आपला स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट

 

आपला स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट

 

आपला स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट

Photo from Google Images


१५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. इंग्रजांनी सुमारे दिडशे वर्षे येथे राज्य केले. परकीय सत्तेमुळे आपली प्रगती होत नव्हती. सर्वांनाच खूप त्रास होत होता. गुलामी कोणाला आवडेल? आणि म्हणूनच इंग्रजांविरुध्द अनेकांनी लढा देण्याचे ठरविले.

 

केवळ व्यापाराच्या निमित्ताने येथे आलेल्या इंग्रजांनी हळूहळू एकेक क्षेत्र ताब्यात घेतले होते आणि संपूर्ण भारतावर ते राज्य करू लागले. तैनाती फौजेचा बहाणा करून त्यांनी येथील राजांना ऐषआरामी आणि कुचकामी बनविले. शिक्षण पध्दतीत बदल घडवून जनतेचा स्वदेशाभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुशिक्षित लोकांनारावबहादूर', 'रावसाहेब' अशा पदव्या देऊन आपल्या मुठीत घेतले.

 

पण तरीही या देशात काही जण असंतुष्ट होतेच. आपल्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करीत पुन्हा स्वातंत्र्य मिळवावे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या अंत:करणात देशभक्ती जागी होती.

 

आणि म्हणूनच पहिल्यांदा मंगल पांडेने उठाव केला. शिपायांचे बंड म्हणत म्हणत ते पहिले स्वातंत्र्य युध्द ठरले. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे अशा अनेकांनी उठाव केला. पण अपुरी साधने, फितुरीची लागण यामुळे हा लढा अयशस्वी झाला.

 

पुढे काँग्रेसची स्थापना झाली. जहाल - मवाळ मार्गांनी स्वातंत्र्याची मागणी भारतीय जनतेने केली. क्रांतिकारकांनीही आपल्या सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांना धडे देण्यास सुरुवात केली.

 

लो. टिळक, आगरकर, . गांधी, स्वा. सावरकर अशा अनेक नेत्यांनी हालअपेष्टा सोसल्या, तुरुंगवास भोगला तर भगतसिंग, राजगुरूंसारखे काही तरुण हसत हसत फाशी गेले.

 

पण अखेर इंग्रज या सर्व गोष्टीस वैतागले आणि हा देश सोडून गेले. आपण स्वतंत्र झालो. हे स्वराज्य टिकविण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत.

Post a Comment

0 Comments