भगवान श्रीकृष्ण

 

भगवान श्रीकृष्ण

 

भगवान श्रीकृष्ण

Photo by Nila Racigan from Pexels

'गोकुळचा चोर', 'कान्हा', 'नटखट' अशा -हेने ज्याला हाक मारली जाई त्या कृष्णाची माहिती मी आज सांगणार आहे.


या श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला. मथुरेचा राजा होता उग्रसेन, पण त्याचा मुलगा कंस हा अतिशय दुष्ट होता. तो लोकांचा छळ करीत असे. देवकी ही कंसाची बहीण. कंसाला असा शाप होता, की देवकीचा आठवा मुलगा हा त्याला मारणार आणि म्हणूनच कंसाने आपली बहीण देवकी तिचा पती वसुदेव या दोघांनाही तुरुंगात टाकले. एवढेच नव्हे, तर स्वत:च्या वडिलांना उग्रसेन महाराजांनाही त्याने तुरुंगात डांबले आणि सर्व राज्यकारभार स्वत: करू लागला.

 

खरं तर देवकीला तो ठारच मारणार होता. पण त्याने विचार केला तिच्या मुलाकडून आपल्याला धोका आहे. तिला कशाला मारावे? तिच्या होणाऱ्या प्रत्येक मुलालाच ठार करावे आणि त्याने केलेही तसेच. मूल जन्माला आले की त्याला घ्यावे आणि दगडावर आपटून मारावे, असे सात वेळा घडले. ___ आठवा जो जन्मला तोच श्रीकृष्ण. तो जन्मला ती तिथी होती श्रावण वद्य अष्टमी अन् वेळ मध्यरात्री १२ ची. मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट होत होता. हा मुलगा खूप तेजस्वी होता. पहारेकरी थकून झोपले होते,


हे पाहून वसुदेवाला एक युक्ती सुचली. त्याने ताबडतोब कृष्णाला गोकुळात नंदराजाकडे पोचवले अन् तेथून यशोदेची मुलगी घेऊन परतला. सकाळी त्या मुलीच्या रडण्याने मुलीच्या जन्माची वार्ता कंसापर्यंत पोहोचली. कंस आला त्याने मुलीला मारून टाकले.

 

पुढे गोकुळात राहून श्रीकृष्ण मोठा झाला. कंसाने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्याला ते जमले नाही. शेवटी मथुरेतच त्याने श्रीकृष्णास बोलावून घेतले. तेथे द्वंद्वयुध्दाचा महोत्सव चालू होता. त्यात भाग घेऊन श्रीकृष्णाने अनेक मल्लांचा पराभव केला आणि शेवटी कंसाला आव्हान देऊन त्याचाही त्याने वध केला आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले. पुढे याच श्रीकृष्णाने महाभारतीय युध्दात अर्जुनास 'गीता' सांगितली.आजही श्रीकृष्णाला आपण सारेच आदर्श मानतो.

 

Post a Comment

0 Comments