भिल्ल समाजाची तत्कालीन परिस्थिती
पश्चिमखानदेशात भिल्लांमध्ये गावीत , पाडवी , वसावे आणि वळवी ही आडनावे प्रामुख्याने आहेत . याशिवाय इतर आडनावेही आहेत . ती थोडीच त्याचबरोबर कोकणी , पावरा , मावची , धानका कोटला या आदिवासी जमातीही विशिष्ट भागात आहेत . महाराष्ट्र राज्यात पूर्वीपासून धुळे जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून सुपरिचीत होता आता या जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो . इतिहास काळापासून हेलोकजंगलात वस्ती करून राहात असल्यामुळे त्यांचा वनवासी वा गिरीजन असाही उल्लेख होत होता .
सर्वच दृष्टिंनी या मागासलेल्या जमातींना अलिकडे ' आदिवासी ' असा सर्वमान्य शब्द प्रचलित झाला आहे . स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तत्कालीन धुळे जिल्ह्यात एकूण आठ तालुके होते . १ ) धुळे , २ ) साक्री , ३ ) शिरपूर , ४ ) शिंदखेडा , ५ ) शहादा , ६ ) तळोदा , ७ ) नंदुरबार व ८ ) नवापूर याप्रमाणे . स्वातंत्र्यानंतर १ ९ ५० साली अक्कलकुवा हा नववा तालुका निर्माण केला गेला आणि कालांतराने अकराणी महाल ( परगणा ) हे क्षेत्र धडगाव तालुका म्हणून अस्तित्वात आल्याने पश्चिम धुळ्यासह तालुक्याची संख्या दहा झाली . अलिकडच्या काळात खानदेशातधु याधुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा दिला जाऊन नंदुरबार तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुके आणिधुळ्यासह धुळे जिल्ह्यात चार तालुके राहिले .
आदिवासी लोकसंख्या अधिक असलेले अक्कलकुवा , तळोदा , धडगाव , नदुरबार , नवापूर आणि शहादा या सहा तालुक्यांचा नंदुरबार जिल्हा अस्तित्वात आला आहे . या सहाही तालुक्यामध्ये ' भिल या आदिवासी जमातींची लोकसंख्या शहादा आणि धडगाव तालुक्यात अधिक आहे इतर ४ तालुक्यांमध्ये इतर जाती - जमातींची सरमिसळ आहे पण काही गावे अथवाखेडी अशी आहेत की त्या गावांमध्ये भिल्ल वा इतर आदिवासी जमातीचीच ती गावे आहेत म्हणूनच नदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो .
शिवाय ज्या गावांमध्ये सरमिसळ आहे ज्या गावांमध्ये इतर प्रस्थापित समाजातील लोकशेतमालक , जमीनदार आहेत अशा गावांमध्ये शेतमजुरांची वस्ती थोडीशी वेशीजवळ पण वेशीच्या आत असते अशा शेतमजुरांच्या एकापेक्षा अधिक झोपड्या असल्या की त्या वस्तीला ' भिलाटी ' म्हणून ओळखले जात असे . वास्तविक या भिलाटीत मजूर वर्गाचेच वास्तव्य असते . भिल्ल जमातीतील कुणीही अशा वस्तीत राहात नाही . पण अन्य बहुतांश भागात , डांग परिसरात व सर्वसाधारणपणे तत्कालीन धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस बऱ्याच मोठ्या प्रदेशात भिल्लांचे वास्तव्य आहे .
खानदेशात भिल्ल म्हटले की हाच भौगोलिक प्रदेश आणि समाज डोळ्यासमोर येतो . आता या सर्वांनाच ' आदिवासी ही संज्ञा रुढ झाली आहे . त्यामुळे जमातींची खरी नावे स्पष्ट होत नाहीत अशा या अफाट भिल्ल समाजाचा खऱ्या अर्थाने उद्धार केला तो भिल्ल समाजातूनच उंदयाला आलेल्या गुलाम महाराजांनी . असेही सांगितले जाते की गुलाम महाराजांनी भिल्ल समाजाला पुनर्जन्म दिला . मा . शंकरराव ठकार म्हणतात , ' गुलाम महाराजांनी भिल्ल समाजाला पुनर्जन्म दिला म्हणजे काय केले हे समजण्यासाठी तत्कालीन परिस्थिती व भिल्ल समाजाची मूळ स्थिती कशा प्रकारची होती हे समजून घेणे आवश्यक आहे ? वर्षे स्थितीशील , पूर्वी जसा होता तसाच होता.त्याना गुलाम महाराजांच्या मा . शंकर विनायक ठकार यांनी भिल्ल समाजात राहून प्रत्यक्ष कार्य केले होते . ते पायी फिरत होते .
२०/२५ वर्षे त्यांनी प्रत्यक्ष भिल्ल समाजात घालविली ते म्हणतात गुलाम महाराजांचा उपदेश ऐकेपर्यंत तो समाज १०० उपदेशरुपी परिसाचा स्पर्श झाला आणि भिल्ल समाजजीवनाचे सोने झाले . हे सर्वघडेपर्यंत आणि गुलाम महाराजांच्या जादुई उपदेशाची मोहिनी आणि महत्त्व समजून घेण्यापूर्वी आपण तत्कालीन भिल्ल समाजाची परिस्थितीवा पार्श्वभूमी पाहिल्याशिवाय महाराजाच्याअद्भूतसमाजप्रबोधनाच्या कार्याची महती कळणार नाही . ही तत्कालीन भिल्ल समाजाची परिस्थिती श्री . ठकारांच्याच शब्दांमधून समजून घेणे महत्त्वाचे आहे . त्याशिवाय गुलाम महाराजांचे योगदान व श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही . श्री ठकार म्हणतात , " भिल्ल समाजाची सामान्यस्थिती फार केविलवाणी आहे .
भिल्लांचे आयुष्य स्वत : करिता नसून दुसऱ्यांकरिताच आहे . अशी कितीतरी गावे सापडतील की ज्यात एकही साक्षर मनुष्य नाही , असा एकही मनुष्य सापडणार नाही की ज्याची शेंडी सावकाराच्या हातात नाही . तरीही हे लोक उदार व प्रामाणिक असतात या लोकांची ख्याती आहे . या अंगभूत गुणांमुळे म्हणा वा दोषांमुळे म्हणा , स्वत : च्या हक्काविषयीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा अल्प संतुष्ट वृत्तीमुळे म्हणा , हे लोक स्वत : लंगोटी लावून उघडे - वाघडे फिरतील पण दुसऱ्याच्या चिंधीलाही शिवणार नाही . स्वतः बंटी , कोदरा , नागली इ . वनतृणधान्ये ( भगर वर्गातील ) ती गुंगी आणणारी असली तरी त्यांच्या पद्धतीने ते स्वच्छ करून खातील , पण कुणी सावकार , अबकारी खात्यातील कामासाठी आलेल्यासामान्य माणसालासुद्धा चांगले निवडून , कांडून , पाखडून आणि सडून तयार केलेले डाळ , तांदूळ , तेल - तुप , मीठ , पीठ देतील " ( या ठिकाणी हाही उल्लेख केला पाहिजे की अन्य बाहेरचे लोक भिल्लांकडून वस्तु , धान्य घेत असत पण त्यांच्या हातचे जेवण घेत नसत .
श्री . शंकरराव ठकार भिल्लांच्या हातची खिचडी खाणारे पाहिलेच वाणी / ब्राह्मण असावेत . ) आपल्यामध्ये काही सुधारणा होणे शक्य आहे असे त्यांना वाटतच नाही किंबहुना आपल्या वाडवडिलांचे आयुष्य असेच होते त्यामुळे आपले आणि पुढे आपल्या पोराबाळांचे आयुष्य असेच राहणार आहे असा सामान्य समज बहुधा सर्वत्र दिसून आला . लोक अगदी निस्तेज व निष्प्राण बनले आहेत .
वधस्तंभाजवळ नेले जाणारे मेंढरु जसे दीनवाणे असते त्याप्रमाणे ही माणसे होती . एरवी विशेषत : सावकाराच्या दाराशी बसलेली असतांना दिसतात . तरीही सावकाराशी , अबकाराशी , फॉरेस्टरशी किंवा व्यापाऱ्याशी घासाघीस करीत असलेला एकही भिल्ल मला दिसला नाही असे ठकार म्हणतात . अर्थातच ' बळी तो कान पिळी ' वा ' ज्याच्या हाती ससा तो पारधी ' या न्यायाने वागणाऱ्या व द्रव्य हेच सर्वस्व मानणाऱ्या समाजाचे या लोकांशी कसे वर्तन असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही . भिल्ल समाज हा सर्वस्वी शेतकरी समाज होता व आजही आहे . अशिक्षित आणि अज्ञान यामुळे त्यांचे जमाखर्च टिपून ठेवण्याची जबाबदारी त्यांनी उदार अंत : करणाने आपल्या सावकारावर टाकलेली दिसून आली .
त्यामुळे जे पिकेल ते सर्व आपल्या सावकाराच्या घरी आणून टाकावयाचे व नंतर बियाणे जरी लागले तर तेही त्याच्याकडून कर्ज म्हणूनच न्यायचे एव्हढेच नाहीतर संसार खर्चासाठी लागणारे किरकोळ द्रव्यही सावकाराकडून घ्यावयाचे पिढ्यानपिढ्या कपडेलत्ते सुद्धा अशाच पद्धतीने एकाच व्यापाऱ्याकडून घ्यायचे ही प्रथाजवळ - जवळ १ ९७०-८० पर्यंत रुढ होती . भिल्ल समाजामध्ये सामान्यत : देवधर्म , हिंदूचे सणवार इ . विषयक कल्पना प्रामुख्याने आढळत नाही . अपवाद दसरा आणि पाच दिवसांची होळी या उत्सवांची परंपरा आजही बऱ्याच अंशी रुए आहे . त्याकाळी स्त्रियांच्या अंगावरील मुख्य दागिना म्हणजे गळ्यात एकावर एक घातलेले चित्रविचित्र पांढऱ्या खड्यांचे सर हे सर जितके अधिकतितकी तीखी अधिक इभ्रतदार असे मानण्यात येत असे . त्यामुळे काही बायांच्या गळ्यात २५ ३० सरीही असत .
हे सर अगदी गळ्याला लागून असल्यामुळे कडक कॉलम घातलेल्या फॅशनेबल गृहस्थाला ज्याप्रमाणे मान सहज फिरविता किंवा वाकवता येत नाही तशीच या स्त्रियांची स्थिती असे . आता या सरी फारशा आढळत नाहीत . अलिकडे शिकलेल्या व पुढारलेल्या लोकांनी ही सर घालण्याची प्रथा बंद करण्याचे मनावर घेतले हे उत्तम आहे . भिल्ल समाजात एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज होता पण बालविवाह बहुधा होत नसत . भिल्लांमध्ये प्रौढ विवाह होतात एवढेच नव्हे तरवधुवरांची परस्परांची संमती असल्याशिवाय विवाह होऊशकत नाहीत . विवाहात मेजवानीची अत्तर गुलाबाची किंवा पानसुपारीची भानगड नसते .
गावजेवण मात्र द्यावेच लागते . दारुची पंगत दिली तरी काम भागत असे . आता हळुहळू ही प्रथा कमी झाल्याचे दिसून येते . तत्कालीन भिल्ल समाजाचे वर्णन करतांना ठकार म्हणतात , ' असे समजते कीमुल जन्मल्याबरोबर त्याच्या तोंडात दारु घालण्यात येते व माणूस मृत झाल्यावरही त्याच्या तोंडात दारु घातल्याशिवाय त्यांचा अंत्यविधी होत नाही . त्यांच्या वागदेवाला सुद्धा दारुचाच नैवेद्य लागतो इतके असले तरी अधुन - मधून त्यांच्यापैकी काही सुज्ञ लोक या व्यसनाला आळा घालण्याचे प्रयत्न करतांना आढळतात . नटावद , कोळदे , चिंचपाडा व भोरचेक या गावी तर या प्रयत्नांना बरेचसे यश मिळाल्याचे आढळते असा उल्लेख ठाकारांनी केला आहे . जांबतलावाच्या एका समजदार गृहस्थाने तर ठकारांना सांगितले , आम्ही आमच्या जातीचे बंधन घालून या व्यसनाला आळा घालू .
परंतु असे केल्यास मक्तेवाल्यांचे दारुगुत्याचे नुकसान होते त्यामुळे तो सरकारी व अबकारी लोकांच्याद्वारा आमच्यावर काहीतरी कुभांड रचून लोकांना त्रास देतात हे १ ९ ३८ च्या पूर्वीचे भिल्ल समाजाचे वर्णन आज आपल्याला चमत्कारिकवाटेल त्यावर विश्वास बसणार नाही पणत्याकाळातील हीवास्तव परिस्थिती भयावह वमन सुन्न करणारी आहे . तत्कालीन भिल्ल समाजाचे जीवन जवळून पाहणारे , अनुभवणारे श्री ठकार पुढे म्हणतात , मलेरियल हवेचा प्रतिकार दारुमुळे होत तर नाहीच पण दारमुळे भिल्ल लोकांची सांपत्तिक स्थिती मात्र फार खालावली आहे . त्यांच्या भाग्याने पाऊस मुबलक असून आणि ते कष्टाळू व साध्या राहणीचे असले तरी हे सर्व लोक कर्जात इतके बुडून गेले आहेत की त्यातून आपला उद्धार होईल अशी आशाही त्यांना वाटेनाशी झाली . हीच परिस्थिती १ ९७४-७५ पर्यंत म्हणजे आदिवासी उपयोजना सुरू होईपर्यंत अशीच होती . त्याकाळी मिशनऱ्यांनी भिल्ल समाजात आरोग्य आणि शिक्षणाचे कार्य जोमाने चालविले होते .
सेवाभाव त्यांच्याजवळ होताच पण स्वधर्माचा प्रसार करण्याचे कार्यही त्यांनी समाजसेवेच्या पडद्याआडचिकाटीने चालू ठेवल्याचे आढळून येते . त्यासंदर्भात त्यांच्या नावाने बोटे मोडण्यात काय अर्थ आहे ? मद्यपान प्रतिबंधासाठी त्यांनी फारच चिकाटीने प्रयत्न केले ही बाब त्यांच्या दृष्टीने भुषणावहव ऐतद्देशियांच्या दृष्टीने लज्जास्पद आहे . उलटपक्षी एतद्देशीय लोकांनी मात्र या आपल्या देशबांधवाच्या कल्याणार्थ तन , मन , धनादि साधनाद्वारे मदत न करता त्यांच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा यथास्थित फायदा घेण्यासाठी , त्यांना पिळून काढावे व आपली तुंबडी भरावी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय . हे सर्व काही श्री ठकारांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते आणि तेवढ्याच डोळसपणे आपले अंत : र्चक्षु उघडे ठेवून निर्भिडपणे ते व्यक्तही करतात.
अशीच एक प्रत्यक्ष घटनाते कथनकरतात जी तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देण्यास पुरेशी बोलकी आहे . आपल्या प्रवासात त्यांनी भोरचकशाळेतील एक प्रसंग पाहिला त्या शाळेतील अर्थातच मिशन शाळेतील एक शिक्षक दारुच्या पंगतीपेक्षा वनभोजन किती हितावह असते ' हे आपल्या शाळेतील मुलांना व त्यांच्या पालकांना सप्रयोग दाखवून देत होते . गंमत म्हणजे हे भोरचक गाव नवापूर तालुक्यातील असून या गावात बहुसंख्य भिल्ल आणि मावची लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आहे . बहुसंख्येने ख्रिश्चन आदिवासींचे हे गाव आहे . एवढेच नव्हे तर या गावातील बरीच मुले मिशन शाळांमध्ये शिक्षण घेतात आणि पुढे अहमनगरच्या नगन कॉलेजला ते प्रवेशित होतात .
तत्कालीन भिल्लांची ही भयावह विपण्णावस्था पाहिल्यावर श्री ठकारांसारख्या सच्चा , निष्ठावान आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे मन तळमळत होते त्यामुळे ते म्हणतात मी ' भिल्ल समाजसेवा मंडळ'सारखे एखादे मंडळ स्थापण्याचे सुचविले , केवळ मंडळ स्थापण्याचे ते सुचवित नाही तर या मंडळामार्फत आदिवासींची सेवा कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचनाही ते प्रामाणिकपणे आंतरीक तळमळीतून करतात . त्या याप्रमाणे १ ) साक्षरतेचा प्रसार करणे . २ ) परका मनुष्य पाहिला की मुझे जमाखर्च ठेवण्यास शिकविणे . ४ ) वाईट चालीरिती बंद करणे . मात्र भिऊन पळतात तसे त्यांनी पळू नये म्हणून निर्भयतेची शिकवण द्यावी . २ ) प्रतिबंध ही पाचवी सूचना आणि सहावी सहकारी संस्था स्थापनमा खादीचा प्रसार करणे . आदिवासींना त्यांच्या विपन्नावस्थेतून बाहेर काढण्यासाठी भिल्ल समाजसेवा मंडळासारखे एक मंडळ स्थापून त्यातील कार्यकर्त्यांनी आदिवासींची सेवा कशी आणि कोणत्या पद्धतीने केली पाहिजे या मार्गदर्शक सूचना ठकार येथे करतात .
तत्कालीन काळी भिल्ल समाजात तरूण मुले मुली घरात मान्यता मिळणार नसली तर पळवून जाण्याची प्रथा होती या बाबतीत मुलाचा पुढाकार मानला जात असे अशा प्रकारे जो पळवून नेतो त्याच्याकडे व प्रामुख्याने मुलीकडची मंडळी व इतर प्रमुख गावकरीव जातवाले जात असत व पळवून नेणाऱ्याने त्या मुलीच्या पालकांनावपंचमंडळीला काही रक्कम देण्याचे ठरवत . अर्थात ही रक्कम दारुतच उडविली जात आहे असे हे सांगण्याची वेगळी गरज नाही . या रीवाजाला ' चोगडों ' असे म्हणतात .
या समाजात प्रौढविवाह व स्वयंवर पद्धतीने विवाह होत असतांनाही असा रिवाज पडावा ही आश्चर्याची बाब आहे . या रिवाजामुळेच भिल्ल समाजात नीत्य तंटा भांडणे होतात असा उल्लेख ठकारांनी केला आहे . अलिकडे कचितच अपवादाने अशा घटना घडताना दिसतात . यावरून तत्कालीन भिल्ल समाज किती विस्कळीत होता , त्यांच्यातील कुटुंब संस्थाही स्थिर झाली नव्हती असे दिसून येते . याशिवाय ठकार आणखी काही गोष्टींचा उल्लेख करतात . त्याकाळी भिल्ल समाजात सर्वसामान्य लोक रोज स्नान करीत नव्हते . शौचास जातांना पाणी नेत नव्हते . त्यांच्यातील विशेष जुन्या विचारांच्या लोकांना तर हा जणू काय त्यांच्या वडिलोपार्जित व परंपरागत जातीरिवाज वाटत होता .
त्यामुळे एखादा शिकलेला तरूणशौचास नियमाने पाणी नेऊलागलाम्हणजे हे लोक आपल्या भिल्ली भाषेत त्याला टोचून बोलतांना म्हणत ' तू काय बामण आहेस की काय ? ' पुढे तत्कालीन सामाजिक परिस्थितीतील भिल्ल समाजातील समजुतींचाही उल्लेख करतांना म्हणतात कधी कधी असेही ऐकण्यात येते की यांच्यापैकी अगदी मागासलेले लोकआपला कोणीजातबांधव मेला म्हणजे आपल्या वागदेवाची प्रार्थना करतात की देवा , याला पुन्हा भिल्लाच्याच पोटी जन्मालाघाला ' " वाणीबामणाच्या पोटी जन्मालाघालशील तर रोज अंग धुवून धुवून व घासून घासून याचा प्राण जाईल . " आपल्याला या गोष्टी आता खऱ्या वाटत नाहीत , हास्यास्पद वाटतात . काल्पनिक वाटेल इतका बदल आता आपल्या भिल्ल समाजबांधवामध्ये झाला आहे . पण हे सुमारे १००-१२५ वर्षापूर्वीचे सत्य आणि वास्तव आहे . अशा अनेक अडाणी आणि खुळ्या समजुती या समाजात असल्यातरी एकंदरीत हा समाज इमानी आहे या बद्दल कोणास शंका नव्हती .
या समाजात कितीतरी घरंदाज लोक आहेत . इतकेच नाही तर काही संस्थानिकही आहेत . कित्येक वर्षे किंवा जन्मात दारुला स्पर्श केला नाही अशीही निष्ठावंत माणसे या भिल्ल समाजात आढळतात . या समाजाने आपल्यातील दारुच्या व्यसनाचे उच्चाटन केले तर या समाजात असे काही विशिष्ट गुण आहेत की त्यामुळे हा समाज इतर समाजांना हार जाणार नाही . असा विश्वासही ठकारांना वाटतो .
पण दारुमुळे हा समाज इतका हताश व निस्तेज झाला आहे की , या समाजाची सेवा करु इच्छिणाऱ्यांना आपली शक्ती व बुद्धी प्रथम व प्रामुख्याने दारुबंदीच्या कार्यात खर्च करावी लागेल ; कारण या समाजातील , कर्जबाजारीपणा , अज्ञानता , भेकडपणा , आळस , शिक्षणाविषयी असलेली अनास्था , महत्वाकांक्षेचा अभाव , आत्मविश्वास शून्यता , अल्पसंतुष्टता इ . अनेक दोषांच्या मुळाशी दारुचे व्यसन आहे ही गोष्टयासमाजाचे बारकाईने निरीक्षण केल्यास सहज समजण्यासारखी आहे . या सगळ्या तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीवर आणि भिल्ल समाजाच्या हतबलतेच्या पार्श्वभूमीवर गुला महाराजांचा उदय प्रत्यक्ष त्याच समाजातून व्हावा ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली .
मात्र आमचे समाजबांधव त्यांच्या अज्ञानामुळे कपाळकरंटे ठरले , आपल्याच समाजातील आग समाजसुधारकाची नोंद करणे त्यांना महत्त्वाचे वाटले नाही आणि हे महत्त्वाचे कार्य मा . कै . शंकरराव ठकारांनी करुन ठेवले त्यांना ते करावेसे वाटले यातच गुला महाराजांच्या कार्याची महत्ता सिद्ध होते . या छोटेखानी चरित्ररुपात का होईना प्रमाण भाषेतून लिखीत स्वरुपातील हे चरित्र महत्प्रयासाने उपलब्ध आहे . आणि त्यातील तत्कालीन परिस्थितीचे सूक्ष्म आणि वास्तव वर्णन जे शब्दांकीत झाले आहे ते वाचून आपल्याच समाजाकडे मागे वळून पाहता येते .
पुरावा म्हणून आत्ताच्या पिढीसमोर ठेवण्याचे श्रेय ठकरांनाच द्यावे लागेल हे मान्य करीत असतांनाच अशा प्रतिकुल सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आप श्री गुलाम महाराजांनी आपले समाजसुधारणेचे काम येथे केलेले आहे हा मोठा चमत्कार आहे .
0 Comments
Thank you for your response. It will help us to improve in the future.