रामदास महाराजांचे कार्य (आप चळवळीला योगदान )

रामदास महाराजांचे कार्य 
(आप चळवळीला योगदान ) 

रामदास महाराजांचे कार्य  (आप चळवळीला योगदान )

Photo by Mikhail Nilov from Pexels


    गुलाम महाराजांच्या निर्वाणानंतर रामदास महाराज आरतीसमारंभाचे संचलन करूलागले . दर सोमवारी आस्थेने येणाऱ्या जनसमुदायाला ते गुलाम महाराजांच्या उपदेशाचे स्मरण करून देत असतांनाचस्वतंत्रपणे काही विचार मांडू लागले . दुसरे महायुद्ध सुरू झाले होते . स्वातंत्र्य मागणीचा जोरही वाढू लागला होता . गुलाम महाराजांच्या कार्याला प्रसिद्धी आणि समाजमान्यता मिळाल्यावर आपचळवळीत आरती समारंभाला येणाऱ्या भिल्ल समाजाबरोबरच इतर समाजातील लोकही येऊ लागले होते . त्यांचा काही प्रमाणात असलेला विरोध रामदास महाराजांच्या भाषणामुळे वाढत जाऊ लागला . 

    रामदास महाराज आरती समारंभाला उद्देशून काही विचार मांडत असत . स्वातंत्र्याचे वारे त्यांच्यापर्यंतही पोहचत असत . त्यामुळे त्यांच्या भाषणात अंग्रेज सरकार , महात्मा गांधी यासारखे शब्द येत असत . त्यामुळे सामाजिक चळवळीला राजकीय चळवळीचे गालबोट लागले . इतर समाजातील विचारी बुध्दिवादी लोक जे या चळवळीत उत्सुकतेने आणि कुतुहलाने येत होते त्यांनी चळवळीबद्दल अपप्रचार करण्यास प्रारंभ केला . तशातही रामदास महाराजांचे आपचळवळीचे आणि आरती समारंभाच्या संचलनाचे कार्य व्यवस्थीत सुरू होते . आपचळवळीत येणाऱ्या भिल्ल समाजाला ते आश्वस्त करून म्हणत असत - नवयुग निर्माण ' आप ' रंजनपूरमे है , विश्वमे सत्य धर्मका आया तुफान पाप अधर्म और अनीती मिट जायेगी भक्तजाती धर्मरक्षक माना जायेगा असे म्हणत लोकांमध्ये विश्वास आणि आपमूळ धर्माविषयी विश्वास निर्माण करण्यात ते यशस्वी होत होते . नवयुग निर्माण करण्याकरिता आप म्हणजे परमात्म्याचाअशरजनपूरमध्य आहे .

     विश्वात कितीही पाप , अधम , अनिती माजली तरी सत्य धर्माच्या तुफानात ते समूळ नष्ट होईल . हे ' आप ' रंजनपूर भूमीचे आपल्याला वचन आहे . धर्मरक्षणाची तलवार ' आप ' रंजनपूर भूमीवर आहे . अशा प्रकारचे विचार रामदास महाराज व्यक्त करीत आणि - ' आप श्री स्वामी गुलाम भगवान की जय ' हे जलमाता अंत ब्रह्मांड , आपकू नमस्कार ! नमस्कार ! नमस्कार ! भ्रम मिटानेवाला आपसे कोई निराला है क्या ? असा प्रश्न रामदास महाराज उपस्थित करून गुलाम महाराजांच्या श्लोकाचा पुनरुच्चार करीत . 

    उसपर गुलाम बाबाका श्लोक ' ने लगे प्रभुका शोध , बोध बीना नय लगे प्रभु का शोध ' सत्य गुरु आपकू मिला साबुत , उसीका पावपकडुगा मजबूत , नय लगे प्रभुका शोध , जब मिल गया , अद्भूत , हल्ली बना जंगलका भफत , नय लगे प्रभुका शोध आप सत्य गुरु कहता है , आप रमपार नय लगे प्रभुका शोध पारख लगाके अंबर होवो , पावो मोक्षपद आपश्री सती स्वामी गुलाम भगवान की जय हो आपकी जय हो आप मूल धर्मोके वास्ते आपोआप वापी गुलाम बनाना भाग है आप अल्लक निरंजना बनके सदा आपोआप रम रहा है भूमंडधर्मोमती , राजनीति वो तो आप पान फुल फल लटक रहे है रमता , रमतरमुगा हदयोंगे , आपोआप भक्षण करूगा असा गलाम महाराजापक्षा स्वच्छ भाषत आकलन होईल अशा पद्धतीने ते उपदेश करू लागले . 

    आप गुलाम भगवानने खरोखर अखेरचे सांगणे सत्य वाचा ती अशी बायानो . तुमच्या घरधनीला सांगा दारु पिवूनको , मास - मच्छी खाऊनको , पाया पडून सांगा , नाही ऐकेल तर माझ्याकडे घेऊन या म्हणजे मीही पाया पडून सांगेन , हात जोडून सांगेन नाही जर ऐकले तर सबकूरांडके बना डालूंगा हे ही सत्य आप गुलाम भगवानाचे सांगणे आहे असे निर्भिड विचार रामदास महाराज लोकांसमोर मांडू लागले . धर्म व पाप दुनिया जानती है लेकीन धर्म किसको कहते है , धर्म नाम किस चिडीयाका है धर्मका कौनसा रास्ता है , और आप किसकू कहते है , ईसका निवारण शासनकी तरफसे होना महान जरूरी है , आप नियमाचे महत्त्व जीवनात एखादे तरी व्रत नियम अवश्य पाहिजे . एखादा लहानसा नियमही जीवनात फार मदत करतो . 

    या संदर्भात आपश्री रामदास महाराज एक कथा सांगतात ती अशी एक शेटकोणा एका महात्म्याच्या प्रवचनाला गेला . महात्मा त्याला म्हणाला .... जीवनात काही तरी नियम हो . त्याला खादाड शेट म्हणाला . बाबाजी दुसरा तर कोणता नियम नाही . पण जेव्हा मी दुपारचे जेवण करीन तेव्हा माझ्या घरासमोरराहणारा म्हतारा कुंभार जीवत राहील तो पर्यंत त्याला पाहिल्यानतरचमीदपारचे जेवण करीन..बाबाठीक आहे एवढच व्रत . भाऊहे व्रत तर फार सोपे आहे . म्हातारा कुंभार घरासमोरच राहात होता . ह्याव्रताचे पालन करण्यास कोणतेही कष्ट नव्हते . दरून पाहिले तरी काम होत होते . एके दिवशी महातान्याचामलगासासरवाडीलागेलाम्हतारागावपऊलमाती आणायला गला.शेटजेवण करायला आलातहातोहतास दिसला नाही . 

    कुभाराच्या पत्नीला विचारलेकीकाठगला म्हातारा ? तेव्हा पल्लीने सागितलगायत घेऊन माती आणायला गेले आहेत.शेट म्हणाला केव्हा येतील म्हातारी ? आताच गेले आहेत थोडावेळ लागेल.म्हातारीन जागा सागितली . शेटत्या शेट परत जावूलागला . त्याचे तर केवळ दुरुनच पाहण्याचे व्रत होते . ठिकाणी गेला त्याने दुरुनच पाहिले . तो म्हातारा माती भरत आहे हे पाहन परत जाताना पाहून म्हाताऱ्याने हाकमारली आहा , भाऊ ! इकडेया . गोष्ट अशी होती की , म्हाताऱ्याला मातीखोदता - खोदवासोन्याचा हंडा सापडला होता . तो हडा व्यवस्थीत ठेवत होता . तेवढ्यातच शेटला परतताना पाहून त्याला वाटले की , हा माणूस हे पाहून पोलीसाला सांगायला जात आहे . तर हा हंडा सरकार जमा होईल . त्यापेक्षा अर्धा त्याचा व अर्धा माझा असा विचार करून त्याने शेटला हाक मारली . शेटने म्हाताऱ्या कुंभाराला पाहूनच दुपारचे जेवण करण्याचे लहानसे व्रत घेतले तर त्याला सोन्याचा अर्धा हंडा मिळाला . 

    जर बाबाजींच्या म्हणण्यानुसार त्याने एखादे व्रत घेतले असते तर बाबाजींच्या पूर्ण अनुभवांचा खजीनारुपी हंडा सुद्धा त्याच्या हृदयात झळकू लागला असता . आपकी जय हो आप गुलाम रंजनो की जय हो आप श्री सती दगूमाता की जय हो आपरामनाथ महाराज की जय हो आप गुलाम ज्ञानोबा तुकाराम अशा पद्धतीने रामदास महाराज गुलाम महाराजांच्या उपदेशाचे महत्त्व जनसमुदायाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत असत . आप गुलाम महाराजांची शैली वेगळी होती . त्याच्या भाषणातील अनेक भाषांमधील सरमिसळ आणि त्याच्या बोलण्यातील गुढअर्थ उकलण्यासाठी कुणातत्त्ववेत्याचीच गरजवाटपणलोक त्याच्या उपदेशाचे अनुकरण कलागले.त्यानी दारुसोडाम्हटले.

    भिल्ल समाजाने दारू सोडल्ली , त्यानी मास खाऊ नका म्हटले त्यानी मास खाणे बंद केले . त्यांनी पती पत्नींनीबरोबर आरतीलाया म्हटले लोकजाऊलागले.हे त्यांच्या तपश्चर्येचे माध्या राहणीचे आणि शुद्ध निर्मळ आत्मनुभूतीचे फळ होते . हा वारसा जेव्हा रामदास महाराजांकडे आला तेव्हा त्यांनी आपल्या पद्धतीने समाज धरुन ठेवला होता . पण त्यांच्या काही भाषणांमध्ये अंग्रेज सरकारला उद्देशून काही संदर्भ येत . त्यात थोडेसे गुलाम महाराजांचे तत्त्व व काही त्यांचे विचार यांच्या सरमिसळीतून एक वेगळाच अर्थ चळवळीला लांबून विरोध करणाऱ्यांनी घेतल्याचे दिसते . त्याही भाषणांतील काही अंश पीरमोदला येथील आप चळवळीतील ज्येष्ठ लक्ष्मण महाराज यांच्याकडून उपलब्ध झाला तो येथे देत आहे . निरंजन अळ्यायी न्याती के लिए आहे है , अंग्रेज आप काँग्रेस सरकार आप पृथ्वी मातापे किसके साथ तक्रार कर रहे है , आपसे कही निराला है क्या जो आपसे निराला निकाल देवगा तो आपकु फाशी दो , सुली दो . 

    आपकी मांगणी थी वो संपूर्ण हो गयी अभी आप कलंकी लगा है इसिलिए ये तुम्हारी मागणी कट गयी है . हातोमे त्रिशूल , गदा , ध्वज लोकोनकू देखावा साडेचौदा हात तलवार वधनुष्य है . वो बीज के हातमें है . आप मुख्य बीजो आगे कुछ तुम्हारी बंदुक , तोफ , बिजली , तलवार अग्नि सुद्धा चल नहीं सकती . आप मुलधर्मका शोध लगाके , आप आप आत्मरूप पछान के आप त्रिभुवनमे आपोआप भर रहा है . और आप मुलधर्मका खुलासा साधुसंत नही देंगे तो तुम्हारे राज्य मे के सतनकु अटक करके खुलासा बतीलावो जो निरनिराळे धर्म बीतला रहे है इसको भी खुलासा आप गुलामकू बीतलाना चाहीये . नहीं बितलाते आये तो आप आरती पुजन मे मील जावो . 

    जो जो नही पुरातनको खोटा करके नही शोध आप शोधबीना नय लगे बोध , आपगुलाम आप अनारायणये . बतलायगातो उसको पाचगाव ईनामदेगा . आप गुलामबोधबीना नया लगे राजे अग्रेज , कांग्रेस और राजे - रजवाडे , सवस्थानी , संत , जप - तपी , ऋषी - सन्यासी , मठ - मंदिर मसजीत स्थापन करके बैठे है . हो महत को सन १ ९३८-३९ मे नोटीस देके फर्माया है . याशिवाय रामदास महाराज मठ , मसजीदे , सस्थाने खालसाहा जायगे . तापीनदीत तुम्हापायाचालाल असेही म्हणत असत . 

    रामदास महाराजांच्या अशा प्रकारच्या एक भिल्ल संत समाज एकत्र करून ब्रिटिश सरकारविरोधी मत मांडून लोकाना संबोधनामुळे कुणी चिथावणी देत आहे असा प्रचार झपाट्याने हावू लागला.स्वातत्र्यचळवळही अधिक जोमाने सुरू होती . या साऱ्या घडामोडी वेगाने घडत होत्या . गुलाम ससुरुवात महाराजांप्रमाणे रामदास महाराज मवाळ वा शांत नव्हते ते गुलाम महाराजांच्या विचारांबरोबरच स्वविचारही मांडत असल्याने भिल्ल समाजोन्नतीला मनोमन विरोध करणाऱ्यांनी उघडविरोध नोंदविण्यासस केली . त्याचा परिणाम असा झालासन १ ९ ४२ मध्ये रामदास महाराजांबरोबर असणाऱ्या चार व्यक्ती दवे बंधू , फत्तु दामजी गावीत आणि दत्तु मास्तर ( चिंचाल ) यांच्यासह रामदास महाराजांना हद्दपारीचा आदेश दिला गेला . 

    या पाच लोकांना जेव्हा हद्दपारीचा आदेश दिला आणि त्यांना हद्दपार केले त्यावेळी त्यांच्या बरोबर आप मंडळातील कुटुंबे आपले घर - दार , गुरे - ढोरे , शेती - वाडी सगळे सोडून घरातील लहान मुला - बाळांनाही पाठीला बांधून सुमारे तीन हजाराच्या वर लोक स्वखुशीने रामदास महाराजांबरोबर हद्दपार झाले होते असे सांगतात . रामदास महाराजांनी लोकांना आपल्याबरोबर येण्यापासून परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला पण समाजाचा आपल्या गुलाम महाराजांवर आणि रामदास महाराजांवर इतका प्रगाढ विश्वास आणि श्रद्धा होती की , त्यांना आपण सर्व सोडून यांच्या बरोबर कुठे आणि किती काळ राहू याची खात्री नव्हती . 

    पण आपण परत येऊ तेव्हा आपले घर - दार , गुरे - ढोरे , शेती - वाडी सर्व सुरक्षीतपणे आपल्याला मिळेल याचा विश्वास होता . त्यामुळे विश्वासाने ते रामदास महाराजांबरोबर बाहेर पडले . मोरवड ( रंजनपूर ) सेंधवा मार्ग ते नर्मदपार गेले . सोबत आलेल्या लोकाप्रमाणेच राहिलेल्या लोकांना ते म्हणाले घाबरु नका . मी नर्मदच्या तीरावर लालझेंडा घेऊन बसेन . समाज तो ! एवढा मोठा जनसमुदाय , चालता चालता चिखलदा गावातील गिरधरपाडवी नावाच्या एका व्यक्तीने वाटेत येणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतातून दोन चवळीच्या शेंगा घेतल्या म्हणून त्यांना चोर ठरविले गेले . त्यावरून अधिक बाद होऊ नये म्हणून रामदास महाराज म्हणाले एवढ्या समाजातून चार लोक तुम्ही ध्या त्यात नेमकेदवे बंधू ( नंदुरबार ) , दत्तु मास्तर ( चिंचाला ) आणि फत्तेसिंग दामजी गावीत ( नटावद ) यांना अटक केली . त्यांना घेऊन पुढे निघाले . 

    रामदास महाराजांबरोबर फतेसिंग गावीत यांचेही कुटुंब होते . या कुटुंबातील कमला नावाच्या मुलीची तब्येत बिघडली त्यामुळे रामदास महाराजांनी पुढे न जाता रावळापाणी या गावी मुक्काम करण्याचे ठरविले . आपल्या समाजातील महाराजाला हद्दपार केले आहे त्याच्याबरोबरएवढा मोठा समाज आहे हे कळल्यावर रावळापाणी व आजूबाजूचा भिल्ल समाज रामदास महाराजांना भेटायला येत असे . येतांना आपल्यासोबतगुळ - पिठही आणत . फतेसिंग गावीत हे सर्वार्थाने गुलाम महाराजांच्या सेवेत होते . आपले कुटुंब नटावदला ठेवून ते रंजनपूरलाच राहत असत . समाज जेव्हा जमत असे तेव्हां ते सर्व लोकांची व्यवस्था पाहात . 

    रामदास महाराजांबरोबरही ते तेवढयाच निष्ठेने राहिले . त्यांच्याबरोबर हद्दपार झालेले त्यांच्या बरोबरच जेलमध्येही गेले आणि आपला देह त्यांनी मोरवड उर्फरंजनपूरलाच ठेवला . मागे राहिलेल्यांना तुम्ही आरती पूजनाचे कार्य सोडून द्या नाही तर तुमची बापदादाची जमीन आहे ती सरकार खालसा करून ( मागून घेईल ) आणि दुसऱ्यांना देऊन देणार आहे . त्यात तुमचे मत काय ? तेव्हां आप समाजाने जमीनी ताब्यात घेण्यास मान्यता दिली पण आम्ही आपईश्वराचे आरतीपूजन चालू ठेवू असे सांगितले , एवढा आत्मविश्वास या साध्या सरळ भिल्ल समाजात गुलाम महाराजांनी रुजविला होता . विरोध पत्करूनही ते आरतीला जातच होते . 

    अशा आपमंडलात जाणाऱ्या आरतीपूजनाला जाणान्या काही लोकाचे संतापात त्यांनी मुंडणही केले होते . प्रतापपूरचे राणाजी रामदास महाराजांना मारण्यासाठी बंदुक घेऊन आले होते . रामटास महाराज हद्दपार असताना नेमाडची माणको रामदास महाराजांच्या पायाशीपैसे ठेवून नमस्कार करीत , रामदास महाराजांनी पैशांना नकार दिल्यावर ते खरबुज कोरुन त्यात पैसे ठेवून रामदास महाराजांना अर्पण करीत.रामदासमहाराजानाहेलक्षात आल्यावरतम्हणाल तुमच्या भागातील खरबुजामध्ये बियाच्या ऐवजी पैसे कसे असतात हे त्यानी हसत - हसत विचारल्यावर लोकधाडस नाराज झाल.रामदासमहाराजानी आपल्याबरोबर चालणाऱ्या , असलेल्या समाजाला सांगितले . चिखलदा - बाग येथे बाजार आहे . तिथून काही तरी घेऊन घ्या पुढे काहीच मिळणार नाही . आणि नंतर समाज मध्यप्रदेशाच्या सीमेवर नर्मदा नदी पार करून आला . 

    उपाशी पोटी भटकंतीत असणाऱ्या समाजाला रामदास महाराजांनी सूचना केल्याच होत्या . पण एवढा मोठा जनसमूह कुठे न कुठे कुणाच्यातरी शेतातील दोनचार कणीस दोन चार शोगा कुणीतरी घेणारच त्यामुळे या समाजाबद्दल चुकीचा गैरसमज पसरविला गेला . जिथे थांबतील तिथे ते गुलाम महाराजांचा उपदेश करीत आणि असेही म्हणत ' इंग्रज और काँग्रेस को खुटके साथ बाधेगे , एक एक पै का हिसाब लुगा ' अशा विधानांमुळे ते अधिकच अडचणीत येत . कारण जिथे विरोध होतो आहे असे ब्रिटिश सरकारला कळत असे तिथे तो विरोध दडपून टाकण्यासाठी ते तत्पर असत . रामदास महाराजांबरोबरसेवेकरी म्हणून काही भिल्ल स्त्रिया होत्या अशा स्त्रियांपैकी थोड्याशा धीट असणाऱ्या स्त्रियांना ते बोलायला उभे करीत . 

    नटावदच्या सारजी , रुक्मिणी यांना बोलायला लावत.त्यावेळी आपापसात त्या कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता असे . हळूच कुणीतरी विचारे काहान असं ? कुणी उत्तरदेई नटावदनं असं . अशाप्रकारे रामदास महाराजांनी खियांनाही बोलते करण्याचा प्रयत्न केला . या स्त्रियांना त्यांनी इतके धीट आणि स्वाभिमानी केले होते की एकदा समाज भरला असताना एकहवालदार घोड्यावर बसून आला आणि म्हणाला दादा जेवण तर द्याल असे म्हणत म्हणत त्याने आरतीला आलेल्या गिरजाबाई नावाच्या स्त्रीच्या अंगावर घोडा घातला . पुन्हा पुढच्या सोमवारीही तो हवालदार त्याच पद्धतीने आला असता आरतीला आलेल्या सर्व बायानी त्याला घेरले आणि घोड्यावरून खाली दिसलाही नाही . ओढूनखुप मारले तेव्हापासून तो हवालदार पुन्हा आला नाही आणि कुणाला सत आपत्री गुलाम महाराजाचे चाया ? 

    गुलाम महाराज म्हणत मी आपमुल धर्माचा आपस्तंब तिन्ही लोकात जाईल असा रोवला आहे . हा आपस्तंब अक्राणी महाल परगण्यात सातपुड्याच्या तिसऱ्या रांगेत वसलेले आहे . इथे या देवगोवीला त्या आपस्तंभाजवळ देऊळ बांधून गुला महाराजांचा उपदेशही एका दगडी पट्टीवर कोरून ठेवलेला आहे . अशी माहिती मिळते . तिथे जवळच काही समाजबांधवांनी याहामोगीचेही मंदिर बांधले असल्याचे कळते . रामदास महाराजांना हद्दपार केल्यावर आता आरती चळवळीला कुणी त्राता नाही , कुणाचे नेतृत्व नाही . आपल्याला आपचळवळ वा आरती समारंभाचा कार्यक्रम सहज उध्वस्त करता येईल असे इंग्रज सरकारला वाटत होते . 

    पण आप चळवळीतील , आपमूल धर्मातील उपदेशाचे अनुकरण करणारी प्रत्येक व्यक्तीचा स्वभावजागृत झाल्याने आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग कळल्याने प्रत्येकात एक अदृश्यशक्ती संचारली होती . कुठल्याच धमक्यांना वा कारवाईला ते घाबरत नव्हते . आरती चालूच होती . त्यात कोणताही अडथळा बाधा येऊ शकत नव्हता . भिल्ल समाजाला दिलेल्या आत्मोद्धाराच्या मूल मंत्राने त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत केला होता . त्याला पूर्णपणे सजविण्याचे कार्य रामदास महाराजांनी केले होते . गुलाम महाराजांच्या विचारांपेक्षा त्यांचे विचार थोडेसे स्पष्ट आणि परखड होते . 

    स्वातंत्र्य चळवचळीचे एक समर्थक म्हणूनही ते आपले विचार माडत असत . म्हणूनच ४ / ५ / १ ९ ४२ साली त्यांना चार लोकांबरोबर हद्दपारीचा आदेश दिला , पण त्यांच्याबरोबर स्वखुशीने आणि स्वयंस्फुर्तीने सुमारे ३००० च्या आसपासलोकगेले हे त्यांनी गुलाम महाराजाची ' आपमूल धमांची चळवळ यशस्वीपणे पुढे नेली त्याचेच द्योतक आहे . रामदास महाराज परत आल्यावरही इंग्रजांनी ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला . गुलाम महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आरती पूजनाला बंदी घातली . तेथे पोलीस पहाराही ठेवला गेला होता , गुलाम महाराजांच्या निर्वाणानंतर रामदास महाराजांबरोबर गुजरात राज्यातील केश्रीसिंह हेही होते . 

    रामदास महाराज त्याचा आपले गुरु वधू म्हणून उल्लेख करतात.साधारणपणे इ.स .१ ९ ५० लाआपमूलधर्म सचालक आप रामदास महाराजांनी आपला एक निर्णय जाहीर केला . त्या निर्णयानुसार त्यानी आपल्या कार्याचा वारस म्हणून काटसवाणचे केश्रीसिंह याचे नाव जाहीर केले . त्यानंतर १ ९ ५२ साली पुन्हा त्यांनी एक पत्रक काढले ते असे - आपश्री सती स्वामी रामनाथजी महाराज की तरफसे दुनिया भरके सुधारको को सूचना और शुभ संदेसा - इस जमानेकी सर्व टोलीयों , नेतागण यही भाषण सभाओंमे देते है की गरीबोंको सुधारो इनको आगे बढाओ । ऐसी एक आवाज सारे संसार में गुंज रही है 

१ ) गरीब कौन , भिलाले , मानकर , मिना जिनको आदिवासीकहते है । 

२ ) बलाई , चमार , भंगी , महार अछुतोंको हरिजन कहते है । 

३ ) वैश्य , जाट , गुजर , कुलमो , पाटीदार अहिर सीख आदी जिनको कास्तकार कहते है . 

४ ) देवी , माता , पत्नी , बहन , लड़की आदि जिनको स्त्रियां कहते है । 

सर्व नेतागण उपरकी चार जातीयाँ पिछडी हुआ है । यह चार जाती कैसे पिछडी हुी है । 

१ ) जैसे आदिवासी दारु पीते है . मांस खाते है जीव हिंसा करते है . चोरी करते है . लंगोटी लगाते है . फटे - पुराने कपडे पहनते है . पहाडोव जंगलोमें झोपडियों में रहते है . अनपढ , मूर्ख है.शद्ध बोलने नहीं आता . मैले कुचले अशुद्ध रहते है . टही जाकर पाँव नही धोते . ध्यान , पूजा , पाठशाख - पुराण नहीबाचते यह पापी अघरमी है.व्योवहार नही जानते आदि , आदि . 

२ ) जैसे हरिजन ढोराका चमडा निकालते है.गाय भैस का मुरदार मास खाते है . दारु पिते है . टट्टी परवाना झाडते है . स्वच्छ नही रहते . अनपट , मूर्ख है आदि . 

3) जैसे कास्तकार दिनभर खेतमे रहते है . हल चलाते है . बैल गोरते है लाल , रबडी . पाटा , मकी , जवार बाजरा खाते है . छोटे छोटे खेडे में रहते है गवार मूर्ख अनपढइनको बनिया ठगते है . कोई दारु पीते है , मास खाते है . जीव हिंसा भी करते है . आदी .

4) स्त्रिया हमेशा पराधन रहती है . घरकी घरमे रहती है . पंच पंचायती सभाओंमे नही जाती . सरकार , राजनीती , परपुरुषसे ये एकान्त मे नही बोलती . अकेली परदेश नही जाती . घरके काममेही लगी रहती है .  जैसे बच्चोंकी परवरिश , पालन - पोषण करना , रसोईबनाना , खिलाना , पानी लाना , कपडा घोना , खेतीमे जाना , घरमे अगर सास - ससूर , पती , भाई - बहन , ननद - देवर - पुत्र बगेरा बिमार हो जावे तो सेवा चाकरी , दवा करना , पाँव - हाथ दवाना , शरम व इज्जत से रहना , अनपट , मूर्ख है सबब स्त्रियोंको इन सब कामासे मुक्त करके , पुरुष भी का बराबर होना ऐसा नेतागुण सुधारकोका कहना है . इस माफिक भारतके नेतागण जनता सुधारक इन चार जातीयोंको सुधारनेक भाषणखुब देते है और उनको गरीब लोग बताते और कहते है की इनसे सारा संसार का काम चलता है । सबब इनको सुधारना महानजली है . 

5) लेकीन जो लोग खास पिछडे हुआ है उनके बारेमें उनकी जबानसे एक अक्षर भी भूलकर नही निकलता . यह कोन है ? जैसे ब्राह्मण , मुसलमान , ईसाई , पारसी , जैनी , राजपूत राजाओ . हुकमतदारो , डिक्टेटर , पंतप्रधानो , गव्हरनरो , रक्षामंत्रियो . जिलाधिशो , साधु महात्माओ , पडे - पुजारी , गुरुओ , कथाशास्त्र बाचनेवालोको , उकिल - बोरस्टो जोतिषबालो , मठाधिशो . 

6)जाती वालोको सुधारने का भाषण नही देले क्योंकी यह उपरकी चार जाती जालोमे ज्यादा पिछडे हों है , लेकिन भाषण कर्जा भी इनही सबम सामील है .

७ ) यह कैसे पिछडे है ? धोका देना , झुट बोलना , विश्वासघात करना , इन चार जातीवालोंको अपने अधीन रखना , जरुरतसे जादा खरच करना , मुफतमें टायम खोना , दुसरोंका तो क्या खुदका भी काम न करना , सवारीसे चलना , आसनपर बैठना , नीचे पाव - पाव चलनेमें शरम लगना , तरहका नशाकरना , सब तरहकामांस खाना , गुप्त हत्याकरना , खुब नोकरी लेना , घुसखोरी , भ्रष्टाचार करना , ट्युशन भत्ता लेना और दान - पुण्य , मंदीर , मढ , दक्षिणाके नामसे धन हडपना , जप - तप कथा , नवग्रह की शांती के नामसे ठगना , उपरकी चार जातीयोंके हाथका पानी , रोटी भोजन नही खाना , अंधविश्वास करना , इन चार जातीवालोंको पापी , अधर्मी , नास्तीक , नीच , मूर्ख कहकर पुकारना . दुसराका मन दुखाना और यहाँ तककहते है की हमको दोगे तो ईश्वर हजार गुना तुमको देगा . जैसे ईश्वर के यहां इनका खजाना जगा हो . इनको निकालना जरुरी है . 

८ ) अगर यह उत्तम कहलाने वाले पहले सुधार जावे तो वो चार जाती फौरन सुधर जावे क्योंकी वो तो सुधरी हुी है . 

९ ) क्योंकी चार जातीयोंमेहीयह महान उंची कहने वाली जातीयाँ निकली है . और उन मुल निवासियोंकोही मुर्ख कहती है . सबब इनका उनसे पहले महान होना जरुरी है . अगर किसी महाशयों या सज्जनोंको शंका हो तो सुधरने की तरकीब नीचे पत्ते पर पुछ सकते है . अशा पद्धतीने विचार मांडून ते खाली आपला पत्तादेतात . पत्र व्योहवार का मिलने का स्थान आपश्री रामनाथ जी महाराज , मु . मोरवड ( रंजनपूर ) पो . ता.तळोदा ( पश्चिम खानदेश - बम्बई प्रांत ) हे पत्रक सतयुग प्रेस इलाहाबाद येथे छापून प्रकाशित केल्याची नोंद आहे . रामनाथ महाराजांनी आपल्या या पत्रिकेतून समाजसुधारणा करू इच्छिणाऱ्या जगभरातील समाजसुधारकांना मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.या मार्गदर्शक तत्त्वाची आजही गरज आहे असे वाटते . 

    रामदास महाराजांनी समाजाचे आणि राज्यकत्यांचे सूक्ष्मनिरक्षण करूनया पत्रकात आपले समाज सुधारणाविषयक विचार परखडपणे मांडल्याचे दिसून येते . यावरून असे लक्षात येते की गुलाम महाराजांनी भिल्ल समाजाला जगणे शिकविणे त्याला माणूस म्हणून जगण्यास सिद्ध करणे हे होते , तर रामदास महाराजांची विचारदृष्टी व्यापक होती ते समाजाच्या उन्नतीचा विचार करताना फक्त भिल्ल समाज डोळ्यासमोर ठेवत नाही तर संपूर्ण मानवसमाज त्यांच्या डोळ्यासमोर आहे हे त्यांच्या पत्रकावरून दिसते . एवढ्या द्रष्टेपणाने विचार व्यक्त करणारे रामदास महाराज त्यांच्या चळवळीच्या अपप्रचारामुळे आणि त्यांना हद्दपार केल्यामुळे आपमुल धर्माची भिल्लसमाजोन्नतीची चळवळ थोडीशी भरकटली गेली आणि चळवळीचे स्वरूपजरीबदलले तरी आपमूल धर्माचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी आजही हीचळवळ जीवंत ठेवली आहे . 

    या चळवळीच्या संदर्भात आणखी एकशोकांतिका घडली ती अशी गुलाम महाराजांचा मुलगा जो शंकर महाराज म्हणून ओळखला जात होता . तो बाजूला फेकला गेला . नैराश्येपोटी तो व्यसनाधीन झाला . अर्थातच तुळशीत भाग असल्याप्रमाणे त्याचे जीवन झाले . नैराश्य आणि उपेक्षा यामुळे तो त्या गर्तेत ओढला गेला आणि रामदास महाराज जे गुलाम महाराजांचे बंधूत्यांनी हीचळवळी पुढे नेली . आजगुलाम महाराजांची समाधी एकाकी आणि बाजूला राहिल्याचे दिसते ती क्वचितच लोकांना माहिती आहे आणि आपचळवळीतील जुने जाणते लोक त्या समाधीजवळ पाया पडण्यास जातात . आमच्या पिढीलारामदास महाराज आणि त्यांचे कार्य ज्ञात आहे . मोरवड उर्फ रंजनपूरला रामदास महाराजांचे वंशज आज या चळवळीचा वारसा चालवित आहेत . 

    चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते या चळवळीला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्नशिल आहेत . गुलाम महाराजांनी सुरू केलेल्या या चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने नंदुरबार येथे आपचळवळीतील बहुसंख्य लोकानी भव्य शोभायात्रा काढून आपचळवळ आणि आरती महासमारंभाला उर्जितावस्था आणण्याचे आणि गुलाम महाराजांची तत्त्वे पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याची गरज आहे . ' आफ्नी अय ' यापंचाक्षरी मंत्राचा शंख फुकून आदिवासी समाजाला पुन्हा उभे करण्यासाठी मत आपली गुल्म महावा या व्यसनाधिनतेतून मुक्त करण्याची गरज आणि नव्या पिढीला ' आद्य भिल्ल समाजसुधारक आप श्रीगुलाम महाराजांचे कार्य कळावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे . 

    त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे आपश्री गुलाम महाराजांचे चरित्र आपल्या हाती देत आहे . तात्पर्य हेच की गुलाम महाराजानंतर रामदास महाराजांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे . आप चळवळीची आजची स्थिती गुलाम महाराजांनी भिल्ल समाजातील माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण आणि प्रेरणा दिली . स्वच्छ राहणी , शुद्ध चारित्र्य आणि आपणच आपल्यातील शक्ती जागृत करून सन्मानाने कसे जगावे याची जाणीव करून दिली.आपली समाजोन्नतीची चळवळ यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोरवड उर्फ रंजनपूरला आरती समारंभ सुरू केला . ज्याला ' सती पती ' आरती असे म्हटले जाते . या सती - पती आरतीला अध्यात्मिक अधिष्ठान दिले . ' आपकी जय ' हा मंत्र देऊन चिरनिद्रेतील भिल्ल समाजाला जागृत केले . 

    त्यांच्यातील कुटुंब व्यवस्था स्थिर केली . लोकांना मद्य मासाहारापासून परावृत्त करण्यासते यशस्वी झाले . पण त्यांचे कार्य अल्पकाळ चालले . आरती समारंभ सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महीन्यात त्यांचे निर्वाण झाल्यानंतर या चळवळीची धुरा गुलाम महहाराज यांचे वधू रामदास महाराज यांनी घेतली . त्यांनी या आरती चळवळीचे संचलन आणि नेतृत्व यशस्वीपणे पार पाडले . 

    त्यांच्या कार्यात अनेक अडचणी आणि अडथळे येऊ लागले पण आपमंडळाच्या गुलाम महाराजांवरील अढळ श्रद्धेने सर्व अडचणीवर मात करून ही चळवळ सुरूच राहिली . कधीकधी मंदावलीही पण पूर्णपणे या आपचळवळीला आणि आरतीसमारंभाला थांबवणे कुणाला शक्य झाले नाही . रामदास महाराजांच्या काळात राजकीय वातावरण प्राधान्याने स्वातंत्र्य चळवळ अंतिम चरणात असतांना रामदास महाराज आणि आपमंडळ अनपेक्षितपणे ओढले गेले आणि आपचळवळीचे तारू भटकण्याचा प्रसंग आला , पण रामदास महाराजांनी आपचळवळीचे भिल्ल समाजोन्नतीचे आपले मुळकार्य पुढे चालूच ठेवले . 

    रामदास महाराज कुठेतरी सभ्रमित झाले असावेत . अनेक आघाड्यांवर संघर्ष करतांना त्यांनी गुलाम महाराजांच्या विचारांपेक्षा वेगळे विचार मांडले . जे त्यांच्या १ ९ ५० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रकातून स्पष्ट होतात . त्या पत्रकावरूनरामदास महाराजांची द्विधा मनस्थिती कळते . अत्यंत अनाकलनीय व गुलाम महाराजांच्या विचारांना फाटा देणारे असे हे पत्रक आहे . या पत्रकाला संदर्भ ते गुलाम महाराजांच्या विचारांचा देतात . 

    आप गुलाम ओम नारायणमे राजे , अंग्रेज , काँग्रेस और राजेरजवाडे , सवस्थानी , संत , जपी - तपी , ऋषी - संन्याशी मठ - मंदिर , महजीत स्थापन करके बैठे हुवे महंतको सन १ ९३८-३९ मे नोटीस देके फर्माया है . इ . स . १ ९ ५० आप मूळधर्म संचालक आप रामदास महाराजने निर्णय करके - निर्माण के लिए आप अंग्रेज सभ्य प्रतिनिधी या स्थान दे बैठे हुवे गवनमेंट साँसको आप अंग्रेस सभ्य प्रतिनिधी या स्थान दे बैठे हुवे महतको सन १ ९३८-३९ मे नोटीस देके फर्माया है . इ.स .१ ९ ५० आप मूळधर्म संचालक आप रामदासमहाराजाने निर्णय करके - निर्माण के लिए आप अंग्रेस सभ्य प्रतिनिधी या स्थान दे बैठे हुवे गवर्नमेन्ट सर्वांसको आप मुलसत्य धर्म और जीवन चरित्र्यके लिए अखिल आदिवासी असक्युल्युडेट अरिया नीति बांधारणीय शेकसन ५५ वन कलम ३६ ओबीसीडी इएफजी एच और सन १ ९ ३५ कलम ९ १ / ९ २ ओरिया के विश्वकरंसी नोटबचन वाचन कराराप्रमाणे आधीन हो . 

    अध्यात्मिकसमयसे व्याही न्यायी बचनके प्रमाणसे देख , विदेस स्थावर जंगम माल मीलकत कुल संपत्ती का हिसाब . पईपईका , असंख्य धातू जंजी धान्यकरण भरपाई मिलाने का आदी - अनादी अध्यात्मिक समयसे ( विश्व ) समक्ष करार करन्सी प्रोमीसीस डोक्यमेन्टम स्टॅम्प , काईन्स , सत्यवचन , बचनी व्यवहार का शुद्ध है और शुद्ध हिस्साधीक रुणका निर्णय तपाजका स्टैम्प कॉईन्स व्यवहारका अतीरकी प्रसिद्ध के लिए प्रत्यक्ष आप मुलधर्म समाजका साबीती पुरावा आप गुलाम भगवान के सत्य मानके आधारसे आप रामदास महाराज ठैराया है . और आप मूलधर्म संचालक आप रामदास महाराज के सत्य वचनोके आधारसे आपश्री होनजी छिपट्या ठाकरे हाडआंबास्थापक . १ ९ ५२ . १ ९५३-५४,५५,५७,५८,५९ , ६० , ६१,६२,६३ को ठेराया है . 

    आपश्री सती गुलाम भगवान की जय , स्वकर्ता पितुके कुवर सग - अगी अयान केवीसिंह ( कटासवाण ) या पत्रकात आपचळवळीला आणि आरती समारंभाला पर्यायाने गुलाम महाराजांच्या साध्या - सरळपण पायाशुद्ध समाजोन्नतीच्या विचारांना पूर्ण फाटा दिला गेलेला दिसतो . हीच परंपरा पुढे केश्रीसिंह महाराज या त्यांच्या गुरुवधुनी चालविली तीनव्या संप्रदायाच्या छत्राखाली . पण केश्रीसिंह यांच्या नेतृत्वाखाली आपचळवळीतील सर्व आपमंडळी आता ओ.सी. संप्रदायात गेली . आपश्री ऐवजी ओ . सी . असे म्हणवून घेऊ लागले आणि ' आपकी जय ऐवजी ' स्वकर्ता पितुकी जय ' असे अभिवादनार्थ म्हटले जाऊ लागले . ही आप चळवळीची आजची स्थिती आहे .

Post a Comment

0 Comments