निरोपाच्या क्षणी

निरोपाच्या क्षणी 

निरोपाच्या क्षणी

Photo by Ketut Subiyanto from Pexels

    एखाद्याची धन - संपत्ती , पद - प्रतिष्ठा पाहून तशीच इच्छा करणारी व्यक्ती अथवा ते भोगण्याविषयी ईर्ष्या करणारी व्यक्ती स्वतःलाच मायेच्या भोवऱ्यात फसविते . एखाद्याचे रूप - लावण्य , धन - सत्ता इ . ची आकर्षक थाटमाट पाहून ' ते मला कधी मिळेल ? ' अशी इच्छा न ठेवता ' त्यातही सुख - सत्ता मीच भोगत आहे . ' असा आत्मभाव करावा . 

    एखाद्याची ईर्ष्या करू नका . कोणापुढे संकोच करू नका . तुच्छ इच्छा करू नका . आत्मदृष्टी करून आपल्या अखंड , नित्य , शुद्ध - बुद्ध आत्मदेवाला प्राप्त करण्याचा दृढ संकल्प करा . शिबिरात तुम्ही जे मिळविले आहे ते वाढवित जा . 

    ते आत्मसात करण्यासाठी दिवसातून दोन - पाच वेळा , प्रत्येक दोन - पाच तासात ‘ जगत स्वप्नवत् आहे आणि माझा आत्मा नित्य मुक्तस्वरूप आहे . अंतर्यामी प्रभूशी माझा शाश्वत संबंध आहे . ' - या शाश्वत संबंधाचे स्मरण करून नश्वर जगाची आसक्ती - ममता - अहंतेच्या मुळाला उपटून टाका . गाफील राहू नका . जीवनाचा सूर्यास्त होण्यापूर्वी जीवनदात्याचा साक्षात्कार करण्याचा उत्साह जागृत ठेवा . ॐ ... ॐ ... ॐ ... भाऊ ! 

    भोगाच्या केवळ इच्छेने असत्य , कपट , चोरी , बेईमानी , दगा , ईर्ष्या , द्वेष इ . दोष येऊ लागतात आणि प्रभूप्राप्तीच्या केवळ इच्छेने ज्ञान , वैराग्य , भक्ती , नम्रता , सहनशक्ती , खरेपणा इ . सद्गुण येऊ लागतात . म्हणून भोगेच्छा नाही , तर प्रभू प्राप्तीची इच्छा तीव्र बनवा . ज्ञान , वैराग्यवर्धक साहित्याचे पठण - मनन करा . 

    ऋण काढून सण साजरा करू नका . चांगले म्हणवून घेण्यासाठी विवाह , वाढदिवासाच्या पार्टीमध्ये खूप खर्च करून आणि आलिशान बंगले तसेच गाड्या घेऊन कर्ज फेडायची चिंता डोक्यावर घेऊ नका . खोटा थाट - माट , अवडंबर व भोग - विलास आणि व्यक्तिगत रूपात होऊ शकेल , तितका कमी खर्च करा . 

    दररोज आठ - दहा प्राणायाम करा आणि थोडा आसनांचा अभ्यास करा . शुद्ध भोजन घ्या . भोजनाच्या वेळी प्रथम परमात्म - स्वरूपाचे चिंतन करा , नंतर भोजन करा . अशी कोणी मनुष्य नाही ज्याचा मृत्यू होणार नाही . अशी एखादी वस्तू नाही जिचा वियोग होणार नाही . 

    असा एखादे देश - देशांतर , लोक-लोकांतर नाही जे प्रलयापासून वाचेल . म्हणून अनित्याची आसक्ती सोडून नित्यमुक्त आत्मस्वरूपात स्थिर होण्यासाठी जो सावध राहतो त्याचे जीवन सफल होत , त्याचाच जन्म धन्य आहे ! 


जागे व्हारेजागे व्हा ... 


अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे । 

इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजम् ॥ 


    ' हे माझे भोजन , हे माझे वस्त्र , ही माझी पत्नी , हे माझे बंधूबांधव - असे माझे - माझे करणाऱ्या पुरुषरूपी बकऱ्याला काळरूपी लांडगा ठार मारतो . ' म्हणून गाढ निद्रेतून जागे व्हा . सावध व्हा . मोह - ममतेच्या विणलेल्या जाळ्याला विवेकाच्या कात्रीने कापून टाका . एवढा सत्संग श्रवण , ध्यान इ . करता , तर आता मोह - ममता सोडून आत्मपदात स्थिर व्हा . 

उशीर का करता ? 

    भवसागरात आतापर्यंत मारलेल्या डुबक्या पुरेशा नाही काय ? 

    देहभावाच्या पलीकडे होण्याची इच्छा का जागृत होत नाही ? 

    लक्षात ठेवा की पुढचा मार्ग खूप कठीण आहे . वेळ व शक्ती गमविल्यानंतर मग कितीही रडलात , पश्चात्ताप केला , मस्तक बडविले तरीही काही होणार नाही . 

    अब पछताये होत क्या जब चिड़िया चुग गयी खेत । 

    आयुष्यरूपी शेत नष्ट - भ्रष्ट झाल्यावर काय होईल ? म्हणून आत्तापासून सावधान ! आत्मवेत्ता सत्पुरुषांच्या वचनांचे मर्म हृदयात उतरवून आत्मपदाची प्राप्ती करा . कायमचेच सुखी व्हा . जीवभावातून पृथक होऊन शिवत्वात विश्रांती मिळवा .

Post a Comment

0 Comments