यश म्हणजे काय?
यशाची व्याख्या प्रत्येकजण आपल्या परीने करतो. बहुतेकदा गडगंज संपत्ती मिळवणे, व्यापारात भरभराट असणे, भरपूर पैसा, हाताखाली नोकर-चाकर, गाडी, बंगला व प्रसिद्धी याला सामान्य माणूस 'यश' ही संकल्पना देतो. अनेकदा आपण यशाची ही संकल्पना समाधानाजवळ नेऊन पोचवतो. माणसाला जेव्हा एखादी इच्छित वस्तू किंवा उद्दिष्ट मिळते तेव्हा साहजिकच तो आनंदी होतो; परंतु यालाच लोक समाधान किंवा यश असे म्हणतात. ते आहे यात काही वाद नाही; परंतु हे यश चिरकाळ टिकवणाऱ्यालाच खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणता येईल. क्षणिक सुख-समाधानाकडे न धावता जो निरंतर सुखी व समाधानी होण्यास खडतर रस्त्यावर एकामागून एक अशा अनेक समस्यांना सामोरे जातो त्यालाच यशस्वी म्हणतात.
यश म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीने यश
मिळवले आहे, हे आपण केव्हा
मान्य करतो? त्या
व्यक्तीने आपले मनोनीत
उद्दिष्ट मिळवले असेल,
तरच! हो ना? आपण आपल्या
आसपास अनेक लोकांना
यशस्वी होताना बघतो.
विद्यार्थी परीक्षेत, खेळाडू स्पर्धेत,
कलाकार ज्यांच्या त्यांच्या
मंचावर यशस्वी होताना
दिसतात. 'ही माणसे
यशस्वी कशी होतात”
हा प्रश्न साहजिक
आहे. त्यांच्याकडे काही
जादुई शक्ती आहे
का? का कुणी अमुक खडा
वापरण्यास सुरुवात केली, म्हणून
तो यशस्वी झाला?
तमुक दिवशी उपवास
केला, दान केले
तर यश मिळते?
हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे.
केवळ पैसा मिळवणे म्हणजे यशस्वी होणे, असे मुळीच नाही. तसेच केवळ परीक्षेत चांगले मार्क्स घेणे किंवा कुण्या चांगल्या महाविद्यालयात, कोर्सला, जसे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इ. प्रवेश मिळवणे याला यश म्हणायचे काय? नाही. कारण 'यश'
हे एखादेच उद्दिष्ट गाठण्याचे द्योतक नाही. 'यश' म्हणजे अनेक उद्दिष्ट साध्य करण्याची कला आहे. यश म्हणजे जे हवे आहे ते मिळवून देणारे एक तंत्र आहे. आज आपण पाहतो की, बिल गेट्स, हेन्री फोर्ड, धीरूभाई अंबानी, अझीज प्रेमजी, शंतनू किर्लोस्कर इत्यादी लोकांनी यशाची एक एक पावले उचलत स्वतःला शिखरापर्यंत पोचवले आहे. तेव्हा यश हे शिखरापर्यंत पोहोचण्याचे, सामान्याकडून विशेषतेकडे नेणारे एक शास्त्र आहे.
हे शास्त्र जो कुणी आचरणात आणेल तो नक्कीच यशस्वी होईल, समृद्ध होईल.
यश मिळविण्यासाठी खरंच काही सूत्रे आहेत का? सूत्रे जुळवून जशी गणितं सोडविता येतात, तशी आयुष्यातील कोडी, अडचणी दूर करण्याची ही सूत्रे आहेत का? नाही. कारण यशाची परिभाषा माणसागणिक बदलते. ती माणसाला परिस्थिती व वेळेनुसारही बदलते. जसे, दोन डोळे, दोन कान, एक नाक व एक तोंड, हाताला दहा बोटे, पायाला दहा बोटे असले तरी आपण जगातील सर्व माणसे इतरांपेक्षा वेगळे आहोत, तेव्हा यशही हे प्रत्येकाचे वेगळेच असणार. यश हे माणसाच्या संस्कारांवर, शिक्षणावर, बौद्धिक क्षमतेवर, त्याच्या आंतरिक गुणांवर व आसपासच्या वातावरणावर अवलंबून असते.
तर मग ही 'यशाची सूत्रे' आली कोठून? माणसाच्या यशस्वी होण्यामागे कोणती कारणे असतात? कोणत्या मार्गाने ती यशस्वी होतात. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यावर कळते की, यशस्वी व असामान्य लोकांमध्ये बरेचसे गुण हे सारखे असतात. बऱ्याचदा त्यांनी सारख्याच अडचणींना तोंड दिलेले असते. तसेच हे गुण, कौशल्य, कसब तुमच्यातही आहे. परंतु बऱ्याच लोकांना स्वतःकडील गुणांची जाण नाही. काही लोकांना जाण आहे, परंतु योग्य शक्ती योग्य वेळी ते वापरत नाही. यशस्वी लोकांना कोणत्या वेळी काय करायचे हे ठाऊक असते. सामान्य माणूस नेहमी या ना त्या कारणांचा हवाला देत डोक्यावर टेन्शन कायम ठेवतो. यामुळे त्याच्या मधील गुणांची शक्ती ही कमी होते, क्षीण होते.
हे गुण कोणते, ज्यामुळे माणूस यशस्वी होतो? ते कसे ओळखावेत? त्यांना विकसित कसे करावे? त्यांचा वापर कसा व केव्हा करावा? यशस्वी व समृद्ध कसे बनावे या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी 'यशाची सूत्रे' हे पुस्तक वाचावे. नुसतेच वाचावे असे नाही, तर त्यावर अंमलही करावा. पुन्हा लक्षात ठेवा, ही सूत्रे तुम्हाला रातोरात यशस्वी करणार नाहीत, त्यावर सतत अंमल केला तरच यश तुमच्या पदरात पाडील.
कार्यबिंदू
- Ø आंतरिक गुणांवर यश अवलंबून असते.
- Ø आपल्यातल्या गुणांची पारख करा..
- Ø कोणत्या वेळी काय करायचे महत्त्वाचे
- Ø अंमलबजावणी करणे महत्त्वाचे
- Ø यशस्वी होण्याचे कसब, कौशल्य प्रत्येकात असते..
- Ø यश मिळविण्यासाठी काही सूत्रे आहेत ती आत्मसात करा.
- Ø यशाची परिभाषा व्यक्तिसापेक्ष असते.
0 Comments
Thank you for your response. It will help us to improve in the future.