शिक्षक दिन

 

शिक्षक दिन

 

शिक्षक दिन

Photo from Google Images

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव तुम्हाला माहीत आहे ना? भारताचे राष्ट्रपती थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून जगात त्यांनी ख्याती मिळविली होती. राधाकृष्णन यांचा जन्मदिन हाच शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगाव मद्रास प्रांतातील तिरुतानी. लहानपणापासून ते अतिशय हुशार होते. विविध शिक्षण संस्थांमधून टप्प्या - टप्प्याने शिक्षण पूर्ण करीत ते एम.. झाले. पुढे मद्रास, म्हैसूर, कलकत्ता इत्यादी ठिकाणी त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.

पुढे ते आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरूही झाले. इंग्रजी भाषेवर त्यांचे अत्यंत प्रभुत्व होते. ते तत्त्वज्ञान हा अतिशय अवघड विषयही सोपा करून शिकवीत असत. स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ यांच्याप्रमाणेच त्यांनी परदेशातही भारतीय संस्कृतीची ओळख सर्वांना करून दिली.

हिंदू तत्त्वज्ञानावरील त्यांची भाषणे परदेशात खूप गाजली. काही दिवस त्यांनी परदेशात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. काही काळ ते बनारस विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणूनही कार्यरत होते

भारत स्वतंत्र झाल्यानंतर रशियात भारताचे वकील म्हणून ते राहिले. तसेच भारताचे उपराष्ट्रपती म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. भारताचे राष्ट्रपती होण्याचा मानही त्यांना मिळाला. जगातील थोर तत्त्ववेत्ते म्हणून ते प्रसिध्द झाले. संपूर्ण भारतात त्यांचा जन्मदिन, शिक्षकदिन म्हणून साजरा करतात. आदर्श शिक्षकांचा गौरवही याच दिवशी केंद्र राज्य शासनातर्फे केला जातो.

Post a Comment

0 Comments