यशस्वी कसे बनावे?


यशस्वी कसे बनावे?


यशस्वी कसे बनावे?


Photo by Sharon McCutcheon from Pexels

यशस्वी जीवनासाठी स्वतःची ओळख :

 

सर्वप्रथम आपण कसे आहोत. आपल्या भूमिका कोणत्या आहेत. आपल्यातील क्षमता काय आहे, आपल्यामध्ये सद्गुण कोणते दुर्गुण कोणते हे आपणास माहीत असायला हवे. तेव्हाच आपण आपल्या सद्गुणांचा वापर करून दुर्गुणांवर विजय मिळवत यशाकडे एकेक पाऊल पुढे जाऊ शकतो. स्वतः स्वतःची ओळख करण्यास शिका. ती करताना कल्पकतेला बाजूला ठेवून जास्तीत जास्त वास्तविक काय आहे याकडे बघा आपण मानव आहात आपाणास शरीर, मन बुद्धी आहे. शरीरास पंचेंद्रिय आहेत मन हे विचारांचे भावनांचे घर आहे. बुद्धीद्वारे वास्तविकतेचा कल्पकतेचा वापर करून, त्याच्या द्वारे चांगले वाईट ओळखून जीवन जगत आहात.

 

विचार :

 

मनामधून विचार उत्पन्न होतात. या विचारांची संख्या आकाशातील ग्रह-तायांपेक्षा जास्त आहे. त्यांची गती ही सूर्यकिरणांच्या गतीपेक्षाही जास्त. त्यामुळेच मनाला बहुतांश लोकांनी 'चंचल' असे म्हटले आहे. मनामध्ये सतत विचार येत असतात. हे विचारचक्र सुरूच असते. सारख्या विचारांची मग एक साखळी तयार होऊन मनात एक 'भावना निर्माण होते. ही भावना पुढे प्रबळ होत गेली की आपल्या हातून तशी कर्म होण्यास सुरुवात हात.

 

मन- विचार - भावनाकर्म

 

म्हणूनच आपणाला विचारांवर काम करायला हवे. भावनांवर काम करायला हवे. आपली विचारसरणी ओळखण्यास शिका. विचारात सकारात्मकता शदना आणण्यास शिका. विचारात फार मोठी शक्ती आहे. आपण जे इच्छितो है मिळवून देण्याची ताकद आपल्या विचारात आहे.

 

एका विद्यार्थ्याला परीक्षेत ९० टक्के मिळवायचे होते. त्याला नेहमी ७०७५ टक्के गुण मिळत असत. त्याला सतत वाटत असे की, आपण ९० टक्के गुण घेतले पाहिजेत. त्यामुळे वर्गात आपल्याला मान मिळेल, घरी आई बाबा आनंदी होतील, आपले नातेवाईक आपल्याकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देतील, प्रेम करतील. समाजात आपले आपल्या कुटुंबाचे स्थान उंचावेल. ९० टक्के गुण मिळवल्यावर काय काय होऊ शकते याचा विचार त्याने केला. मग ९० टक्के गण मिळवण्यासाठी आपण काय करावयास हवे याचाही विचार आपोआपच सुरू झाला. त्याने तसे कामही सुरू केले. प्रत्येक वेळी 'आता पुढचे पाऊल कोणते?' यावर विचार करून तो पुढे चालत गेना. आणि तो दिवस उजाडला. त्याला ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. त्याने आपले विचारचक्र सतत सकारात्मक ठेवले एका वेळी एकच पाऊल उचलत गेला. आपणाला काय हवे याचा विचार करून त्यावर सतत सकारात्मक विचार करत राहिल्याने आपल्याकडून ठोस कर्म होण्यास सुरुवात होते. आपण इच्छित असे काही थोडेफार वास्तविकतेमध्ये उतरण्यास सुरुवात होताच आत्मविश्वास वाढतो आपणाला पुढचे पाऊल उचलण्यास आणखी हुरूप येतो. या विचारशक्तीच्या जोरावर तुम्ही आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

 

जसा व्यवहार तसे व्यक्तिमत्त्व

 

प्रत्येक माणसामध्ये चांगले वाईट गुण असतात. फरक फक्त एवढाच असतो की काही माणसं आपल्या वाईट गुणांना वर येऊ देत नाही. सदाचारा, सुशील व्यवहार ते करत असतात, तर काही माणसे भावनांच्या आहारी जाऊन आपल्या वाईट गुणांना वाव देतात, जेणेकरून त्यांची कर्मेही तशीच होतात.

 

तेव्हा आपल्याला आपणात फार मोठ्या प्रमाणात बदल करण्याची काला आवश्यकता नाही. सर्वप्रथम स्वतःचे व्यक्तिमत्त्व ओळखण्यास शिका. आपण स्वतःला निर्देशित करता की इतरांकडून निर्देशन घेता? स्वतःबद्दल आप मनात चांगला भाव आहे की वाईट? आपण स्वतंत्रपणे विचार करता कि इतर लोक जे करतील तसे करता? लोकांच्या मनात आपल्याबद्दल कसे विचार आहेत आपण खरंच तसे आहात का? आपण किती जबाबदार आहात चूक झाल्यास दोष कुणाला देता? आपण वेळेचा वापर योग्य प्रकारे करता की आपला वेळ वाया जातो? आपल्यातील राग, द्वेष, अहंकार, उत्सुकता, चिंता यांची तीव्रता किती आहे? त्यांचा परिणाम काय होतो? आपणाला आपला जीवनस्तर उंचवावासा वाटतो काय? आपण समस्या सोडवण्याकडे लक्ष देता की इतरांना दोष देता?

 

आपण ज्या प्रकारची व्यक्ती आहात त्याप्रकारे आपल्या इच्छा-आकांक्षा असतात. माणसाच्या मूळ गरजा भागल्या- अन्न, वस्त्र निवारा- की त्याला इच्छा असते, आपल्याला इतरांनी विचारावे, मान-सन्मान द्यावा. आपणाकडे सर्व सुखसोयी असाव्यात इत्यादी. या इच्छापूर्तीसाठी तो कर्म करत असतो.

 

इच्छांवर तुमचे नियंत्रण नाही; परंतु तुम्ही त्या इच्छेसाठी करणाऱ्या कर्मावर तुमचे नियंत्रण आहे. तेव्हा आपल्या कर्माद्वारे आपणास नेहमी फायदा होईल त्याने शारीरिक, आर्थिक मानसिक नुकसान होणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे.

 

आपल्या व्यक्तिमत्त्वात आपण हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणू शकता. सर्वप्रथम आपण जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. स्वतःवर प्रेम करायला शिका.

 

आपल्या भावनातूनच आपण आनंदी किंवा दुःखी होऊ शकता.

 

 

 

आपण समाज

 

तांत्रिक औद्यागिक विकासामुळे समाजाचा स्तर दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यातच स्पर्धा इतकी वाढली आहे की, जो तो यश मिळवण्यासाठी धावत सुटल्याचे आपल्याला दिसत आहे. अशा वेळी नीतिमत्ता हे यशाचे एक द्योतक बनले आहे. जो यशस्वी तो नीतिवान, परंतु अशा वेळीच समाजात नीतिमूल्यांची पायमल्ली देखील होत चालली आहे. आपणासही असे वाटेल की नीतिमत्तेला चिकटून राहिलो तर पदरी निराशा, त्याग, दगदग येण्याची शक्यता आहे. म्हणून बरेच जण यश मिळवण्यासाठी 'शॉर्टकट' किंवा अवैध मार्गांचा वापर करतात. तेव्हा लक्षात असू द्या की, यश सुखासुखी कधीच मिळणार नाही, तसेच नीतिमूल्यांमुळे तुमचे इतरांशी संबंध सुमधुर होतील. इतर लोकांना आपण प्रेम दिले तर तेही आपणाला प्रेम देतील मदतीस धावून येतील.

 

आपणाला समाजाची गरज आहे. कशासाठी ते ओळखण्याचा प्रयत्न करावा. आपण स्वतंत्रपणे या जगात राहूच शकत नाही. इतरांच्या मदतीची आपणाला गरज आहे. समाजव्यवस्था त्यासाठीच आहे. तेव्हा आपली इतरांना गरज आहे इतरांचीही आपणाला गरज आहे, हे ओळखूनच समाजात वावरावे.

 

सुमधुर संबंधांची रचना कशी करावी?

 

आपण आपली भूमिका समजून घेत स्वतःची जबाबदारी ओळखावी. नंतर आपण आपल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात. जबाबदाऱ्यांना ओझे समजू नये. तसेच इतरांच्याही जबाबदाऱ्या काय आहेत हे समजावे. 'आम्ही जिंकू-तुम्हीही जिंका' हे तत्त्व अवलंबावे म्हणजे परिस्थितीचा तुम्ही फायदा करून घ्याल इतरांशी संबंध टिकून राहतील. बोलताना आपल्या शब्दाकडे लक्ष द्या. आपण बोलताना जी शब्दावली वापरतो त्यावर आपले संबंध अवलंबून आहेत. तव्हा आपले विचार हळू आवाजात, स्पष्ट परखडपणे मांडा. एखादी गोष्ट आवडला नाही तर तसे सांगण्यास संकोचही करू नका. नेहमी इतरांची प्रशंसा चारचौघात करा त्याची टीका करायची असेल तर ती फक्त त्यांच्याजवळ एकांतात करा.

आपल्या टीका, तक्रारी करताना आपण इतरांना दुखावून त्यांचा रोष ओढवून घेणार नाही याचे भान ठेवा. चेहरा सतत हसतमुख ठेवा इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. त्यामुळे इतरांना आपण चांगल्या प्रकारे समजू शकाल. चर्चा करा; परंतु वाद घालू नका वायफळ बडबडीत अडकून बसू नका. इतर लोक काही सकारात्मक बोलत असतील तर त्याबाबत आपण उत्साह दाखवा. आपणाकडून चूक झाल्यास त्याची कबुली स्पष्टपणे द्या. इतरांची चूक झाल्यास ती क्षमा करून त्यांना मार्गदर्शन करा. इतरांना आपण देत असलेल्या वचनांची पूर्तता करा. त्याने तुम्ही त्यांचा विश्वास संपादन कराल.

 

इतर व्यक्तींच्या भावना समजून घ्याव्यात. त्यांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. त्यांना कोणती चिंता आहे हे जाणून घ्या.

शक्य झाल्यास इतरांना मदत करा. त्यांची उन्नती कशात आहे हे त्यांना सांगा तुम्ही त्यासाठी काय करू शकता हेही सांगा.

यशस्वी माणसांमध्ये काही शक्ती असते, गुण असतात. त्यामुळे ते यश संपादन करत असतात. ते गुण शक्ती कोणती ते आपण पाहूया.

 

यशस्वी माणूस कसा असतो?

 

१.       बुद्धिमान - यशस्वी माणूस हा बुद्धिमान असतो. आपल्या हुशारीच्या जोरावर त्याने यशाची शिखरे गाठलेली असतात. बुद्धिमान होण्यासाठी ज्ञानार्जन करावे. आपल्याला यश मिळवायच्या विषयाची सखोल माहिती मिळवावी. त्याचबरोबर यशस्वी माणूस हा जागरूक सतत सतर्क राहतो.

२.       अतिभावनात्मक नसतो - यशस्वी माणूस हा भावनात्मक असतो, पण वेळ, प्रसंग बघूनच तो आपल्या भावना व्यक्त करतो. तसेच त्याची वृत्ती ही स्वार्थी कधीच नसते. त्याच्याकडे शालीनता दुसऱ्याबाबत आदर असतो.

३.       समजूतदारपणा - यशस्वी माणूस हा समजदार असतो. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या माहीत असतात. वेळ परिस्थितीशी तो सहजपणे जुळवून घेतो. निर्णय घेताना भविष्याचा विचार करतो.

४.       नैतिकता - यशस्वी माणसात नैतिक मूल्ये आढळतात. त्याची विचारसरणी अधिकाधिक शुद्ध असते. सामान्य माणसातही काही नैतिक मूल्ये असतात. परंतु दुर्गनावर विजय मिळवण्यातच त्याचा वेळ जातो सद्गुणांना वाढवण्यास वेळ राहत नाही. यशस्वी होण्यासाठी स्वतंत्रता-आपली इतरांची-एकता, आदर सलोखा, उदारता, हिंमत, शांतता, स्वच्छता (विचाराची) साधेपणा, निडरता, स्वअनुशासन . नैतिक मूल्ये जपावी.

 

 

यशस्वी होण्याचे कसब

 

यशस्वी माणूस हा शांत स्वभावाचा असतो. आपल्या रागाचाही वापर तो चांगल्या हेतूने करतो. त्याची सदैव एकच चिंता असते, 'ध्येय मिळवण्यासाठी मी काय करू शकेल?' त्याचे मन एकाग्र असते त्यात आत्मविश्वास असतो. यशस्वी माणसाने काही मूलभूत गुण जपलेले असतात. हे गुण, कसब, कला तो नेहमी वाढवत असतो. तुम्हीही ती आत्मसात करा वाढवा.

 

श्रवणशक्ती

देवाने आपल्याला दोन कान एकच तोंड दिलेले आहे, तेव्हा निसर्गाचा नियम पाळा. जास्तीत जास्त ऐका कमी बोला. जेथे लागेल तेथेच बोला. ऐकल्याने माहिती मिळते.

 

उपलब्धता

तुम्ही लोकांना नेहमी उपलब्ध असा. लोकांना तुमची गरज असते तेव्हा त्यासाठी तयार राहा. जर तुम्ही लोकांचे व्यवस्थितपणे ऐकले तेव्हाच तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असाल किंवा काही करू शकाल.

 

फरक करा

अंतर करण्यास, फरक करण्यास शिका. चांगले काय, वाईट काय, काय करावे, काय नाही करावे, कोणते गरजेचे, कोणते व्यर्थ . यामुळे मिळालेल्या माहिती ज्ञानाचे विश्लेषण करणे सोपे जाईल.

 

निर्णयक्षमता

फरक करण्याची शक्ती आल्यास निर्णय घेणे सोपे जाईल. माहितीचे विश्लेषण झाल्यावर पर्यायांना वेळेच्या साच्यात बसवा. दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्या.

 

सहनशीलता

मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांबाबत सहनशील असा, एखाद्या घटनेतून चांगले काय मिळू शकेल ते पाहा.

 

लवचिकता

अंगी लवचिकता ठेवा. वेळ परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेणे शिका. यशस्वी माणूस हा वादळात ताठर झाडांची भूमिका घर नाही. गवताप्रमाणे झुकून वादळ गेल्यावर पुन्हा उभे राहतात.

 

स्व-बदल

दुसऱ्याला बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल घडवून आणा.

 

जबाबदारी

यशस्वी माणूस नवनवीन जबाबदाऱ्या घेत असतो. उचित निर्णय लवचिकपणे घेतल्यास जबाबदारी निभवावयास जड जात नाही.

 

सामावून घ्या

इतर लोकांच्या स्वभावाशी, वेळेशी सामावून घ्या. त्यामुळे लोकांच्या गुणांचाही आपल्याला फायदा होतो. आपले ध्येय साध्य करण्यात त्यांचीही मदत होते.

 

परिस्थितीला तोंड द्या

अपयश पदरी पडल्यास निराश होऊ नका. निर्णयाची पुनःपडताळणी करा पुढे चालत राहा.

 

एकाग्र शक्ती

मन कुठे लावावे. मनाला विचलित कसे होऊ देऊ नये हे पाहावे. आपली विचारसरणी सकारात्मक कशी करता येईल, ध्येयावर एकाग्रता कशी आणता येईल हे पाहावे. एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी 'व्यर्थ विचार' करू नये कुठल्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहावे. मनाला एखाद्या लोभापासून बाहेर कसे काढावे. व्यर्थ गोष्टींमध्ये रमू नये, याचा विचार करावा.

 

गुण कसे वाढवावेत?

 

वरील सर्व गुण, शक्ती एकमेकांशी जुळलेले आहेत. तुम्ही जर लोकांचेऐकाल' तर त्यांच्यासाठीउपलब्ध' असाल. माहितीमध्येफरक' करून तुम्ही 'उचित निर्णय' घ्याल. अंगात 'लवचिकता' आणून स्वतःत बदल आणाल. आपोआपच तुमच्या अंगावर 'जबाबदाऱ्या' येतील. तेव्हा गुण वाढवण्यासाठी एकाग्र कसे व्हावे, सामावून कसे घ्यावे, याचा विचार करावा. स्वतःतील सद्गुण ओळखावे. दर्गुणांना नीट करण्यात वेळ देण्यापेक्षा सद्गुणी होण्यात वेळ घालवा. दुर्गुण आपोआपच नष्ट होतील. मनात येणाऱ्या विचारांचे व्यवस्थित विश्लेषण करा. स्वतःची विचारसरणी ओळखा. आपल्या विचारांना योग्य दिशा द्या. विचारसरणी किती 'शुद्ध' आहे हे बघा. स्वतःला सद्गुणी होण्यासाठी स्व-प्रोत्साहन देत राहा.


लक्षात ठेवा :

 


१. अंगी हुशारी असण्यापेक्षा शहाणपण असणे गरजेचे.

२. नम्रता आचरणात आणावी. इतर मूल्ये जसे सहनशीलता, विवेक, मनाची प्रसन्नता, आनंद, बंधुत्व, उदारता, चतुरता, प्रेम, कटिबद्धता, जबाबदारी, आदर इत्यादी आपोआपच अंगीकृत होतील.

३. बोलण्यातून ज्ञानाचा प्रभाव जाणवतो, तर ऐकण्यातून शहाणपण दिसून येते.

४. तुमचे चुकल्यावर तुम्ही क्षमायाचना करता, इतरांचे चुकल्यावर त्यांना मात्र क्षमा करत नाही. इतरांना क्षमा करण्यास शिका. इतर लोकही चुका करतात. याचे भान ठेवा.

५. स्वतःचे हक्क व इतरांचे हक्क जाणून घ्या. त्यांच्याशी संवाद साधताना आवाज स्पष्ट, मृदू व विचार अधिकाधिक खुले ठेवा.

६. स्वतःच्या भावना ओळखा. चिंता कशाची, राग कोणाचा, का? भीती कशाची? या भावना बदलण्याचा प्रयत्न करा, त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा.

७. कधी कधी मनाला न पटणाऱ्या गोष्टीदेखील कराव्या लागतात. अशा वेळी परिस्थितीचा स्वीकार करून ती गोष्ट लक्षपूर्वक करावी. त्या गोष्टीला टाळू नये.

८. स्वतःची भूमिका ओळखून स्वतःच्या त्या भूमिकेतील जबाबदाऱ्या ओळखा. आपल्या कुवतीप्रमाणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या. सर्वप्रथम आपण स्वतःची जबाबदारी घेणे शिकावे.

कार्यबिंदू

 

१.       तुमच्यातील असलेल्या सद्गुणांची यादी तयार करा.

२.       या यादीशी इतर लोक किती सहमती दर्शवितात?

३.       तुम्ही लोकांचे ऐकता का?

४.       त्यांच्याकडून माहिती मिळवता का?

५.       तुम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये फरक करता येतो का?

६.       तुम्ही लोकांसाठी किती उपलब्ध आहात?

७.       तुम्ही नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारता का?

८.       तुमच्यातील गुण विकसित करण्यास काय करावे लागेल?

 

Post a Comment

0 Comments