मेहनत - कटिबद्धता – स्वयंप्रोत्साहन


मेहनत - कटिबद्धतास्वयंप्रोत्साहन

 

मेहनत - कटिबद्धता – स्वयंप्रोत्साहन

Photo by Sharon McCutcheon from Pexels

यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आत्मविश्वासाची गरज असते. तसेच स्वतःला सतत मेहनत घेण्यासाठी ध्येयाबाबत कटिबद्ध राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. त्याकरिता तुम्हाला आत्मविश्वास हवा. प्रोत्साहन स्वतःशी सकारात्मक बोलायला शिका. आपल्या मनात नेहमी विचारांची उत्पत्ती होत असते. आपले विचारचक्र नेहमी फिरत असते. जणू काही आपण निरंतर स्वतःशी संवाद करीत आहोत. तेव्हा आपण स्वतःला प्रोत्साहित करणे म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे हेच होय.

 

स्वतःशी संवाद साधताना सर्वप्रथम आहे त्या परिस्थितीचा आढावा घ्यावा. ही परिस्थिती कशामुळे आली आहे याचा विचार करा. आताची जी परिस्थिती आहे ती तुमची वास्तविकता आहे. या वास्तविकतेला स्वीकारा. काही गोष्टी निश्चितच मनासारख्या घडलेल्या नाही, तेव्हा जगात सर्वकाही आपल्याच इच्छेप्रमाणे घडेल, असे कधीच होत नाही.

 

हे गृहीतच धरा. आपणाकडून प्रयत्न होत आहेत होणार आहेत याचे समाधान माना. आपण आपल्या प्रयत्नात मात्र कमी पडता कामा नये. परिस्थितीला जसे आपण बदलू शकलो नाही तर कालांतराने परिस्थिती बदलणारच कारण तो निसर्गनियम आहे, हेही मनात ठेवा. म्हणून आपण कमी पडलो आहोत, असेही समजू नका. स्वतःला आपल्या कामाकडे, उद्दिष्टाकडे पूर्णपणे झोकून देत आपण केव्हा ना केव्हा जिंकाल, अशी आशा बाळगा. कल्पकतेमध्ये रमता स्वप्नांच्या जगात वावरता वास्तविकतेला धरून चालण्यास शिका.

 

काही चमत्कारिक घडेल याची अपेक्षा करू नका चमत्कार आपल्याला आपल्या प्रयत्नाद्वारे घडवून आणायचा आहे. दगड हा एकाच फटक्यात फुटत नाही तर त्याला सतत फटके मारत राहिल्यानेच तो फुटतो. तेव्हा जर त्याला ५० फटके मारले असेल तर तो फक्त ५० व्या फटक्यामुळेच फुटला असे समजू नये. आपण मारलेल्या पहिल्या ४९ फटक्यांचाच तो परिणाम असतो.

 

आपणाला एखादी गोष्ट अवघड जात असेल तर इतरांच्या उदाहरणाने स्वतःला प्रोत्साहित करण्यास शिका. त्यांच्या अपयशाकडे बघता त्यांच्या यशाकडे बघा. प्रत्येक गोष्टीत चांगले काय ते शोधा. एकदा एका शिक्षकाने पांढऱ्या फळ्यावर काळ्या स्केच पेनने एक बारीक ठिपका काढला विद्यार्थ्यास विचारले की, 'तुम्हाला काय दिसते?' सर्वांचे उत्तर एकच होते की त्यांना शिक्षकाने काढलेला काळा ठिपका दिसतो.

 

तेव्हा शिक्षक म्हणाले की, 'पांढऱ्या शुभ्र फळ्यावर तुम्हाला फक्त एक काळा ठिपकाच दिसतो, तुम्हाला इतर काही कसे दिसत नाही. त्या फळ्याची शुभ्रता ९९ टक्के आहे, ठिपक्याने फक्त टक्का जागा अडवून धरली आहे. तरी तुम्हाला तो ठिपकाच का दिसतो. याला कारणीभूत आहे तो दृष्टिकोन. आपणाला दुसऱ्यात चुका फार लवकर शोधता येतात. एखाद्यात काय दोष आहे हे आपण चटकन सांगू शकतो. आपल्याला तो काळा ठिपका दिसतो; परंतु त्याच्या ९९ टक्के शुभ्र, स्वच्छ व्यक्तिमत्त्वाकडे आपण बघत नाही. तेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीत गोष्टीत चांगले शोधा. आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. निर्णय घेताना, सहकार्य मिळवताना याची मदत होईल.

 

स्वहित जपा

 

आपण नेहमी बऱ्याचदा इतर लोकांच्या अनुभवावरून आपली दिशा ठरवत असतो. त्यांना अपयश आले, ते फसले,त्यांनी मार्ग बदलला, ते तसे करतात, ते असे करीत नाही म्हणून तुम्हीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तसे करता. यामागे हेतू एकच असतो की त्यांना अनुभव आलेला आहे तुमचे नुकसान तुम्हाला होऊ द्यायचे नसते; परंतु त्यांना जे अनुभव आले तसेच अनुभव तुम्हाला येणारच का? यावर विचार करा. कदाचित त्यांना जे जमले नाही ते तुम्हाला जमेल, तुमची पद्धत वेगळी असू शकते. क्षमता वेगळी आहेच, मग तुमचा अनुभवही वेगळाच राहणार. आपला फायदा कसा होईल याकडे पाहा.

 

यशाची कल्पना करा

 

प्रोत्साहनास उन्नतीस पोषक अशी कल्पना ही वास्तविकतेच्या स्तरावरून एक स्तर वरती असते. आपले पुढचे पाऊल आपण कसे उचलणार हे लक्षात आल्यावर आपण तेथे पोहोचण्याची कल्पना करा. तसेच आपले शेवटचे उद्दिष्ट गाठल्याची कल्पना करा. जेव्हा तुम्ही सुरुवात अंत याची कल्पना कराल तर मध्ये तुम्हाला काय करावयास हवे हेही कळून येईल. यश मिळाल्याची कल्पना केल्यास ते यश मिळवण्याची भूक वाढेल. एक प्रकारची जिद्द निर्माण होईल. यश मिळविण्याची मनाची तीव्रता वाढून एक प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होण्यास मदत होईल.

 

मेहनत चुकवू नका

 

आपणास कधी-कधी सारख्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येतो. अशा वेळी आपणास वाटते, 'काय तेच तेच? यातून काय साध्य होणार आहे?' असे होण्याचे कारण म्हणजे आपली त्वरित फळ मिळण्याची इच्छा कधी कधी वेळेचे बंधन. वेळेच्या आत आपणास काही मिळाले नाही तर आपण अस्वस्थ होतो. आपला धीर सुटतो आपण कामात दिरंगाई, हलगर्जीपणा सुरू करतो. हळूहळू ते काम बंद होते. आपल्याला जर उद्दिष्ट गाठायचे असेल तर मेहनत चुकवू नका. कामात मन लागणे एखाद दुसऱ्या वेळेस ठीक आहे; परंतु त्यामुळे आपले सर्व प्रयत्न वाया जाता कामा नये.

 

कधी-कधी आपण इतरांशी तुलनाही करतो. 'तो कमी मेहनत करतो त्यास माझ्यापेक्षा जास्त यश मिळते. आपण स्वतःकडे पाहावे. इतरांकडे बघितल्याने आपण आपल्या भावनांच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घ्याल. इतरांना कमी मेहनतीत यश कसे मिळते हे विचारात घेण्यापेक्षा आपली मेहनत आपल्याला फळ निश्चितच देईल याचा विचार करा.

 

आपले काम प्रेमाने करण्यास शिका. आपल्या कामावर प्रेम करा. असे केल्यास एक वेगळाच अनुभव तुम्हाला येईल. तेव्हा तुमचे काम हे काम राहणार नाही.

 

मेहनत करताना शारीरिक मेहनत, बौद्धिक मानसिक मेहनत यात फरक करू नका. आपल्या स्वतःला तनाने मनाने कामाच्या स्वाधीन करा. तसेच प्रत्येक वेळी तहान लागल्यास विहीरच खोदावी लागेल, असेही समजू नका. आपण केलेल्या मेहनतीवर निर्माणाची एक-एक वीट रचत चला. आपणासमोर नेहमी एखादे उद्दिष्ट ठेवा. ते पूर्ण झाल्यास नवी उद्दिष्टे ठरवा. आपल्यावर कामाचा तणाव निर्माण होणार नाही त्याचीही दखल घेऊन स्वतःला शारीरिक मानसिक विश्रांतीही देत राहा.

 

 

आत्मविश्वास कसा वाढवाल?

 

1.    ज्ञानाने भय, अज्ञानाचा अंधार दूर होतो.

2.    अनुभव नाही असे समजण्यापेक्षा नवीन कार्यात, आपण कसे सफल होऊ याचा विचार करावा.

3.    पहिले पाऊल उचलताना डगमगू नये. लक्षात ठेवा, 'हजार मैलाच्या सफरींची सुरुवात एका छोट्याशा पावलानेच होते.'

4.    ज्ञानामुळेच इच्छाशक्ती जागृत होते.

5.    स्वप्रोत्साहन

6.    यश हे मेहनतीशिवाय मिळवता येणार नाही. त्यामुळे हलगर्जीपणा, आळस टाळावा.

7.    सतत ध्येयाला समोर ठेवावे.

8.    स्वतःला प्रोत्साहित करत राहावे.

9.    मेहनत कमी करण्यास कामाची वाटणी वेळेच्या साच्यात करावी.

10.  आराम करण्यास वेगळा वेळ द्यावा.

11.  यश मिळवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून द्या.

12.  एक उद्दिष्ट साध्य झाल्यास स्वस्थ बसू नका, दुसऱ्या उद्दिष्टांचे काय याचा विचार करावा.

13.  लक्षात ठेवा, यश मिळवल्यावर समाधान होते, पण ते फार काळ टिकत नाही, कारण माणूस हा समाधानी आहे की नाही हे अजून ठरायचेय.

14.  यश हे उद्दिष्ट गाठण्याचे एक चक्र आहे. तेव्हा एक उद्दिष्ट गाठल्यावर दुसरे तुमची वाट बघणारच.

15.  ज्ञानयोगी बना शास्त्राने माणसाला तीन प्रकारच्या योगांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे.

16.  यशस्वी माणूस हा रजोगुणी किंवा सात्त्विक, सद्गुणी असतो.

17.  यशस्वी माणूस हा ज्ञानयोगी असतो.

 

भक्तियोगी - हा माणूस अतिसामान्य, सर्वसाधारण असतो. तो भोळ्या स्वभावाचा, चटकन विश्वास करणारा असतो. प्रसंगी आळशी बेजबाबदार असतो. त्यांना नेहमी सूचनांची, निर्देशनाची मार्गदर्शनाची गरज असते..

 

कर्मयोगी - हा माणूस विशिष्ट असतो. काय करावे ते सांगावे लागत नाही. एकदा समजावलं की समजात. कामालाच प्राधान्य देतात कर्मप्रिय असतात.

 

ज्ञानयोगी - हा माणूस अतिविशिष्ट, नेतृत्वगुणसंपन्न, ज्ञानवंत बुद्धिमान, दूरदृष्टी ठेवणारा बदल घडवून आणणारा, स्वतःला दुसऱ्यालाही यश मिळवून देणारा.

 

स्वतःला दुसऱ्याला प्रोत्साहित करा

 

नेतृत्वगुणांपैकी सर्वात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे प्रोत्साहन देणे. स्वतःला ध्येयाबाबत यशस्वी लोक नेहमी प्रोत्साहित करत असतात, तसेच आपल्या हाताखालील लोकांकडून कामे करवून घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्यास त्यांचे गुण, गरजा व्यवस्थित समजून घेतात. काम करवून घेण्यास चार प्रकारे प्रोत्साहन दिले जाते.

 

साम - उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून, येणारी परिस्थिती कशा प्रकारे बदलेल हे सांगून लोकांना प्रोत्साहित करा.

 

दाम - पैसा आदी प्रलोभने देऊन काम त्वरित करवून घ्या. दंड - भविष्यात होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव त्यांना करून द्या.

 

भेद - इतर लोक कसे पुढे चालले, आपण मात्र तिथेच आहात, आपली प्रगती भिन्न का? हे पटवून द्या.

 

 

लक्षात ठेवा

 

1.   नियोजनांना प्रयत्नांची जोड नसेल तर ते पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतील.

2.    आपण जे काम करीत आहात ते मनापासून करा, प्रेमाने करा, त्यातून आनंद मिळावा, ते काम काम राहणार नाही. बहुतेकदा सर्व समस्यांचे मूळ कारणआळस' असते.

3.    आळसाचे फळ त्वरित मिळते. मेहनतीचे फळ मिळण्यास वेळ लागतो.

4.    मेहनत करताना नेहमी दुसऱ्यांकडे पाहावे. आपल्याला आढळून येईल की इतर लोक आपल्यापेक्षा जास्त मेहनती आहेत आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कटिबद्ध आहेत. त्यातूनच स्वतःला प्रोत्साहित करा.

5.    स्वतःची मानसिक पातळी उंचावून आपल्या हातून चांगल्यात चांगले प्रयत्न घडतील याकडे बघावे.

 

कार्यबिंदू

 

·         मेहनत करताना आपणास आळस येतो का?

·         आपल्या ध्येयाबाबत आपण कटिबद्ध आहात का?

·         हे कशामुळे समजावे?

·         एखादे उद्दिष्ट गाठल्यावर आपल्याला किती समाधान मिळते?

·         ते किती काळ टिकते. - आपला आत्मविश्वास कसा वाढवाल?

·         स्वतःला दुसऱ्यांना कसे प्रोत्साहन द्याल?

·         तुम्ही कोणते योगी आहात, भक्तियोगी, कर्मयोगी की ज्ञानयोगी?

 

 

 

 

Post a Comment

0 Comments