नमस्काराचा महिमा

नमस्काराचा महिमा 

नमस्काराचा महिमा

Photo by Ric Rodrigues from Pexels

    दररोज सकाळ - संध्याकाळ माता - पिता आणि गुरुजनांना नमस्कार केला पाहिजे . नमस्काराचा अपार महिमा आहे . अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः । चत्वारि तस्य वर्द्धन्ते आयुर्विद्यायशोवलम् ॥ जो दररोज वडिलधाऱ्यांची सेवा करतो , त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार वर्तन करतो त्याचे आयुष्य , विद्या , यश आणि बळ चारही वाढते . मृकंडू नावाचे ऋषी होते . त्यांचे पुत्र होते मार्कडेय . ते बालपणापासूनच पित्याच्या संस्कारानुसार माता - पिता , गुरुजन आणि संत - महात्म्यांना नमस्कार करीत असत . एकदा एक सिद्ध महात्मा त्यांच्याकडे आले . पिता बालक मार्कंडेयला म्हणाले : " बाळ ! या महाराजांना प्रणाम कर . बालक मार्कंडेयाने वाकून चरणस्पर्श केला आणि सिद्धपुरुषाची चरणरज मस्तकाला लावली . 

    महात्मा त्या बालकाकडे एकटक पाहत राहिले , जणूकाही त्याच्या भावी जीवनावर दृष्टिपात करीत आहे ! त्यांनी विचारले : " " महाराज ! तुम्ही अशा प्रकारे एकटक काय पाहत आहात ? " " बालक तर सुंदर आहे ; परंतु आयुष्य खूपच कमी आहे . " एवढे बोलून त्या सिद्धपुरुषाने पुन्हा विषादपूर्ण नेत्रांनी बालकाकडे न्याहाळले .

    ऋषी तर त्यांच्या लाडक्या पुत्राविषयी ही दुःखद गोष्ट ऐकून गोंधळून गेले ! त्यांनी हात जोडून महात्म्याला विनंती केली : " प्रभो ! यावर एखादा उपाय ? " " जे - जे संत - महापुरुष येतील , ऋषी - मुनी येतील त्यांच्या चरणी या बालकाकडून नमस्कार करवून घ्या . " हे सांगून सिद्धपुरुष निघून गेले . मृकंडु ऋषी तसेव करू लागले . एके दिवशी सप्तर्षीचे आगमन झाले . 

    पिता बालकाला प्रेमाने म्हणाले : " बाळ ! ऋषींना नमस्कार कर . ' मार्कडेयांनी खूप भावपूर्वक नमस्कार केला.सप्तर्षीनी बालकाच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला : “ चिरंजीवी हो . ' पिताम्हणाले : " महाराज ! याचे आयुष्य कमी आहे आणि याला तुमच्याद्वारे चिंरजीवी होण्याचा आशीर्वाद मिळाला आहे . प्रभो ! आता तुमच्या आशीर्वादाच्या अनुकूलहोण्यासाठी आम्ही काय केल पाहिजे ? " " आता असे करा , या बालकाला भगवान शंकराच्या सेवेत , पूजा आराधना - उपासनेत मग्न करा . 

    सर्वकाही ठीक होईल . ' मृकंडू ऋषींनी बालक मार्कडेयला देवाधिदेव महादेवाच्या उपासनेत - आराधनेत प्रवृत्त केले . निर्दोष बालक मार्कंडेय महादेवाच्या सेवा - पूजेत मग्न झाला . पहाटे लवकर उठून , स्नानादीने पवित्र होऊन तो शिवलिंगाला स्नान घालीत असे . बेलपत्र , फळे - फूले , धूप - दीप , नैवेद्य इ . दाखवून प्रार्थना करीत असे . आसनावर बसून माळेवर ' ॐ नमः शिवाय ' चा जप करीत असे , ध्यान करीत असे , स्तुती - स्त्रोत्र पाठ करीत असे . अशा प्रकारे दिवसामागून दिवस गेले . मृत्यूची वेळ येऊन ठेपली होती . काळ्या विकराळ रेड्यांवर रक्तवर्ण यमराज प्रगट झाले . त्यांना पाहून बालक भयभीत झाला . 

    घाबरून भगवान शंकराच्या लिंगाला मिठी मारून म्हणू लागला : " हे भगवंता ! हे यमराज आले आहेत . वाचवा ... वाचवा . " भगवान शंकर हातात त्रिशूळ घेऊन प्रगट झाले आणि यमराजाला म्हणाले : " या बालकाला कोठे घेऊन जात आहात ? "  यमराज : " महाराज ! याचे आयुष्य पूर्ण झाले आहे . सृष्टीच्या मी माझ्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आलो आहे . " " अरे यमराज ! जरा पहा तरी आपल्या वहीखात्यात ... याचे क्रमानुसार M आयुष्य कधी पूर्ण होते ते ? " यमराजाने वहीखाते पाहिले तेव्हा बालकाच्या खात्यात दीर्घ आयुष्य जमा असलेले पाहिले . सृष्टीचा संहार करणारे देवाधिदेव योगेश्वर पशुपतिनाथ ज्याचे रक्षण करतात त्याचे कोणीही वाईट कसे करू शकेल ? " चल , पळ येथून . " रुद्र गरजले . 

    यमराजाने निरोप घेतला . मार्कडेय चिंरजीवी झाले . कोणाच्या प्रभावाने ? नमस्काराच्या प्रभावाने . असा महिमा आहे नमस्काराचा ! 

नमस्कार से रामदास , कर्म सभी कट जाय । 

जाय मिले परब्रह्म में , आवागमन मिटाय ।। 

    दररोज सकाळी माता - पिता आणि पूजनीय - आदरणीय गुरुजनांना नमस्कार करा , प्रणाम करा . त्यांचे आशीर्वाद घ्या . मोठे भाऊ , मोठ्या बहिणीलाही नमस्कार करा . घरात जर मोठ्या लोकांनी या नियमाचा स्वीकार केला तर लहान मुलेदेखील आपोआप त्यांचे अनुसरण करतील . परस्पर नमस्कार केल्याने कुटुंबातील दिव्य भावना प्रबळ झाल्या तर भांडणे - तंटे आणि कटुता राहणार नाही . योगायोगाने जर एखादी खटपट झाली तरी जास्त वेळ टिकणार नाही . कुटुंबाचे जीवन मधुर बनेल . परमार्थ - साधना सरळ होईल . 

Post a Comment

0 Comments