महर्षी धोंडो केशव कर्वे

 

महर्षी धोंडो केशव कर्वे


Photo from Google Images

आज मी ज्यांची माहिती सांगणार आहे त्यांचे नाव आहे धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वे या नावाने ते सर्वांना परिचित आहेत. दापोली, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून पुढे ते पुण्यात आले. फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले उरलेले आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्च करायचे ठरविले.

 

स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणे जरुरीचे असले तरी त्यासाठी आधी त्या शिकल्या पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता आणि म्हणून त्यांनी त्या दृष्टीने कार्य करण्यास सुरुवात केली. स्त्रियांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, आफ्रिका आदी देशांचा प्रवासही केला.

 

अखंड परिश्रम कार्यावरील निष्ठा यामुळे ते सतत महिलांच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील होते. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले.

 

हिंगणे अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यापीठ, निष्काम कार्यसंघ, विधवा विवाहोत्तेजक मंडळी, समता संघ, भारतीय महिला विद्यापीठ अशा अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांच्या वयाची शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी दिली.

 

'अबलांच्या उध्दारासाठी स्वत:चे जीवन झिजविणारे संत' अशा शब्दात पं. नेहरूंनी त्यांचा गौरव केला होता. नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हा ते १०४ वर्षांचे होते. त्यांचे व्रतस्थ जीवन अनेकांना आजही प्रेरणा देणारे आहे.

 

Post a Comment

0 Comments