यशाचा पाया - उत्कृष्ट नियोजन
नियोजनाचा
गाभा
आपणाला एखादे
उद्दिष्ट ठरवायचे आहे किंवा
इच्छित उद्दिष्टाबाबत चांगल्या
प्रकारे नियोजन करायचे
आहे, तेव्हा प्रत्येक
गोष्टीबाबत खालील गोष्टी
तपासून बघा. कसे?
कधी? केव्हा? कोण?
कोठे? का? कोणते?
हे प्रश्न तुम्ही
स्वतःलाच विचारा. उत्तरे मिळत
नसल्यास इतरांची निःसंकोच
मदत घ्यावी. प्रत्येक
गोष्ट ठरवताना, करताना
माझ्यासाठी यात काय
दडलेले आहे?' हे
माहिती असावे.
कोणतेही नियोजन करताना
विचारांना कागदावर उरतवा :
स्वतःजवळ नेहमी पेन, डायरी, वही इत्यादी वस्तू असू द्या. एखादा चांगला विचार, सूचना, कल्पना येताच ती लिहून काढा. अशा सूचना, विचार लिहिणे नेहमी चांगले असते. इतर वेळेत या सूचनांवर तुम्ही विचार करू शकता. कालांतराने तुमच्या लक्षात येईल की, तुमच्याकडे सूचनांची, विचारांची एक साखळी तयार झालेली असेल.
अनुक्रमणिका करा :
शक्य झाल्यास
त्या विचारांची एक
अनुक्रमणिका तयार करा.
अनुक्रमणिका तयार झाल्यास
तुमच्या लक्षात येईल
की, तुमच्या उद्दिष्टाकडे
जाण्यासाठी कोणकोणते टप्पे तुम्ही
पार करणार आहात
व त्यासाठी तुम्हाला
नेमके काय करावे
लागणार आहे.
समस्या सोडवा :
प्रत्येक टप्प्यावर, जर
असे घडले नाही
तर काय कराव!
असा एक छोटा बॅकअप विचाराधीन
ठेवावा. समोर येणाऱ्या
समस्या, निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना
करण्यास मदत मिळते.
कामांचा क्रम ठरवा
:
कोणते काम तातडीचे आहे, कोणते काम नंतर केले तरी चालेल याची उतरंड करणे, हे ओळखता येणे शिका. प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे.
भव्य स्वरूप द्या
:
आपण लिहून
ठेवलेल्या विचारांना, संकल्पनांना मोठे
स्वरूप द्या. याला
आपण डेव्हलपमेंट म्हणू.
विचारांना मोठे स्वरूप
देताना त्यात कल्पना
किती आहे व वास्तविकता किती आहे
याचा विचार करावा.
उत्कृष्ट नियोजनाचे रहस्य
स्वजबाबदारी ओळखणे म्हणजेच उत्कृष्टपणे नियोजन करणे. आपण वेळेनुसार आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतो. आपण त्या व्यवस्थितपणे हाताळल्या नाहीत तर आपला व इतरांचा अपेक्षाभंग होऊन समस्या निर्माण होतात. एखादे उद्दिष्ट समोर ठेवल्यावर आपल्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असणार आहेत याची यादी करा. जर तुमच्या उद्दिष्टात इतर लोक मदत करणार असतील, तर त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे ओळखून घ्या. त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना व्यवस्थितपणे पटवून द्या. तुमची भूमिका काय व इतरांची भूमिका काय असणार आहे हे आधीच स्पष्ट करावे.
काळानुसार बदलत्या भूमिका ओळखून त्या त्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात.
स्वतःच्या क्षमतेनुसार टण्याटण्याने नियोजन करा
स्वतःची मानसिक क्षमता,
आर्थिक क्षमता, शारीरिक
क्षमता व शिक्षण
या आधारावरच नियोजन
करावे. जसजसे तुम्ही
उद्दिष्टे साध्य करत
जात तसतसे तुमची
क्षमता वाढेल. तुमची
परिस्थितीही उंचावेल. असाध्य, स्वप्नाळू
अशी उद्दिष्टे कोणती
ते ओळखा. वास्तविकतेत
काय साध्य होऊ
शकते हे पाहा.
जितके वास्तविक उद्दिष्ट
असेल तितके नियोजन
करणे व त्यावर
चालणे सोपे जाईल.
एका विद्यार्थ्याला
सहामाही परीक्षेत ७५
टक्के गुण मिळाले.
त्याने उद्दिष्ट ठरवले
की त्याला ९५
टक्के गुण मिळवायचे
आहेत. तसे पाहता
हे उद्दिष्ट मुळातच
त्यासाठी फार मोठे
आहे. ४० टक्के
गुण मिळवणाऱ्यासाठी हे
उद्दिष्ट कल्पकच म्हणता
येईल. ७५ टक्के
गुण मिळवणाऱ्याने रात्रंदिवस
अभ्यास करण्याचे ठरवले.
तो त्यासाठी झटू
लागला. स्वतःला पूर्णपणे
अभ्यासाच्या स्वाधीन केले.
अभ्यासापुढे तो तहानभूक
विसरला. परिणामी त्याची
शरीरिक क्षमता दिवसेंदिवस
खालावत गेली व तो ऐन
परीक्षा तोंडावर असताना
आजारी पडला व परीक्षा देऊ शकला
नाही. त्याने त्याच्या
सर्व क्षमता व्यवस्थितपणे
न ओळखल्याने असे
झाले. तसे पाहता
त्याने नियोजनच केले
नव्हते. उद्दिष्ट त्याच्यासाठी
मोठे होते; परंतु
साध्य होते. येथे
त्याने ते कसे साध्य होऊ
शकते हे ओळखण्याची
गरज होती. अभ्यास
तर चुकणार नव्हता;
परंतु तो करण्याची
पद्धत मात्र बदलण्यास
हवी होती. त्याने
का? कसे? केव्हा?
या सर्व प्रश्नांची
उत्तरे स्वतःला दिली
नव्हती. आपण किती
अभ्यास करू शकतो
हे पडताळून पाहिले
नव्हते. म्हणूनच अपयश
पदरी पडले. त्या
विद्यार्थ्याने जर टप्या
टप्प्याने उद्दिष्टे ठरवली असती
व त्या प्रकारे
अभ्यास केला असता,
जसे प्रथम उद्दिष्ट
२० टक्के गुण
मिळवणे. आता त्याच्या
समोर फक्त ५ टक्के गुण
वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.
हे लहानही दिसते
व सोपेही दिसते.
८० ते ८५, ८५ ते
९०, ९० ते पुढे असे
लहान लहान टप्पे
आखल्यास ती उद्दिष्टे
साध्य करता आली
असती.
अनेक व्यापारीसुद्धा कर्ज काढताना ते आपण कशाप्रकारे व किती काळात पतरफेड करू शकतो याचा विचार करूनच कर्ज काढतात, कारण त्यामागे त्यांचे नियोजन असते. कर्ज व व्यवहार आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणेच करतात. व्यापारात गुंतवणूक किती करावी, नफा कसा, केव्हा व किती होईल, बाजारातील परिस्थिती कशी आहे, धंद्यात स्पर्धा कशी आहे या सर्व बाबींवर विचारमंथन चालूच राहते व एकामागून एक उद्दिष्ट व्यापारी साध्य करत जातात.
विद्यार्थ्यांसाठी
अल्पकालीन नियोजन म्हणजे
अभ्यासाद्वारे गुणसंख्येत वाढ, मध्यमकालीन
नियोजन म्हणजे एखाद्या
उच्च अभ्यासक्रमात प्रवेश
मिळवणे इत्यादी. व
दीर्घकालीन नियोजन म्हणजे
आपल्या ज्ञानाचा योग्यरीत्या
वापर. प्रत्यक टप्प्यावर
स्वतःची भूमिका ओळखून
जबाबदारी स्वीकारा. आपण आखलल्या रस्त्यावरून चालणे आपणास सोपे जाईल.
नियोजन कसे करावे?
चिंटू एक नववीच्या वर्गातील साधारण विद्यार्थी. त्याला इंग्रजीत सुरुवातीपासूनच कमी मार्क्स मिळत होते. यंदाच्या सहामाही परीक्षेत तो इंग्रजीत नापासच झाला. पुढे काय होईल, पुढे तर १० वीचे वर्ष आहे, अशा अनेक प्रश्नांनी त्याला घेरले. भीती न बाळगता चिंटूने ठरवले की, इंग्रजीसह सर्वच विषयांत यश मिळवायचे.
त्याने आपले रोजचे निरीक्षण केले. शाळेसाठी तयार होण्यातच सकाळचा वेळ जात असे. शाळेमध्ये जे इतरांना समजले इतपत त्यालाही समजत असे. शाळेनंतर तो थकायचा. थोडा वेळ आराम करून तो खेळण्यास जायचा. आल्यावर जेवण व झोपण्यापूर्वी गृहपाठ असेल तर करत असे. स्वाध्यायास वेळ नाही हे त्याच्या लक्षात आले. मग त्याने आपल्याला इंग्रजीत कमी मार्क्स का मिळतात याचे कारण शोधले. वर्गपाठ व गृहपाठ करून तो कसेबसे काठापर्यंत पोहोचत असे, परंतु व्याकरण व लिखाण कच्चे होते. त्यासाठी त्याला वेळ व सतत मार्गदर्शन हवे होते. चिंटूने नियोजन केले. त्याने रोज सकाळी, शाळेत जाण्यापूर्वी व्याकरणावर वेळ देण्याचे ठरवले. बाजारातून व्याकरणावर परिपूर्ण असे उत्तम पुस्तक आणले व अभ्यास सुरू केला. शाळेनंतर आल्यावर गृहपाठ करीत. झोपण्याअगोदर दुसऱ्या विषयांचा अभ्यास करत. रविवारी व सुटीच्या दिवशी लिखाण करीत असे व झालेल्या अभ्यासाची उजळणी करत असे. अडचण आल्यास वर्गातील हुशार मुलांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन तो वेळोवेळी घेत होता. झाले, त्याला इंग्रजीत ८५ टक्के मार्क्स मिळाले व विशेष योग्यता श्रेणीने दहाव्या वर्गात चिंटूने प्रवेश केला. चिंटूने येणाऱ्या कित्येक इंग्रजी परीक्षांचा महत्त्वाचा पाया नववीतच पक्का केला, तो फक्त त्याच्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर.
'नियोजन' म्हणजे काय? ते कसे करावे?
नियोजन म्हणजे अनेक उद्दिष्टांना गाठण्यासाठी आखलेला व वेळेच्या सीमेत असलेला आराखडा. काय करायचे? कसे करायचे? केव्हा करायचे? कोठे करायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या साच्याला 'नियोजन' म्हणतात.
एखाद्या व्यापाऱ्याचे अल्पकालीन नियोजन त्याच्या व्यापाराचे जाळे वाढवण्याचे असू शकते. मिळणाऱ्या नफ्यावर आणखी नफा कसा मिळवता येईल, त्याची टक्केवारी हळूहळू कशी वाढेल हे तो नियोजित करतो. त्याचे मध्यमकालीन नियोजन आपल्या व्यापाराला एका मोठ्या वर्तुळात भरभराट मिळवून देणे असू शकते. मग ते वर्तुळ तो आपल्या कुवतीप्रमाणे, वेळ व काळाप्रमाणे ठरवतो. ते वर्तुळ म्हणजे त्याचे गाव, तालुका, जिल्हा, प्रदेश काहीही असू शकते. त्याचे दीर्घकालीन नियोजन म्हणजे नफ्यात स्थिरता, व्यापारात नावीन्य, नवउत्पादन इत्यादी काहीही असू शकते.
एकूण काय साध्य करायचे आहे हे आपणास माहीत असायला हवे. मार्ग तुम्ही तुमचा शोधू शकता. त्यावर चालण्याची व परिस्थितीवर मात करण्याची तयारी असावी. नियोजन ढासळल्यास 'बॅकअप' प्लॅन ठेवावा. 'हे नाही झाले तर' यापुढे काय याचा विचार आधीच करावा.
एका गावात रमण, दत्ता व सदानंद यांची कापडाची दुकाने होती. रमण विचार करत असे की आपला धंदा फार धाकधुकीचा आहे. यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, तेव्हा जास्त गुंतवणूक करू नये व आपला हंगामी मोसमात जेवढा नफा होईल तेवढा पदरात पाडून घ्यावा. दत्ता तसा व्यवहारी होता, तो आपले गिहाईक टिकवून ठेवी. हिशोबास चोख राही. आपल्या दुकानात सर्व प्रकारचा माल ठेवी. तोटा होऊ नये याकडे बारीक लक्ष देत असे व एका मर्यादेपेक्षा जास्त नफा कमावण्याच्या फंदात पडत नसे. सदानंद मात्र चाणाक्ष होता. तो आहे त्यात समाधानी नव्हता. त्याला नेहमी वाटे की, कापडाच्या धंद्यात पैसा आहे. कितीही मंदी आली तरी, वस्त्र ही माणसाची मूळ गरज आहे. त्याने आपल्या दुकानात नवनवीन माल ठेवण्यास सुरुवात केली. बदलत्या काळाची जाणीव ग्राहकाला करून दिली. त्यांना फॅशन काय आहे हे पटवून दिले. त्याची गिहाईकी वाढली. वेळ पडली तेथे सदानंदने उधारीवर कपडे दिले. बघता बघता गावात सदानंदची चार दुकाने झाली. उत्पादकाला होणारा नफा बघून सदानंदने स्वतः कपडे तयार करण्याचे मनाशी ठरवले. प्रथम त्याने वस्त्रोद्योगाची
संपूर्ण माहिती घेतली. त्याच्या लक्षात आले की, उत्पादक आपला माल एका ठरावीक प्रदेशात विकतात. ज्याचा त्याचा स्वतःचा एक विपणन प्रदेश असतो. सदानंदने प्रथम आपल्या आसपासच्या गावात आपल्या मालाचा खप व्हावा या दिशेने पाऊल उचलले. तयार होणाऱ्या मालाची कमाल विक्री होईल याची शाश्वती येताच त्याने स्वतःची फॅक्टरी काढण्याचा निर्णय घेतला. कच्चा माल देणाऱ्याशी उचित संधान साधले. अत्याधुनिक यंत्रसामग्री मागवून प्रशिक्षित कामगारांची एक फळी उभी केली. सर्वांना त्यांची कामे योग्य प्रकारे वाटून देत प्रत्येक दिवस तो उद्योगाचे नियंत्रण करू लागला. सदानंदकडे पैसा आला, प्रसिद्धी आली व दिवसागणिक त्यात वाढ होऊ लागली. सदानंद यावरच थांबला नाही तर त्याने परप्रांतातही आपला जम बसवला.
रमण, दत्ता व सदानंदकडे पाहताना आपण सहजपणे सांगू शकतो की यामध्ये यशस्वी कोण आहे. रमणने सामान्य माणसाप्रमाणे विचार केला व कोणतीही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. दत्ताने मात्र आहे त्यातच समाधान मानले. त्याने आहे ती परिस्थिती स्वीकारली व त्यातच आनंद मानला. सदानंदने मात्र परिस्थितीवर मात केली. त्याने प्रत्यक्षात परिस्थितीला संपूर्णपणे सामोरे जात विविध विकल्पांवर विचार केला. यशाकडे जाणाऱ्या प्रत्येक पावलावर तो चालत गेला.
तत्पूर्वी सदानंदने यशाचे प्रथम पाऊल उचलले होते. ते म्हणजे नियोजन. त्याला नेमके काय करायचे आहे, कोठे पोहायचे आहे, हे माहीत होते. यासाठी त्याने स्वतःच्या क्षमता - मानसिक व आर्थिक - ओळखत एक एक पाऊल उचलत गेला. तसेच त्याने दुकानातून एकदम कारखाना टाकण्याचा निर्णय घेतला नाही. त्याने सर्वप्रथम भीती पळवली. वस्त्र या धंद्याला मरण नाही, ही पक्की खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. नंतर त्याने एक भरगच्च कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमात त्याने त्याच्या प्राथमिकता योग्य प्रकारे आखल्या. त्याचे कापडाचा धंदा वाढवणे हे अल्पकालीन नियोजन होते. आपल्या मालाचा जम बसवणे, आपला वट निर्माण करणे हे मध्यमकालीन नियोजन होते व कारखाना सुरू करून वस्त्रोद्योगात भरारी घेणे हे दीर्घकालीन नियोजन होते.
भीती पळवा :
गेलेला क्षण हा इतिहासजमा झालेला आहे, तेव्हा त्यावर पश्चात्ताप करत बसू नका. येणारे क्षण हे आनंदाचे करण्यासाठी गेलेल्या वेळेचा सल मनातून काढा. तसेच रिकामेसुद्धा बसू नका. स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून ठेवा. म्हणतात ना, 'रिकामे डोके हे सैतानाचे घर' असते! मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका. स्वतःवरील विश्वास बळकट करा.
'आता काय होईल' यापेक्षा 'याशिवाय वाईट मी होऊ देणार नाही' असा मानस ठेवा. यश मिळविण्याची, यशस्वी होण्याची जिद्द मनाशी बाळगा.
लक्षात ठेवा...
जर तुमचे मन तुम्हाला सांगते, 'हो, मी हे करू शकतो', तर ते बरोबर आहे.
उद्दिष्ट ठरवा
चिंटूचे उद्दिष्ट होते इंग्रजीवर मात करणे.नववीची परीक्षा हीच त्याची पहिली पायरी. यश हे अनेक उद्दिष्टे गाठल्यावरचं साध्य होतं. नियोजन करताना काय करायचे आहे? हे साध्य झाल्यावर काय होईल? ते कसे साध्य करता येईल याचा मागोवा घ्यावा.
भरगच्च कार्यक्रम आखा
तुम्ही रेल्वेचे तिकीट पाहिलेले आहे ना? त्यावर काय काय लिहिले असते? कोठून कोठे जाणार? किती पैसे लागतील? प्रवासाची तारीख व निघण्याची वेळ काय? रेल्वेचा क्रमांक, दर्जा व तुमचे आरक्षण इत्यादी. यश हा सुद्धा एक प्रवास आहे. परंतु तो संपत नाही, कारण एक उद्दिष्ट साध्य केल्यावर दुसरे असतेच. नियोजन करताना, मग तुम्ही विद्यार्थी असो किंवा व्यापारी, अशा प्रकारे उद्दिष्टे ठरवा. उद्दिष्ट हे तुमचे पोहोचण्याचे ठिकाण आहे. त्यासाठी काय लागेल याची यादी तयार करा. उद्दिष्ट साध्य करताना मध्ये कोणते पडाव येतील याची माहिती घ्या. गावाला जाताना मध्ये गाडी बऱ्याचदा थांबते. ती ठिकाणे, स्थानके आल्यावर आपणास कळते की, आपले गाव किती लांब राहिले, तसेच हे पडाव सुद्धा आपल्याला सुचवतील की, आपलं उद्दिष्ट किती दूर आहे. एक लक्षात ठेवा, मध्येच उतरू नका, म्हणजे उद्दिष्ट जवळ आल्यावर मागे फिरू नका व 'आता काही पर्वा नाही' अशी भूमिकाही घेऊ नका.
सर्व बाबी तपासल्यावर मुहूर्ताची वाट बघू नका. उद्दिष्टे जर आवाक्यात आहेत, तर कामाला लागा.
अनेक उद्दिष्टांची गुंतागुंत टाळण्यासाठी विविध प्रकारे नियोजन करा. नियोजन हे प्रामुख्याने तीन प्रकारे केले जाते.
१. अल्पकालीन नियोजन,
२. मध्यमकालीन नियोजन,
३. दीर्घकालीन नियोजन
१. अल्पकालीन नियोजन
-
हे नियोजन साधारणतः तुम्हाला ४-६ महिन्यात काय साध्य करायचे आहे त्यासाठी असते. योजना छोट्या स्वरूपाच्या असतात
२.
मध्यमकालीन नियोजन –
तुम्हाला १ ते ३ वर्षात
काय काय साध्य
करायचे आहे याचा
आराखडा म्हणजे मध्यमकालीन
नियोजन.
३. दीर्घकालीन नियोजन –
५ ते १० वर्षांत तुम्ही कोठे असाल? या काळात तुम्हाला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे, यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे.
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
त्यामध्ये बदल कधीच
करू नये. अल्पकालीन
नियोजनात परिस्थितीनुसार बदल करा.
पण त्याचा परिणाम
मध्यम दीर्घकालीन नियोजनांवर
होऊ देऊ नका.
उद्दिष्टांवर कडी नजर
ठेवा. नजर हटल्यास
दुर्घटना होऊ शकते.
ज्ञान व माहिती मिळवा –
तुमच्या उद्दिष्टाला विशेष
धोरण असणे आवश्यक
आहे व ते नेहमी भविष्यकाळ
लक्षात ठेवूनच आखावे.
उद्दिष्टाला साध्य करण्याची
कार्यपद्धती तुम्हा स्वतःला
तयार करायची आहे.
यासाठी ज्या त्या
क्षेत्रातील ज्ञान व
माहिती मिळवा. मिळेल
तिकडून मदत मिळवा.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तुम्ही साध्य करू
इच्छिणाऱ्या उद्दिष्टांच्या विषयाचे सखोल ज्ञान
व संपूर्ण माहिती
असणे अत्यंत आवश्यक
आहे. त्यातही तुम्ही
विशेषतः नेमके कुठे
उणे आहात हे माहीत करा.
चुका होतात, तर
त्या कशा दुरुस्त
करता येतील यावर
भर द्या.
उद्दिष्ट गाठण्यासाठी तुमच्याकडे आतापर्यंत एक भरगच्च कार्यक्रम तयार असेलच, तर मग चला, एक एक पाऊल पुढे टाकूया.
कार्यबिंदू
·
भीती
बाळगू नका.
·
तुमची
उद्दिष्टे ठरवा.
·
नेमके
कोठे पोहोचायचे आहे?
कसे?
·
तुमचे
अल्प, मध्यम, दीर्घकालीन
नियोजन काय आहे?
·
उद्दिष्टांसंबंधी
ज्ञान व माहिती
मिळवा.
·
तुम्ही
कोठे कमी आहात?
·
चुका
कोठे होतात?
·
चुका
सुधारून पुढे जा.
0 Comments
Thank you for your response. It will help us to improve in the future.