मानव धर्म

मानव धर्म

मानव धर्म

Photo by 
Armin Rimoldi from Pexels



    ' मानव ' शब्दाचा अर्थ आहे मनुची संतान . ' मनु ' शब्दाचे मूळ आहे - मनन , मननात् मनुः । मनुंची पत्नी शतरुपा , मानव जीवनात ज्ञानाची पूर्णता आणि श्रद्धा अनेक रूपात प्रगट होते . कधी नेत्रांमधून प्रगट होते कधी हात जोडल्यामुळे प्रगट होते , कधी मस्तक नमविल्यामुळे , कधी बोलल्यामुळे आणि कोठे आदर दिल्यामुळे प्रगट होते . श्रद्धा ज्ञानाची सहचारिणी आहे . कधी एकटे ज्ञान शुष्क होते तर श्रद्धा ज्ञानाला मधुरता प्रदान करते , सद्भाव प्रदान करते , भक्ती प्रदान करते . 

    जीवनात न शुष्क ज्ञान असावे , आणि न अज्ञानयुक्त श्रद्धा . श्रद्धेत तत्त्वज्ञान व संयम पाहिजे आणि ज्ञानात श्रद्धा पाहिजे . मनु आणि शतरुपाच्या संयोगातून बनतो मानव . मानवाच्या जीवनात ज्ञान व श्रद्धेचा समन्वय पाहिजे . केवळ श्रद्धेच्या प्रधानतेमुळे तो अंध बनू नये आणि केवळ ज्ञानाच्या प्रधानतेमुळे तो उदंड व उच्छृखल बनू नये - यासाठी दोन्हीही जीवनात असणे आवश्यक आहे . 

    शास्त्रात येते की सर्व प्राण्यांमध्ये मानव श्रेष्ठ आहे , परंतु केवळ एवढ्यानेच तुम्ही मानाल की ' हो , आपण खरोखर मानव आहोत व इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत . ' - हे पुरेसे नाही . ही श्रेष्ठता सिद्ध करण्याची जबाबदारी देखील मानवावर आहे . केवळ दस्तऐवजाच्या बळावर मनुष्य श्रेष्ठ होत नाही . त्याला तर स्वतःच्या जीवन - शैली व राहणीमानावरून सिद्ध करावे लागते की : " मी मानव आहे , मानव म्हणवून घेण्यासाठी हे गुण माझ्या जीवनात आहेत आणि मानवतेपासून पतीत करणाऱ्या या या दुर्गुणांपासून मी दूर राहतो . ' 

    येथे आपण मानवतेत जे दोष प्रविष्ट होतात , त्यांची चर्चा करणार आहोत . ' मनुस्मृति ' मध्ये येते की मानवजीवनात दहा दोष किंवा पापे होऊ नयेत चार वाचा ( वैखरी ) पापे , तीन मनाची पापे व तीन शरीराची पापे . आता अनुक्रमे पाहू , 


वाचा ( वैखरी ) ची चार पापे : 

१.पुरुष भाषण अर्थात कठोर शब्द : 

कधीही कटू शब्द बोलू नयेत . कोणतीही गोष्ट मृदुता , मधुरता आणि आपल्या हृदयाचे प्रेम त्यात ओतूनच मग बोलले पाहिजे . 

कठोर शब्दांचा सर्वथा त्याग केला पाहिजे . गुरूने एका शिष्याला कोण्या घरमालकाचा तपास करण्यासाठी पाठविले . शिष्य जरा असाच होता- अर्धवट लक्षणाचा . त्याने घरातील महिलेस विचारले 

" ए बाई ! तुझा पती कुठे आहे ? " महिला क्रोधित झाली आणि चेल्याला हाकलून दिले . मग गुरुजी स्वतः जाऊन म्हणाले : " 

माताजी ! तुमचे श्रीमान पतिदेव कोठे आहेत ? 

" ती महिला त्यांना आदराने बसवून म्हणाली : " पतिदेव आता घरी येतीलच . 

' दोघांनी एकच गोष्ट विचारली ; परंतु विचारण्याची पद्धत वेगळी होती . 

अशा प्रकारे कठोर बोलणे हे वैखरीचे एक पाप आहे . वैखरीचा हा दोष मानवतेपासून पतीत करवितो . 


२. अनृत अर्थात् आपल्या माहितीच्या विपरित बोलणे : 

आपल्याला जे माहीत आहे ते नाही बोललात , मौन राहिलात तरी शकेल ; परंतु जे बोललात ते सत्यच असले पाहिजे , आपल्या ज्ञानानुसार असले पाहिजे . आपल्या ज्ञानाचा कधी अनादर करू नये , तिरस्कार करू नये.जेव्हा आपण एखाद्यासमोर खोटे बोलतो , तेव्हा त्याला आपण फसवित नाही तर आपल्या ज्ञानालाच फसवितो , स्वतःच्या ज्ञानाचाच अपमान करतो . त्यामुळे ज्ञान रागावते , नाराज होते . ज्ञान म्हणते की ' हा तर मला खोटेपणाच्या पडद्याखाली झाकतो , मला दाबून टाकतो ; तर मग याच्याजवळ का राहू ? ' ज्ञान झाकले जाते . अशाप्रकारे असत्य बोलणे हे वैखरीचे पाप आहे . 


३.पैशुन्य अर्थात् चुगली करणे : 

इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे सांगणे . काय तुम्ही एखाद्याचे दूत आहात की अशा प्रकारे संदेशवाहकाचे कार्य करीत आहात ? चुगली करणे आसुरी संपत्तीच्या अंतर्गत येते . यामुळे कलह निर्माण होतो , दुर्भावना उत्पन्न होते . चुगली करणे हे वैखरीचे तिसरे पाप आहे . 


४. असंबद्ध प्रलाप अर्थात असंगत भाषण : 

प्रसंगाच्या विपरित बोलणे . जर विवाहाच्या गोष्टी बोलत असाल , तर तेथे मृत्यूचा विषय काढता कामा नये . जर मृत्यूच्या प्रसंगाची चर्चा सुरू असेल , तर तेथे विवाहाविषयी बोलू नये . अशाप्रकारे मानवाच्या बोलण्यात कठोरता , असत्यता , चुगली आणि प्रसंगाविरुद्ध संभाषण - हे चार दोष असता कामा नये . या चार दोषांनी युक्त वचन बोलणाऱ्यास पाप लागते . 


मनाची तीन पापे : 


परद्रव्येष्यभिध्यानं मनसानिष्टचिन्तनम् । 

वितथाभिनिवेशश्च त्रिविघं कर्म मानसम् ।। 


१. दुसऱ्याच्या धनाचे चिंतन करणे : 

दुसऱ्याकडे एवढे धन आहे . ते कसे हडप करावे ? याचे चिंतन करू नये . तर स्वतः परिश्रम करावे , द्रव्य मिळवावे , आदान - प्रदान करावी , विनिमय करावा . दुसऱ्याच्या धनाची चिंता करीत राहिलात तर मन हेवा करू लागेल . परिणामस्वरूप न जाणो ते कसे कुकर्म करावयास लावेल ! दुसऱ्याच्या धन - वैभवाचे चिंतन करणे मानसिक पाप आहे , त्यापासून वाचावे . 


२. दुसऱ्याच्या अनिष्टाचे चिंतन करणे : 

असे कधी समजू नका की केवळ मनात असा विचार आल्याने कोणतेही पाप लागत नाही . नाही , मनात दुसऱ्यांच्या हानीचा विचार केल्यानेही पाप लागते ; कारण मनात संकल्प होतो तेव्हा त्याचे मंथनदेखील होऊ लागते . शरीरातही तशीच रसायने बनू लागतात आणि तशाच क्रिया होऊ लागतात . एखाद्यासाठी अनिष्ट विचार आला तर समजा की तुमच्या मनात पापाचे बीज पेरले आहे ! ते अकुंरित होऊन हळूहळू वृक्षही होऊ शकतो , तुम्हाला पापपरायण बनवू शकतो . म्हणून एखाद्याला त्रास होईल असा मनात विचारही करू नये . हे मानसिक पाप आहे , यापासून सावधानीपूर्वक वाचले पाहिजे . 


३. वितथाभिनिवेश : 

जी गोष्ट आपल्याला ठाऊक नाही तिला सत्य मानणे . तशी मान्यता बनविणे हे मनाचे तिसरे पाप आहे . सत्य काय आहे ? अबाधित्वं सत्यत्वं । ज्याचा कधी बाध होत नाही ते आहे सत्य . आपल्याला ते सत्य ठाऊक नाही , परंतु माहीत असल्याचे भासवू लागतो . आत्मरामी संतांचा अनुभवच सचोट असतो , बाकी तर सर्व लोक मन - इंद्रियांच्या जगात आपापल्या मत - पंथ सांप्रदायांना महत्त्व देऊन स्वतःची मान्यता पुष्ट करतात . सत्य मान्यतांच्या आधारावर टिकलेले नसते ; परंतु जे समस्त मान्यता मानते , त्या मनाला जेथून सत्तास्फूर्ती मिळते , तो आहे अबाधित सत्यस्वरूप आत्मदेव . त्यातच महापुरुषांनी विश्रांती प्राप्त केलेली असते आणि त्या महापुरुषांची वचने प्रमाणभूत मानली जातात , ज्यांना शास्त्रात ' आप्तवचन ' म्हटले जाते . ज्या धर्मात अशा ब्रह्मवेत्त्यांचे मार्गदर्शन घेतले जात नाही , त्या धर्म सांप्रदायचे लोक जड मान्यतांमध्येच जखडून जिद्दी आणि जटिल होतात . ही जिद्द आणि जटिलता मनाचा तिसरा दोष आहे . दुसन्याला अंतज्योत  तुच्छ मानणे , जिद्दी व जटिल राहणे हे या दोषाची लक्षणे आहेत . 


शारीरिक तीन पाप : 


अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः । 

परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ।। 

    दुसऱ्यांचा हक्क घेणे , अवैधानिक हिंसा करणे , परस्त्रीचा संग | करणे- ही तीन शारीरिक पापे म्हटली जातात . ' जो स्वतः मनुष्य असल्याचा दावा करतो , अभिमान करतो , मानव असल्याचा अहंकार करतो त्याने या तीन पापांचा विचार करून त्यांच्यापासून वाचले पाहिजे . 


१. लोभकृत पाप : 

    तुमच्याजवळ ज्या - ज्या वस्तू आहेत , त्या तुमच्या हक्काच्या असल्या पाहिजेत . माता - पित्यातर्फे वडिलोपार्जित स्वरूपात मिळालेली असेल , स्वतःच्या परिश्रमाने न्यायपूर्वक मिळविली | असेल , खरेदी केलेली असेल , एखाद्याने दिलेली असेल अथवा एखाद्याने राज्यावर विजय प्राप्त करून मिळविलेली असेल तर ठीक आहे ; परंतु एखाद्याची वस्तू त्याच्या अनुमती अथवा माहितीशिवाय  घेणे हे शारीरिक पाप आहे . जी वस्तूतुमच्या हक्काची नाही , जी तुम्हाला दिलेली नसेल अशी वस्तू हडप करणे हे लोभकृत पाप आहे . 


२. क्रोधकृत पाप : हिंसा चैवाविधानतः 

    जे धर्मानुसार आणि संविधानानुसार नाही , असे कृत्य करणे हे शारीरिक पाप आहे . ज्याद्वारे तुमची व तुमच्या शेजाऱ्यांची , दोघांची लौकिक , पारलौकिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल , त्यात अडथळा येणार नाही , असे कर्म धर्म आहे . अशा धर्माला भंग करणे हे पाप आहे . हिंसा दोन प्रकारची असते : कायदेशीर व बेकायदेशीर . जेव्हा क्रूर मनुष्य एखाद्याला फाशीवर चढवितो , सैनिक आक्रमणकारी शत्रूदेशाच्या सैनिकांवर बंदूक चालवितो तर ही कायदेशीर हिंसा अपराध मानला जात नाही ; उलट त्यासाठी पगार दिला जातो . आपल्या शास्त्रीय घटनेविरुद्ध जी हिंसा आहे ती आपल्या जीवनात नसली पाहिजे . मानवतेला सुदृढ बनविण्यासाठी , सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गौरवान्वित करण्यासाठी आपल्या जीवनाद्वारे , शब्दांद्वारे व संकल्पाद्वारे कोणाला कष्ट होता कामा नये हे लक्षात ठेवले पाहिजे . आपण जे करतो , जे काही बोलतो , जे काही घेतो , जे काही भोगतो त्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची यथासंभव काळजी घेतली पाहिजे . हे मानवतेचे भूषण आहे . 


३. कामकृत पाप : 

    परस्त्रीबरोबरचे संबंध हे कामकृत पाप आहे . 

न ही दृशं अनावश्यं लोके किंचन विद्यते । 

    पर स्त्री सोबत ठेवलेल्या संबंधापेक्षा मोठा असा शारीरिक रोग देणारा , मृत्यू देणारा , आयुष्य क्षीण करणारा दुसरा कोणताही दोष नाही . मानवी मर्यादेचे हे उल्लंघन आहे . ही मर्यादा मनुष्याचे खास वैशिष्ट्य आहे . पशू , पक्षी , देव अथवा दैत्यांमध्ये ही मर्यादा नसते . जसे लोभ एक विकार आहे , क्रोध एक विकार आहे ; तसेच काम देखील एक विकार आहे . हा पूर्वीपासूनच परंपरेने चालत आलेला आहे . माता - पिता , आजी - आजोबांच्या मनातही हा होता . या प्राकृतिक प्रवाहाला मर्यादित करण्याचा उपाय अन्य कोणत्याही योनीत नाही . मनुष्य जीवनातच उपाय आहे की विवाह - संस्काराद्वारे माता - पिता , सासू - सासरे आणि अग्नीला साक्षी मानून विवाहाचा संबंध जोडला जातो . त्या विवाहानतंरच पती - पत्नी यज्ञाचे अधिकारी होतात . ' पत्नी ' शब्दाचाही या अर्थात उपयोग केला जातो - ' पत्युनो यज्ञसंयोगे । ' यज्ञात , धर्मकार्यात जी सहधर्मिणी होते , सहचारिणी होते ती आहे पत्नी . हा पवित्र विवाह - संस्कार धर्माच्या दृष्टीने मानवाला सर्वोत्कृष्ट , संयमी आणि मर्यादित बनवितो . ज्यामुळे मानवतेचे रक्षण होते , त्या आचार , विचार , विधी , संस्कार आणि मर्यादांचे पालन मनुष्याने अवश्य केले पाहिजे . 

    मर्यादा म्हणजे काय ? ' मर्यि ' अर्थात मानव जिला धर्मानुसार , ईश्वरीय संविधानानुसार आत्म - दृष्टीने , मानवतेच्या दृष्टीने स्वतःच्या मर्यादाहीन जीवनात स्वीकार करतो . ज्यात कोणतीही मर्यादा नाही त्या जीवनाला मनुष्य - जीवन नव्हे , पशू - जीवन म्हटले जाते . येथे आपण मानवतेला दूषित करणाऱ्या गोष्टींची मीमांसा केली | त्यांच्यापासून सावधपणे स्वतःचा बचाव केला पाहिजे . आता मनुष्यतेला उज्ज्वल करणाऱ्या गोष्टींचा विचार करूया . या गोष्टींना , मानवतेच्या या वैशिष्ट्यांना समजून घ्यावे . धर्म कोणाकडून उधार आणायचा नसून तो तर आपल्या अंतरातच आहे , त्याला प्रगट करावे लागते . हिऱ्यात . चमक बाहेरून भरावी लागत नाही ; परंतु हिन्याला घासून त्यातील चमक प्रगट करावी लागते . 


धर्मातील चारगोष्टी : 


१. अनुशासन ( शिस्त ) : 

    धर्मात पहिली गोष्ट ही आहे की तो मनमाना असूनये.शास्त्र व गुरूंच्या अनुशासनाशिवाय ज्याला स्वतःच्या मनानेच धर्म मानतात , तो धर्म अहंकार वाढविणारा असतो व चुकीच्या मार्गावर घेऊन जातो . अभिमान अशाच चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो . मनमुख होऊन स्वीकार केलेला धर्म सफलता मिळाल्यावर अहंकार वाढवितो आणि असफलता मिळाल्यावर दुसऱ्यांवर दोषारोपणाची कुबुद्धी जागी करतो . धर्मात अनुशासन ( शिस्त ) असणे अत्यंत जरूरी आहे . ते अनुशासन मग शास्त्रांचे असो , सद्गुरूंचे असो , माता - पित्याचे असो किंवा अन्य कोणत्याही सूज्ञ हितैषीचे असो ; परंतु अवश्य असले पाहिजे .. एखाद्याच्या अनुशासनात एखादे कार्य केले जाते तेव्हा यश मिळल्यावर कुबुद्धी होत नाही . अभिमान होत नाही व अपयश मिळाल्यावर दुसऱ्यांवर दोषारोपण्याची 


२. आश्रय : 

धर्मात दुसरी गोष्ट आहे आश्रयाची . ईश्वराचा आश्रय घेऊन ज्या धर्माचे आचरण करतो त्यापासून आपली क्रियाशक्ती टिकून राहील , क्षीण होणार नाही . एखादा मोठा आश्रय नसेल तर मनात सफलतेविषयी शंका निर्माण होते , कार्य पूर्ण होण्यात संशय येतो . कार्याच्या परिणामात संशय आल्यामुळे निष्क्रियता येते , आपली शक्ती क्षीण होते . म्हणून अनुशासनाबरोबर धर्मात ईश्वर आणि सद्गुरूंचा आश्रय आवश्यक आहे . 


३. संयम धर्मात तिसरी गोष्ट येते - 

अमर्यादित रूपात वाढणाऱ्या वासनेला रोखणे , अर्थात संयम करणे . जे लोक स्वतःच्या जीवनात कोणतीही मर्यादा न ठेवता वासना वाढवितात , ते अतिशय दुःखी होतात . उदा . एखाद्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे . त्याचे उत्पन्न वाढले तर वासनादेखील वाढली आणि खर्चाचे रंग - ढंगदेखील वाढले . वार्षिक खर्च तीन लाखापर्यंत पोहोचला ; परंतु उत्पन्न दीड लाख झाले . तीन लाखाचा खर्च दीड लाखावर आणणे कठीण झाले , म्हणून आशा व इच्छा एकदम वाढविता कामा नये . एकाएक अशी आशा करू नये की ज्यामुळे अर्धे काम झाल्यावर सुख मिळण्याऐवजी अर्धवट कार्य होण्याचे दुःख सतावू लागेल . 

४. उत्तम कर्म : 

धर्मात चौथी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे : ' मीच धर्म पूर्ण करेन . ' असे मानून एखाद्या धर्माचा प्रारंभ करू नये . " मी करेन , माझे भाऊ करतील , माझी मुले करतील . एखादे उत्तम धर्मकार्य माझ्याद्वारे पूर्ण झाले तर चांगली गोष्ट आहे . ते कार्य इतर लोकांद्वारे पूर्ण झाले तरीही एषणीयच आहे . एखादे कार्य ' केवळ माझ्यासाठीच चांगले आहे . ' असा निर्णय करूनच करू नये . ' जो कोणी व्हाही हे कार्य करेल , तेव्हा ते कार्य त्याच्यासाठीही चांगलेच असेल . ' अशा प्रकारे कर्माच्या स्वरूपाच्या उत्तमतेचा बोध झाला पाहिजे . स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणायचे होते . अंशुमान राजाने पुरुषार्थ केला , कार्य पूर्ण झाले नाही . 

    अंशुमानच्या पुत्राने कार्य चालू ठेवले ; परंतु  त्याचेही जीवन पूर्ण झाले. गंगेला पृथ्वीवर आणणे- हे उत्तम कार्य होते तेव्हा तिसऱ्या पिढीतील भगीरथाने ते कार्य पूर्ण केले . जर अंशुमान राजाने विचार केला असता की , ' हे कार्य माझ्या जीवनकाळात पूर्ण होईल असे नाही आहे . तर कार्याचा प्रारंभदेखील झाला नसता . 


प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः । प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः ।। 

विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना । प्रारभ्य चोत्तमजना न परित्यजन्ति ।। 


    ' कार्यात विघ्न येईल ' अशा भीतीने कार्याची सुरुवात न करणे हे हीन पुरुषाचे लक्षण आहे . मध्यम पुरुष कार्याची सुरुवात तर करतो ; परंतु मध्येच विघ्न आल्यावर कार्य सोडून देतो . उत्तम पुरुषाचे हे लक्षण आहे की वारंवार विघ्न आले , आघात झाले , जखमी झाला तरीही कार्य अर्धवट सोडत नाही . त्याच्या दृष्टीने जर कार्य उत्तम असते त्यात येणाऱ्या विघ्नांची तो पर्वा करीत नाही . आपण जे सत्कार्य करतो , त्यातून आपल्याला काही मिळेल हे जरूरी नाही . एखाद्या सत्कार्याचा उद्देश आपल्या सवयी चांगल्या बनविणे आहे . आपल्याला सवयी चांगल्या लागाव्यात , स्वभाव शुद्ध , मधुर असावा आणि उद्देश शुद्ध आत्मसुख प्राप्त करण्याचा असावा , जीवन निर्मळ बनावे या उद्देश्यानेच सत्कार्य केले पाहिजे . 

    एखाद्याला पाणी पाजले , भोजन दिले आणि बदल्यात २५-५० रुपये मिळाले - हे चांगले कार्य केल्याचे फळ नाही . चांगले कार्य करण्याचे फळ हे आहे की आपल्याला चांगल्या सवयी लागाव्या . एखादे बक्षीस मिळाले तरच सुखी होऊ काय ? तहानलेल्यास पाणी व भोजन देणे हे कार्य मुळातच इतके चांगले नाही काय की ते कार्य करताच  भुकेलेल्यास आपल्याला सुख मिळणार नाही ? आहेच . उत्तम कार्य करण्याचा परिणाम चित्तात जी प्रसन्नता येते , निर्मळतेचा अनुभव येतो त्यापेक्षा निर्मळता आहे , अंतःकरणाची शुद्धी आहे की कार्य करताच प्रसन्न येते म्हणून जे कार्य केल्याने आपले चित्त प्रसन्न होते , जे कार्य शास्त्रसंमत आहे . महापुरुषांद्वारे अनुमोदित आहे , त्याच कार्यास धर्म म्हटले जाते . मनु महाराज म्हणतात : 

यत्कर्म कुर्वतोऽस्य स्यात् परितोषोऽन्तरात्मनः । 

तत्प्रयत्नेन कुर्वीत विपरीतं तु वर्जयेत् ।। 

    ' ज्यामुळे अंतःकरण निर्मळ होते , हृदय परितृप्त होते , ते कार्य प्रयत्नपूर्वक केले पाहिजे ; त्याच्या विरुद्ध कार्याचा त्याग केला पाहिजे . 

    ' जसे सरोवराला मिळालेले अशुद्ध पाणी सरोवराशी एकरूप होऊन निर्मळ होते , त्याचे तरंग शांत होतात , तसेच सत्कृत्य करीत करीत आपले मन निर्मळ होऊ लागते , शांत होऊ लागते - हे सर्वात मोठे फळ आहे . कार्याच्या बदल्यात दुसरे काही प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवणे हा तोट्याचा धंदा करण्यासमान आहे . तात्पर्य हे आहे की कर्मात अनुशासन असले पाहिजे - हा आहे बुद्धीसाठी आश्रय . 

    कर्मात मोठ्यांचा आधार असला पाहिजे - हा आहे श्रद्धेसाठी आश्रय , कार्य चांगल्या त - हेने पूर्ण केले पाहिजे . आपण जे - जे कार्य करतो , त्याच्यात आपल्याला संतोष वाटला पाहिजे . मानवी - जीवन कर्म आणि ज्ञानाच्या समन्वायानेच व्यवस्थित चालते . आपण नेत्रांद्वारे पाहतो ते ज्ञान आहे , पायांद्वारे चालतो ते कर्म आहे . आपण जितके - जितके पुढे पाहू , तितके - तितके चालू शकू . जसजसे चालत जाऊ , तसतसे पुढे दिसत जाईल , अशाप्रकारे कर्म व ज्ञानाच्या समन्वायानेच जीवन - रथ परम लक्ष्याकडे अग्रेसर होत असतो . जीवनात केवळ कर्म असेल तर जीवन यंत्रवत बनेल आणि केवळ ज्ञान असेल तर जीवनात अकर्मण्यता येईल . 

    म्हणून जीवन जर योग्य पद्धतीने जगायचे असेल तर ज्ञान आणि कर्माचा समन्वय करून जगले पाहिजे . जीवनात एवढी भावुकता नसावी की आपली समजदारीच विसरून । जावे ! जीवनात भावुकता असू द्या , प्रेम असू द्या , भक्ती असू द्या ; परंतु अति भावुकता , अति पक्षपात नसावा की ज्यामुळे विवेकच संपुष्टात येईल . विवेकशून्य झाल्यामुळे तर मोठी हानी होते . अशी बुद्धिहीन ।

अंतर्योत भावुकता तर पशृंमध्येही पाहावयास मिळते . म्हणून सदैव सावधपणे व बुद्धीपूर्वक जीवन सरितेचा प्रवाह प्रवाहित झाला पाहिजे .

Post a Comment

0 Comments