गुरू गोविंदसिंह


गुरू गोविंदसिंह

गुरू गोविंदसिंह

Photo from Google Images


शीख पंथाचे दहावे गुरू होते गुरू गोविंदसिंह. हे अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. त्यांच्या वडिलांचे नाव होते गुरू तेगबहादूर आणि आईचे नाव होते गुजरी. मोगल बादशाह औरंगजेब याच्या अत्याचाराने जनता त्रासली होती. अशा वेळी शीख पंथाने हिंदू धर्म टिकविण्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न केले. गुरू तेगबहादूर यांनी धर्मासाठी बलिदान केल्यावर गुरूंच्या गादीवर गोविंदसिंह बसले. त्यावेळी त्यांचे वय अवघे नऊ वर्षांचे होते.

 

पण अल्पावधीतच त्यांनी शास्त्र आणि शस्त्र दोन्हींचे शिक्षण घेतले. आपल्या शीख बांधवांना संदेश पाठवून शस्त्र संपत्ती गोळा केली. सैन्याची एक तुकडी उभी केली. कारण पहाडी राजे, तसेच मोगल सैन्याशी लढा द्यावा लागणार हे त्यांना माहीत होते.

 

गुरू गोविंदसिंह स्वत: अनेकदा लढाईत उतरले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्यागाची प्रेरणा आपल्या कृतीतून दिली. धर्मासाठी कोण प्राण देईल, असा प्रश्न एकदा त्यांनी आपल्या अनुयायांना विचारला. जे पाच जण बलिदानासाठी पुढे आले त्यांना गुरू गोविंदसिंहांनी पंचप्यारे म्हणून गौरविले. ___ औरंगजेबाशी अधूनमधून लढाया चालूच होत्या. आपला धर्म टिकवताना खूप अडचणी होत्या, पण गुरू डगमगले नाहीत.

 

गुरुजीनी अनेक संकटांना तोंड दिले. एका युध्दात मोगलांच्या वेढ्यात सर्वजण सापडले. तेथून बाहेर पडताना गुरूंच्या कुटुंबातील लोक इतस्तत: विखुरले गेले. त्यांची दोन मुले सुभेदार वजीरखान याच्या हाती लागली. जोरावरसिंह आणि फत्तेसिंह यांना इस्लामचा स्वीकार करण्याचा आग्रह करण्यात आला पण त्यांनी तो मानला नाही. शेवटी त्या दोघांना भितीत जिवंत चिणून मारले.


धर्मासाठी वडिलांचे बलिदान गोविदसिंहांनी पाहिले तसेच स्वत:च्या मुलांचेही बलिदान पाहिले. तरीही त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. धर्मनिष्ठा सोडली नाही. शेवटी फिरत - फिरत ते महाराष्ट्रात नांदेड या ठिकाणी आले. तेथे एका पठाणाने त्यांच्यावर हल्ला केला आणि जखमी झालेले गुरू गोविंदसिंह यांनी त्यानंतर तीन-चार दिवसांतच या जगाचा निरोप घेतला. स्वधर्म, स्वदेश यासाठी बलिदान करण्याची प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन.

 

Post a Comment

0 Comments