांत ही जाऊ शकतों तथा मुक्तही होऊ शकतो . परन्तु गुरु - कृपा अथवा सन्त - कृपां यामुळे मनुष्यास स्वर्ग अथवा नरक न मिळतां केवळ मुक्तिच मिळते . गुरु केल्यानेच गुरुकृपा होते असे नाही . नकली - बनावट गुरुच्या योगे कल्याण होत नाही . जे चांगले सन्त - महात्मे असतात तें शिष्य बनले तरच कृपा करतात अशी गोष्ट नाही . ते आपण होऊन आणि स्वाभाविक कृपा करीत असतात . सूर्याला कुणी इष्ट मानले तरच प्रकाश देतो असे नसते . सूर्य तर स्वतः आणि स्वाभाविक प्रकाश प्रदान करतो , त्या प्रकाशाचा उपयोग कुणीही करू शकतो . तशीच गुरुची , सन्त महात्म्यांची कृपा स्वत : स्वाभाविक असते . जो त्यांच्या सन्मुख होतो तो लाभ प्राप्त करूं शकतो . जो सन्मख होत नाही तो फायदा करून घेउ शकत नाही . जसे पाऊस पडतो तेव्हां पावसांत पात्र ठेवले तर ते पाण्याने भरुन जाते ; परन्तु पात्र उलटे - पालथे घालून ठेवले तर ते जलाने भरुन न जाता ( आंतून ) कोरडेच राहाते . सन्त कृपा ग्रहण करणारे पात्र जसे असते तसा त्याला लाभ होतो . 

सतगुरु भूठा इन्द्र सम , कमी न राखी कोय । 

वैसा ही फल नीपजै , जैसी भूमिका होय ॥ 

    वर्षा सर्वांवर समान रूपाने होते पण बीज जसे असेल तसे फल उत्पन्न होते त्याप्रमाणेच भगवंताची , सन्त - महात्म्यांची कृपा सर्वांवर सदा समान रूपाने असते , ज्याला जसा हवा असेल तसा त्याने लाभ घ्यावा .

Post a Comment

0 Comments