कीर्तनाचा महिमा

कीर्तनाचा महिमा 

कीर्तनाचा महिमा

Photo by George Becker from Pexels
 

    ऋषी - मुनींनी भक्तीभाव वाढविण्यासाठी श्रीहरीच्या भजन कीर्तनाला उत्तम साधन सांगितले आहे . यामुळे मन पवित्र आणि निर्मळ होते . अनंत काळापासून प्रसुप्त आत्मा जागृत होतो . भक्तजनांनी या सर्वश्रेष्ठ साधनाद्वारे मनाचे समाधान मिळविणे मोठे सुगम मानले आहे . संतजनदेखील कीर्तनास अंतःकरणाला कोमल बनविण्याचे प्रभावशाली साधन सांगतात . खरोखर परमात्म - प्रेमाने ओलेचिंब झालेल्या पदांचा कीर्तनात असा स्वाद आहे , असा रस आहे , असा प्रभाव आहे जो दुसन्या मार्गात दुर्लभ आहे . 

    खूप शांत भावाने , पूर्ण प्रेमपूर्ण अंतःकरणाने प्रेममय पदांचे पावन कीर्तन केले पाहिजे . भावनापूर्ण हृदयाने भक्तीपूर्ण भजने म्हटली पाहिजे . भक्तिरसात प्रफुल्लित , प्रेमावेशात गद्गद होऊन रामानुरागरसात मग्न झाले पाहिजे . जे कीर्तन करता - करता शरीर रोमांचित होते , मन प्रफुल्लित होते , प्रेमाश्रू वाहू लागतात , प्रेमावेग येतो ते कीर्तन पूर्ण तन , मन , आणि स्नायू तसेच सर्व अस्थीजालास प्रभावित करून पावन बनविते . त्यामुळे सहजगत्या आत्मशांती मिळू लागते . 

    हृदय जेव्हा भक्तिभावाने ओलेचिंब होते , तेव्हा समाधीची सर्व साधने सुगम होतात . ज्याची वृत्ती स्थिर राहत नाही , ज्याची श्रद्धा - भक्ती जागृत होत त्याचे ध्यान - भजनदेखील भंग पावते . जर अंतर्यामी परम प्रिय रामाच्या पावनकारी नामात मनोवृत्ती स्थिर झाली तर चित्तात उद्वेग अथवा नाही , ज्यांना सन्मार्ग मिळत नाही , ज्याचा दृढ निश्चय होत नाही उदानसिनता राहत नाही . 

    कामकाज करतानाही समता टिकून राहावी . कार्य करतानाही हरिस्मरण करता येते . अशा भक्ताचे मन कार्य करतानाही विषम होत नाही . म्हणून हे प्रिय ! मुखात ठेवा रामनाम आणि हाताने करा सुंदर काम . 

Post a Comment

0 Comments