अंतज्योत

अंतज्योत 

  

अंतज्योत

Photo by Hakan Erenler from Pexels


  देवभूमी भारताच्या ऋषींनी जे अद्भुत शोध लावले आहेत , तसे शोध विश्वात कोठेही लागलेले नाहीत . मनुष्याचा स्वभाव तीन गुणांच्या प्रभावाने संचालित होतो . त्यातील रजो - तमोगुण मनुष्याला अत्यंत दुःखद अनुभव करवून त्याच्या वर्तमान जीवनास निकृष्ट बनवितो आणि मग वृक्ष , पशू , पक्षांसारख्या तुच्छ योन्यांमध्ये घेऊन जातो . 

    सत्त्वगुण वर्तमान जीवनाला दिव्य बनवितो आणि स्वर्ग व ब्रह्मलोक इ . उच्च लोकांत पोहोचवितो . त्यातही ब्रह्मवेत्त्यांचे प्रत्यक्ष सान्निध्य व सत्संग मिळाला तर तिन्ही गुणांच्या पलीकडे स्वतःच्या खऱ्या आनंदघन आत्म्याला जाणून जीव जीवन्मुक्त होऊ शकतो . 

    चला , आता रजो - तमोगुणाचा कुप्रभाव व सत्त्वगुणाचा सुप्रभाव पाहू तमोगुणी मानव वर्ग आळशी - प्रमादी होऊन , तुच्छ विषय विकारांना मनात ठेवून बसल्या - बसल्या किंवा झोपल्या - झोपल्याही इंद्रियभोगांची स्वप्ने पाहत असतो . 

    जर कधी कर्मपरायण असला तरीही हा वर्ग हिंसा , द्वेष , मोहासारख्या देहधर्माच्या कर्मातच प्रवृत्त राहून बंधनात बांधला जातो . मलीन आहार , अशुद्ध विचार आणि दुष्ट आचरण करता - करता तमोगुणी मानवी पुतळ्याला आळशी - प्रमादी राहूनच देहभोगाची भूक मिटविण्याची जितकी आवश्यकता वाटते तितकेच कर्मपरायण राहावेसे वाटते . रजोगुणी मनुष्य प्रमादी नाही , प्रवृत्तीपरायण असतो . 

    त्याच्या कर्मपरंपराच्या पृष्ठभूमीत आंतरिक हेतू रूपात काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर , दंभ इ . सर्वकाही असते . सत्ताधिकाराची तीव्र लालसा आणि देहरक्षणाचेच कर्म - विकचि कंटकवृक्ष त्याच्या मनोभूमीत उगवून वाढत असतात . त्याच्या लोभाची सीमा वाढून रक्ताच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचते . कधी त्याहीपेक्षा पुढ जेथे मान मिळतो , वाहवाही किंवा धन्यवादाचा वर्षाव होतो अशा वेळी तो थोडा खर्च करतो अशा रजोगुणी मनुष्याच्या मनासही बहिर्मुखच म्हटले जाते . असे मन मोटेपणाच्या मागे वेडे होते . त्याचे मन विषय - विलासाच्या वस्तू एकत्र करण्यात मग्न होऊन अर्थ संचय व विषय - संचयाचे खेळच खेळत असते . या दोन्ही प्रकारच्या मनुष्यांचे मन स्वच्छंदी , स्वार्थी , सत्ताप्रिय , अर्थप्रिय आणि मानाचे इच्छुक असते आणि कधी कधी कपट कारस्थानाला प्रतिकार घेण्यातही सक्षम होण्याची योग्यता असते . 

    अशा मनाचा कल इंद्रिये , इंद्रियांचे विषय आणि विषय भोगांकडून निवृत्त न झाल्याने भोगप्राप्तीसाठी ते मन नित्य - नवीन कर्म करण्याच्या योजनाआखू लागते . मन असा विचार करून बुद्धीला शुद्ध करीत नाही तर बुद्धीला रजोगुणयुक्त बनवून , स्वतःच्या वासनेनुसार त्याची स्वीकृती घेऊन - " मी करतो ते योग्यच करतो . अशी दंभयुक्त मान्यता निर्माण करतो . अशा आसुरी भावाने आक्रांत लोकांचे अनुकरण तुम्ही करू नका . राजसी लोकांच्या रजोगुणामुळे अनेक प्रकारच्या वासना उत्पन्न होतात . म्हणून हे भाऊ ! सावध रहा , रजो - तमोगुणाच्या प्रधानतेमुळेच सर्व पापे होतात . 

    जसे कोयता ( विळा ) , चाकू , सुरी , तलवार इ . वेगवेगळे असूनही त्याचा धातू लोखंडच आहे , तसेच पापाची नावे वेगवेगळी असूनही पापाचे मूळ रजो - तमोगुणच आहेत . जगात बहुमती अशाच लोकांचीच आहे . अशा वर्गाला प्रवृत्तिपरायण म्हटले जाते . याच्या कर्मात मोक्षबुद्धी नसते . म्हणून जर या वर्गाला स्वतंत्रपणे व्यवहार करू दिला तर समाजात अशी अव्यवस्था निर्माण होते की ज्याचे परिणाम सर्वत्र स्वार्थ व दंभरूपी मेघ एकत्र होतात , कपट व प्रपंचरूपी वादळ उठू लागते आणि सर्वत्र दुःख आणि संकटांचे प्रहार झाल्यामुळे प्रजा आक्रोश करते . 

    हे दोन वर्गच जर परस्पर संघर्ष करु लागले तर हिंसा , द्वेष , स्वार्थ आणि भोगबुद्धीच्या कर्मातच प्रजा लिप्त राहू लागते आणि युद्धाची वेळ येते . प्रत्येक युगात व प्रत्येक देशात असाच संहार होत असतो . हा उन्नतीचा मार्ग नाही . अवनतीकडे जाणाऱ्या मनुष्याने आत्मोन्नतीच्या आनंदाकडे जावे यासाठी बुद्धीच्या शोधनाची , त्याच्या

    अतज्यत्ति विचारशक्तीत विवेकरूपी सूर्य उदय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे . मन व इंद्रियांना विषयांचे स्मरण , चिंतन , प्राप्ती व भोगाची जन्म जन्मांतरीची जी सवय लागली आहे त्याच्यात असार दिसल्यावर मन त्यांच्यापासून विमुख होते . तेव्हा बुद्धीला स्वतःच्याही पलीकडील आत्म्याकडे अभिमुख होण्याची रुची व जिज्ञासा उत्पन्न होते , आत्मरस प्राशन करण्याचे भाग्य लाभते , संसाराच्या मायाजाळापासून वाचण्याची शक्ती मिळते . जेव्हा बुद्धीला आत्मनिरीक्षणाकरिता विचार करण्याची भोगमुक्त दशा प्राप्त होते तेव्हा ती प्रत्येक कर्मात विवेकाचा उपयोग करते . त्यावेळी तिच्या अंतःकरणात आत्म्याचा थोडा प्रकाश पडतो , ज्यामुळे विषयांचा काळोख काही अंशी क्षीण होतो . 

    हा आहे खालून वर जाणारा तिसरा , अतरातून प्रगट होणारा स्वयंभू सुखाची लालसा असलेला , बुद्धीच्या स्वतःच्या प्रकाशाचा भोक्ता - सत्त्वगुण या सत्त्वगुणाच्या प्रकाशमय स्थितीमुळे बुद्धीचे शोधन होते . कर्म - अकर्म , धर्म - अधर्म , नीती - अनीती , सार - असार , नित्य - अनित्य वगैरे समजून वेगळे करण्याची व धर्म , नीती , सदाचार आणि नित्य वस्तूविषयी चित्ताची सहज स्वाभाविक अभिरुची करण्याची शक्ती यांच्यापासूनच संप्राप्त होते . एकीकडे मानवीय जीवनाच्या अंतप्रदेशात आत्मा ( आनंदमय कोष ) व बुद्धी ( विज्ञानमय कोष ) आहे , तर दुसरीकडे प्राण ( प्राणमय कोष ) आणि शरीर ( अन्नमय कोष ) आहे . या दोघामध्ये मन ( मनोमय कोष ) आहे . ते जेव्हा बहिर्मुख होते तेव्हा प्राण व शरीराद्वारे इंद्रिये विषय भोगांमध्ये लिप्त होऊन तशाच धर्म - कर्मात प्रवृत्त राहतात . ही आहे . 

    मानवीय जीवनाची तामसिक आणि राजसिक अवस्थेची चक्राकार गती . परंतु त्या मनाला ( मनोमय कोषाला ) ऊर्ध्वमुख , अंतर्मुख अथया आत्माभिमुख करणे - हेच आहे मानवी जीवनाचे परम कल्याणकारी लक्ष्य ऋषींनी परम आनंदघन आत्म्यालाच लक्ष्य मानले आहे कारण मानुष्याच्या जीवनकाळाची मीमांसा केल्यावर ही गोष्ट स्पष्ट होते की अंतज्योत त्याची सर्व धावपळ सुखासाठी होत असते ... नित्य सुखासाठी . 

    नित्य व निरावधी सुखाची सतत आकांक्षा असूनही तो रजो - तमोगुण व इंद्रियलोलुपतेच्या अधीन होऊन सतत बहिर्मुखच राहतो . त्याच्या सर्व क्रिया विषय - प्राप्तीसाठीच होतात . मनुष्याची जीवन - संपदा , शारीरिक बल , संकल्पशक्ती इ . जे काही त्याचे सर्वस्व मानले जाते ते सर्वकाही जन्म व मृत्यूमध्येच व्यर्थ नष्ट होते . परंतु त्याच मनावर ( अंतःकरणावर ) जर सत्त्वगुणाचा प्रकाश पडला तर त्याला स्वधर्म - स्वकर्माची , कर्तव्य - अकर्तव्याचे सूक्ष्म अनुसंधान करण्याचे सुचते . सुख - दुःखाच्या द्वंद्वातून त्याला नित्य सुखाची दिशा सुचते . दुराचाररूपी सशक्त भवऱ्यातून त्याला शांत , गंभीर सत्त्वगुणी गंगेच्या प्रवाहात स्नान करण्याची समज येऊ लागते . विचार सद्विचाराची कुशलता येते . विचार , इच्छा , कर्म , इ . मध्ये शुभ ओळखण्याची समज वाढते ज्यामुळे शुभेच्छा , शुभ विचार व शुभकमें होऊ लागतात जन्म - मृत्युसारखे बंद्रांचे अर्थात संसारचक्र व कर्माचे रहस्य समजाविताना आणि तेच अशुभ आहे असे दाखविताना गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात :

 तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् । 

ते कर्मतत्त्व मी तुला योग्यप्रकारे समजावून सांगेन , जे जाणल्यानंतर तू अशुभापासून , अर्थात कर्मबंधनातून मुक्त होशील . ( गीता । ४.१६ ) 

    धर्माची , पुण्याची नावे वेगवेगळी आहेत , परंतु त्यांचे मूळ आहे सत्त्व सत्त्वगुणरूपी मुळ्यांना पोषण मिळाल्यामुळे जो विशाल वृक्ष वाढतो त्याला मधुर फळे लागतात . तिच फळे आतरिक सुख , स्वतंत्र सुख व मुक्तिदायी सुखाचा मार्ग करून देतात , हा जीव गुणाच्या थपडांपासून गचूनच आपल्या गुणातीत स्वरूपात स्थित होऊ शकतो । आत्मसाक्षात्कार करू शकतो . ज्याच्या ध्यानाने ब्रह्मदेव , भगवान विष्ण अंतज्योत व सांयसदाशिवही सामर्थ्य आणि विलक्षण आनंद प्राप्त करतात , त्या चैतन्यस्वरूपाचा साक्षात्कार करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे हे मिरंतर स्मरणात ठेवा .

Post a Comment

0 Comments