राखी पौर्णिमा - नारळी पौर्णिमा

 

राखी पौर्णिमा - नारळी पौर्णिमा

 

राखी पौर्णिमा - नारळी पौर्णिमा

Photo from Google Images


श्रावण पौर्णिमा ही आपण फार मोठ्या उत्साहाने साजरी करतो.

 

याचे कारण असे की, अनेकविध दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.

 

या दिवशी रक्षाबंधन असते. म्हणून या दिवसाला 'राखी पौर्णिमा' असे म्हणतात. खूप पुरातन काळी यमीने यमाला राखी बांधली, तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. बहीण भावाला राखी बांधते. भाऊ बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. बहीणभावांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा असा हा सण आहे.

 

काही ठिकाणी राखीबाबत अन्य प्रथाही असल्याचे लक्षात येते. बळी राजाच्या काळात प्रजेचे प्रतिनिधी, विद्याभ्यास करणारे लोक बळीस राखी बांधत. हेतू हाच, की बळीराजाने सर्वांचे सरंक्षण करावे. अलीकडे सामान्य जनता सरकारी अधिकाऱ्यांना, पत्नी पतीला राखी बांधते. मित्रगणही परस्परांस राखी बांधतात. ही कल्पनाही चांगली आहे. यातून आपोआपच परस्पर संरक्षणाची जबाबदारी घेतली जाते.

 

समुद्रकिनाऱ्याला हाच दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून वादळी पावसाचे दिवस संपलेले असतात. समुद्र शांत असतो. म्हणून कोळी लोक सागरास नारळ अर्पण करतात. त्याची पूजा करतात आणि या दिवसापासून समुद्रात होड्या सोडतात. या दिवशी नारळाचे पदार्थ करून खातात. गोड नारळी भात तर सर्वांनाच आवडतो.

 

आजच्या दिवसाला संस्कृत दिन असेही संबोधण्यात येते. संस्कृत भाषेच्या प्रचाराचे, प्रसाराचे कार्य अनेक जण या दिवशी सुरू करतात. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमांचे आयोजनही करतात.

 

अशा विविध कारणांनी महत्त्वपूर्ण असणारा हा दिवस भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शविणाराच नव्हे काय?

 

 

Post a Comment

0 Comments