गणेशोत्सव

 

गणेशोत्सव

 

गणेशोत्सव

Photo by Sanjib Samanta from Pexels

'गणपती बाप्पा मोरया - पुढल्या वर्षी लवकर या' असे आपण नेहमीच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत म्हणतो, कारण हा गणेशोत्सव सर्वांनाच हवाहवासा वाटतो. यावेळी घरातघराबाहेर सर्वत्र आनंदोत्सव असतो.

 

हा उत्सव भाद्रपद शुध्द चतुर्थीला सुरू होतो, तर तो दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. पहिल्या दिवशी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते उत्सवास सुरुवात होते. घरांमध्ये काही जणांकडे हा उत्सव , , , दिवसांचाही असतो, तर काहींकडे पूर्ण दहा दिवस.

 

गणरायाच्या पूजेला शमी, दुर्वा, बेल, केवडा अशी एकवीस -हेची पत्री, लाल फुले मोदकांचा नैवेद्य हे महत्त्वाचे असते. श्री गणेशमूर्ती बसविण्याच्या परिसरात रंगीबेरंगी पताका, कागदी फुले, विद्युत दिवे अशा साधनांनी सजावटही करतात. सार्वजनिक गणपतीसमोर तर मोठमोठाले भव्य प्रेक्षणीय देखावेही उभे करतात.

 

सजावटही मोठी आकर्षक असते. समाजाचे प्रबोधन व्हावे, या हेतूने मनोरंजन शिक्षण एकत्रपणे साधता येईल अशी नाटके, व्याख्याने किंवा संगीताचे कार्यक्रमही केले जातात, तर काही ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करतात.

 

सर्वांनी मिळून हा उत्सव करणे यात एकात्मता निर्माण व्हावी, हा हेतू आहे आणि ही कल्पना शंभर वर्षांपूर्वी प्रथमत: लोकमान्य टिळकांनी मांडली. त्यावेळी त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी साधन म्हणून या उत्सवाचा उपयोग केला होता. आजही देशप्रेमासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हा उत्सव उपयोगी पडू शकतो.

 

गणेशोत्सवाचा समारोप विसर्जन मिरवणुकीने होतो. यातही अनेक तव्हेचे देखावे ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक घटनांची आठवण करून देतात; तर लेझीम, झांज, लाठी - बोथाटीचे दर्शन हे मनाला मोहवून टाकणारे असते. सकल कलांचा उद्गाता सुखकर्ता - दुखहर्ता. सर्व देवांना वंदनीय असा हा श्री गणेश. आपल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यास आपल्याला बळ देवो, हीच प्रार्थना.

 

Post a Comment

0 Comments