नरदेह स्तवन

नरदेह स्तवन 

नरदेह स्तवन

Photo by Pixabay from Pexels


।। श्रीराम ॥ 

    हा नरदेह खरोखरच धन्य आहे । धन्य आहे ! याची अपूर्वता पहा । जो जो परमार्थ आवडीने करावा तो तो , या नरदेहानेच सिद्धीस जातो . या नरदेहाच्या साह्यानेच कोणी भक्तिमार्ग धरला , तर कोणी वीतरागी गिरिकंदरांचा आश्रय करून राहिले । तीर्थयात्रा , पुरश्वरणे , नामस्मरणे , तप , योगाभ्यास , वेदशास्त्रांचा अभ्यास , हठयोग , भावनाबळाने देव वश करणे हे सर्व या नरदेहानेच लोकानी केले ! सर्व सिद्धी नरदेहाच्या साह्यानेच प्राप्त होतात . नवविधा भक्ति परलोक साधन , योगाचरण , ब्रह्मलोकी गमन , वैकुल , सत्यलोक , कैलास , स्वर्ग , पितृलोक , नक्षत्रलोक , क्षीरसागर इत्यादि श्रेष्ठ गती नरदेहाच्या साह्यानेच लोकानी प्राप्त केल्या ! चारी मुक्ती नरदेहातूनच प्राप्त होतात ! या नरदेहाच्या आधारानेच स्वहितास प्रवृत्त झाले . 

    पशुदेहांत उत्तम गती नाही हे सर्वश्रुतच आहे . नरदेहात जन्म घेऊनच प्राणी ऊर्ध्वगतीस पावले आहेत यात काही संशयाला जागाच नाही . नरदेह स्वाधीन आहे , पराधीन नाही . पशु , अश्व , वृषभ , इत्यादिकांस सोडून दिले तरी त्याना दुसरा कोणी बंधन घालतो पण नरदेहाला स्वातंत्र्य आहे . अहो | असा हा धन्य नरदेह प्राप्त झाल्यावर तो परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा , या देहाचा सदुपयोग केला तर यमयातनेचे अरिष्ट चुकविता येते . या नरदेहात जर पागळेपणा , थोटेपणा , अंधत्व , बधिरत्व , मुकेपणा , अशक्तपणा . रोगटपणा , इत्यादि शारिरिक व्यगे असली तर तो मात्र पोपकाराम किंवा परमार्थास तितकासा उपयोगी होत नाही . आणि मूर्खपणा , मानसिक विकृती , फेफरे वगैरेमुळे तर तो निरूपयोगीच ठरतो . पण जर तो अव्यग असेल , तर मनुष्याने तत्काळ परमार्थ- मार्ग घरला पाहिजे . अव्या शरीर व चागली बुद्धि असून जो परमार्थ करीत नाही तो मूर्ख ! असे केवळ " मी आणि माझे पान गतलेले लोक माती खणून घर बाधतात आणि हे माझे घर असे म्हणून मोर अभिमान घातात ! पण त्यांची त्या घरावर कितीशी सत्ता असते ?

    उंदीर , पाली , माशा , कातीणी , मुगळे , मुंग्या , इत्यादी क्षुद्र प्राणी व मोठे पशूही त्या घरावर आपला हक्क आहे असे मानून खूशाल वावरतात ! पशु . पक्षी , दास , दासी , घरांतील मंडळी , पाहुणे , मित्र , ग्रामस्थ , चोर , राजकीय अधिकारी , अग्नी , हे सर्व त्या घरावर आपला हक्क सांगत असतात ! हे सर्व " माझे घर ' असे म्हणतात आणि प्रापंचिक मनुष्य मूर्खपणाने " हे घर माझे एकट्याचे आहे " असे म्हणतो ! मग कालांतराने तो विदेशी जातो . ते घर सोडून देतो . जेव्हा त्या गावातही वस्ती रहात नाही तेव्हा काय होते ? तेथे अरण्य माजते ! घरे पडून वृक्ष वाढतात . 

    श्वापदे , किडे , मुंग्या , वाळवी , उंदीर इत्यादी खुशाल राहतात ! अहो ! त्यांचेच ते घर असते ! हा मूर्ख बापडा उगीच माझे माझे म्हणून निघून जातो ! जन्म म्हणजे दोनचार दिवस ! कोठेतरी वस्ती करावी ! गृहाची स्थिती मिथ्या आहे . तेथे ममत्व काय कामाचे ? आणि नरदेह तरी आपला म्हणावा काय ? त्याची उत्पत्ति सुद्धा बहुताच्या साठी झाली आहे . या शरीराच्या आधाराने किती जीव पोट भरतात पहा ! मस्तकात उवा ! केसांच्या मुळांत व जखमेत किडे ! पोटात जंत ! दातांना कीड ! कानाडोळ्यांना कीड ! गोमाशा , जळवा , मच्छर , मुंगे , गांधीलमाशा चावतात . 

    गोम , विंचू , सर्प , फुरसे , यांचे दंश तर होतातच | मोठ्या कौतुकाने देह वाढविला , तो वाघाने खाल्ला , लांडग्यांनी भक्षण केला किंवा मरण ओढवले असे होत नाही काय ? चोर दरोडेखोर या देहाला झोडपतात , भुते पिशाचे याला पछाडतात - हा देह आपला एकट्याचा म्हणणे म्हणजे मूर्खपणाच नव्हे काय ? हे शरीर तापत्रयांचे खाद्य आहे बहुताचे आहे ! ते परमार्थी लावले , वेळच्यावेळी त्याचे सार्थक करून घेतले तरच योग्य ! पण जे “ मी व माझे यात गुंतलेले असतात , त्याना परमार्थ सुख काय कळणार ? त्या मूर्खाची ओळख करून नागापाठी आता काही लक्षणे पुढे सागणार आहे .

Post a Comment

0 Comments