गुरु कोण असतो ?

गुरु कोण असतो? 

गुरु कोण असतो ?

Photo by Bishesh Pandey from Pexels

   

    कुठल्याही विषयांत ज्याच्यापासून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश मिळतो , आपला अज्ञानान्धकार दूर होतो त्या विषयांत तो आमचा गुरु असतो . जसे आपण कुणाला मार्ग विचारला आणि त्याने आपल्याला मार्ग दाखविला की तो मार्गदर्शक आपला गुरु झाला . आपण वाटले तर त्याला गुरु माना अगर न माना . त्याच्याशी सम्बन्ध जोडण्याची आवश्यकता नाही . विवाहाच्या वेळी ब्राह्मण कन्येचा सम्बन्ध वराशी जोडून देतो , तर त्यांचा आयुष्यभर पति - पत्नी सम्बन्ध जुळून येतो . तीच स्त्री पतिव्रता होते . 

    नंतर तिला त्या ब्राह्मणाची कधी आठवणही होत नाही ; आणि शास्त्रांत त्याची आठवण ठेवावी असे विधानही सांगितलेले नाही . या प्रमाणेच गुरुने आपला सम्बन्ध भगवंताशी जोडून दिला की गुरुचे काम झाले . तात्पर्य हे आहे की गुरुचे काम मनुष्यास भगवत् सन्मुख करण्याचे आहे . मनुष्याला आपल्या सन्मुख करणे , आपल्याशी त्याचा सम्बन्ध जोडणे हे गुरुचे काम नाही . या प्रमाणे आमचे काम ही भगवंताशी सम्बन्ध जोडणे हे आहे , गुरुशी नव्हे . जसे संसारांत ( जगात ) कुणी आई आहे , कुणी बाप आहे , कुणी भाचा आहे , कुणी भावजय आहे , कुणी स्त्री ( पत्नी ) आहे , कुणी पुत्र आहे तसेच जर आणरवी एका गुरुशी सम्बन्ध जुळला तर त्यामुळे काय लाभ होणार ? प्रथमच अनेक बन्धने होतीच , आता आणखी एक बन्धन झाले ! भगवंताशी तर आपला सम्बन्ध निरंतर आणि स्वतः स्वाभाविक आहेच , कारण आपण भगवंताचे , सनातन अंश आहोत – 

' ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः '  ( गीता १५ । ७ ) , 

' ईस्वर अंस जीव अबिनासी ' ( मानस , उत्तर ० ११७। १ ) 

गुरु त्या विसरलेल्या सम्बन्धाची फक्त आठवण करून देतो , कुठला नवीन सम्बन्ध जोडत नाही . 

    मी बहुतांश हा प्रश्न करीत असतो की , प्रथम बेटा ( मुलगा ) होतो की बाप ? याचे उत्तर बरेच वेळा हेच मिळते की प्रथम बाप असतो . परन्तु वास्तविक पाहिले असता प्रथम मुलगा होतो आणि नंतर बाप होतो - कारण की मुलगा जन्मल्याशिवाय त्याला बाप म्हणतांच येणार नाही . प्रथम तो मनुष्य ( पति ) आहे आणि ज्यावेळी जन्मतो तेव्हां त्याचे नाव बाप होते . या प्रमाणेच जेव्हा शिष्यास तत्त्वज्ञान प्राप्त होते तेव्हा त्याच्या मार्गदर्शकाचे नाव ' गुरु ' होते . शिष्यास ज्ञान होण्यापूर्वी तो गुरु होतच नाही . म्हणूनच म्हटले आहे 

गुकारश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते । 

अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ॥ ( गुरुगीता )

    ' अर्थात् ' ' गु ' हे अन्ध : काराचे नाव आहे आणि ' रु ' प्रकाशाचे नाव आहे म्हणून जो अज्ञानरूपी अन्ध : कार नष्ट करतो त्याचे नाव ' गुरु ' आहे . 

    गुरुविषयीं एक दोहा खूप प्रसिद्ध आहे . 

गुरु गोविन्द दोउ खड़े , किनके लागूं पाय । 

बलिहारी गुरुदेव की , गोविन्द दियो बताय ॥ 

    गोविंदाला दाखवून दिले , समोर आणून उभे केले , तेव्हां गुरुची बलिहारी झाली . गोविंदाला तर दाखवून दिले नाही आणि गुरु बनले ही तर शुद्ध फसवणूक आहे ! केवळ गुरु बनण्याने गुरुपणा सिद्ध होत नाही . म्हणून एकटया उभ्या असलेल्या गुरुचा महिमा नाही . ज्याच्या बरोबर गोविन्द खडा असेल ' गुरु गोविन्द दोउ खड़े ' अर्थात् ज्याने भगवंताची प्राप्ति करून दिली असेल त्याचीच थोरवी आहे . 

    ज्याच्या मनांत शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते तोच ( असली ) खरा गुरु होय . आणि ज्याच्या ठिकाणी गुरुभक्ति असेल तोच खरा शिष्य होय . को वा गुरुयों ही हितोपदेष्टा । शिष्यस्तु को यो गुरुभक्त एव । ( प्रश्नोत्तरी ७ ) जर गुरु पोहोंचलेला ( आत्मसाक्षात्कारी ) असेल आणि शिष्य अंत : करणपूर्वक आज्ञापालन करणारा असेत तर शिष्याचा उद्धार होईल यात शंकाच नाही . 

पारस केरा गुण किसा , पलटा नहीं लोहा । 

कै तो निज पारस नहीं , के बीच रहा बिछोहा ॥ 

    जर परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने बनले नाही तर तो परीस असली नाहीं अथवा लोखंड असली लोखंड नाहीं अथवा मध्ये काही बाधा आहे . या प्रकारेंच जर शिष्यास तत्त्वज्ञान - प्राप्ति झाली नाही तर गुरु तत्त्वज्ञानी नाहीं अथवा शिष्य आज्ञाधारक नाही अथवा मध्ये काही बाधा ( कपटभाव ) आहे . 


वास्तविक गुरु 

    ज्याच्या ठिकाणी केवळ शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते तोच वास्तविक गुरु असतो . ज्याच्या हृदयात आमच्या कल्याणाची चिन्ताच नसेल तो आमचा गुरु कसा होईल ? जो अंत : करणपूर्वक आमच्या कल्याणाची इच्छा करतो तोच वास्तविक आमचा गुरु आहे . मग आपण त्याला गुरु मानला अगर न मानला आणि तो गुरु बनला अगर न बनला तरी फरक पडत नाही . त्याच्या ठिकाणी ही इच्छाच नसते की मी गुरु बनावे , दुसऱ्यांनी मला गुरु मानावे , माझे शिष्य बनावे . ज्याच्या मनांत धनाची इच्छा असते तो धनदास असतो ; तसेच ज्याच्या मनांत शिष्याची इच्छा असते तो चेलादास ( शिष्यदास ) असतो . ज्याच्या मनांत गुरु बनण्याची इच्छा असते तो दुसऱ्याचे कल्याण करू शकत नाही . 

    जो शिष्यापासून धनाची - द्रव्याची इच्छा करतो तो गुरु नसतो उलट पोता - चेला ठरतो . म्हणचे शिष्याचा शिष्य ठरतो . कारण शिष्याजवळ द्रव्य असेल तर त्याचा शिष्य झाले द्रव्य ( रुपये ) आणि द्रव्याचा चेला गुरु झाला तर तो गुरु वास्तविक पोता - चेला- ( नातू - शिष्य ) म्हणजे शिष्याचा शिष्यच झाला ! विचार करा की जो तुमच्यापासून कशाचीही इच्छा करतो तो कधी तुमचा गुरु होऊ शकेल का ? नाही होऊ शकणार ! जो आपल्यापासून काही धन द्रव्य , मान सन्मान , आदर वगैरेची इच्छा करीत असेल तो आपला चेला शिष्य असतो गुरु होऊ शकत नाही . खरे महात्मा असतात त्यांना जगाची गरज नसते उलट जगाला ( दुनियेला ) च त्यांची गरज असते . ज्यास कुणाचीही गरज नसते तोच वास्तविक गुरु होय . 

कबीर जोगी जगत गुरु , तजै जगत की आस । 

जो जग की आसा करै तो जगत गुरु वह दास । 

    जे खरे सन्त - महात्मा असतात त्यांना गुरु बनण्याची हौस नसते , उलट जगाचा उद्धार करण्याची हौस असते . त्यांच्या ठिकाणी जगदोद्धार करण्याची स्वाभाविक खरी खरी ओढ असते . मी ही चांगल्या खऱ्या सन्त - महात्मा लोकांचा शोध घेत असे आणि मला चांगले सन्त महात्मा भेटलेही . परन्तु त्यांनी असे कधीही म्हटले नाहीं की तूं शिष्य बन म्हणजे तुझे कल्याण होईल . ज्यांना गुरु बनण्याची हौस असते तेच असा प्रचार करतात की गुरु करणे अत्यंत आवश्यक आहे , गुरुशिवाय मुक्ति मिळत नाहीं - इत्यादि . 

    कोणी विद्यमान व्यक्तिच गुरु केली पाहिजे असे काही विधान नाही . श्रीशुकदेवजी महाराज हजारो वर्षा पूर्वी झाले होते पण त्यांनी चरणदासजी महाराजांना दीक्षा दिली . खऱ्या शिष्याला गुरु आपणहून दीक्षा देतात कारण शिष्य चांगला असेल तर त्याला गुरुचा शोध घ्यावा लागत नाही ; तशी जरूरच पडत नाही , तर उलट गुरु आपोआप भेटतात . खरी तळमळ असणाराला खरा महात्मा भेटतो . 

जेहि के जेहि पर सत्य सनेहू । सो तेहि मिलइ न कछु संदेहू ॥ ( मानस , बाल ० २५ ९ । ३ ) 

    लोक तर गुरुला धुंडत असतात पण जे असली गुरु असतात ते शिष्याला शोधत असतात . त्यांच्या ठिकाणी विशेष दया असते . जसे जगात आईचा दर्जा सर्वात श्रेष्ठ आहे . आई ही सर्वांत पहिला गुरु आहे . मूल आईपासून जन्मास येते , आईचे दूध पिते , आईच्याच मांडीवर खेळते , आईच त्याचे पालन - पोषण करते , आई शिवाय मूल जन्मास येऊच शकत नाहीं , राहू शकत नाही , वाढूही शकत नाही . आई तर मूलाशिवाय काही वर्षे राहिली आहे . मूल नव्हते म्हणून तिला काही अडचण वाटली नाही पण इतके असूनही आईचा स्वभावच असा आहे की ती स्वतः उपाशी राहील पण मुलाला उपाशी राहू देणार नाही . ती स्वतः कष्ट सोसून मुलाचे पालन - पोषण करते . तसेच खरे गुरु असतात . ते ज्याचा शिष्यरूपाने उद्धार करण्याचे सामर्थ्य असते . मी अशा घटना पाहिल्या आहेत . 

    एक सन्त होते . ते दुसऱ्याला शिष्य न मानतां मित्रच मानत असत . त्यांच्या एक मित्राला काही भयंकर रोग जडला , त्यामुळे स्वीकार करतात , त्याचा उद्धार करतात . त्यांच्या ठिकाणी शिष्याचा तो धाबरून गेला . औषधाने त्याला बरे वाटले नाही . त्या संतानी त्याला सांगितले की तुझा आजार तूं मला दे . तो म्हणाला की माझा आजार मी तुम्हाला कसा देऊ ? सन्तांनी परत सांगितले की आता मी सांगितले की तू नको म्हणू नकोस ; आड येऊ नको . तुझे अर्धे दुखणे मला दे . त्यांच्या मित्राने संमति दिली तेव्हा त्या सन्तांनी त्याचे निम्मे दुखणे आपल्यावर घेतले . त्यानंतर औषध न घेतांच त्याचा आजार नाहीसा झाला . या प्रकारें जे समर्थ असतात ते गुरु बनूं शकतात . परन्तु इतके समर्थ असूनही त्यांनी कुणालाही आपला शिष्य बनविले नाही . 

    गुरु केल्यानंतर त्यांची थोरवी अशी सांगितली जाते की गुरु गोविंदाहून ( भगवंताहून ) श्रेष्ठ आहेत . त्याचा परिणाम असा होतो की शिष्य भगवंताचे भजन न करतां गुरुचेच भजनांत दंग होतात ! ही फार अनर्थकारक आणि नरकांत घेऊन जाणारी गोष्ट आहे . एका चांगल्या संताची हकिगत आहे . त्यांच्या शिष्यांनी त्यांना भगवंताहून अधिक श्रेष्ठ मानण्यास सुरुवात केली तर त्यांनी शिष्य बनविणेच सोडून दिले आणि नंतर सबन्ध आयुष्यात ( हयातीत ) शिष्य बनविलाच नाही . 

    कारण की शिष्य भगवंतास धरण्या ऐवजी गुरुलाच पकडतात . गुरुचा उपदेश ऐकून मनुष्य भगवंताकडे आकर्षित झाला मर मग ठीक आहे पण तो गुरुच्याच मागे लागेल तर ते फारच हानिकारक आहे . शिष्याला आपल्यामागे लावणारे कालनेमि अथवा कपटमुनि असतात , गुरु नसतात . जे शिष्याला भगवंताच्या मागे लावतील ते खरे गुरु . भगवंता सारखा आमचा हितचिंतक , गुरु , पिता , माता , बन्धु , धनी इत्यादिपैकी कुणीही नाही . 

उमा राम सम हित जग माहीं । 

गुरु पितु मातु बंधु प्रभु नाहीं ॥ ( मानस किष्किन्धा ० १२॥ १ )

    भगवंताच्या ऐवजी आपली पूजा करावयास लावणे हे काम . पाखण्डी लोकांचे आहे ज्याच्या अंतरात शिष्य बनविण्याची , रुपयांची इच्छा आहे , घर ( आश्रय ) आदि बनविण्याची इच्छा आहे ; मान - बडाईची , आपल्या प्रसिद्धिची इच्छा आहे त्याच्या द्वारा दुसऱ्यांचे कल्याण तर राहोच त्याचे स्वत : चे कल्याणही साधले जात नाहीं . 

    शिष शाखा सुत वितको तरसे , परम तत्त्वको कैसे परसे ? 

    त्याच्या द्वारा लोकांची अशी दुर्दशा होते जशी कपटमुनि द्वारा राजा प्रतापभानुची झाली . ( पहा मानस , बालकाण्ड १५३ से १७५ ) ज्याच्या संगतित येणारांचे कल्याण होत असते . ज्याच्या मनांत दुसऱ्यांच्या कल्याणाशिवाय अन्य इच्छाच नसते , जे स्वतः इच्छा रहित असतात तेच दुसऱ्यास इच्छारहित करूं शकतात . इच्छा असणारांच्याकडून कल्याण न होतां फसवणूक होत असते . 

    हा सिद्धान्त आहे की जो दुसऱ्यांना कमजोर बनवितो तो स्वतः कमजोर बनतो . जो दुसऱ्यांना समर्थ बनवितो तो स्वतः समर्थ बनतो . जो दुसऱ्यांना चेला ( शिष्य ) बनवितो तो समर्थ असत नाही . जो ( खरा ) गुरु असतो तो दुसऱ्यांनाहीं गुरु बनवितो . भगवान् सर्वांत् मोठे आहेत म्हणून ते कधी कुणालाही छोटे बनवत नाहीत . जो भगवन्ताच्या चरणीं शरण जातो तो जगांत मोठा होतो . 

    भगवान् सर्वांना आपले मित्र बनवतात , आपल्या समान बनवितात , कुणाला आपला चेला बनवीत नाहीत . जसे निषादराज सिद्ध भक्त होता , विभीषण साधक होता आणि सुग्रीव भोगी होता पण भगवान् रामांनी तिघांनाही आपले मित्र बनविले . अर्जुन तर स्वत : ला भगवंताचा शिष्य मानतो , ' शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ' ( गीता २।७ ) पण भगवान् स्वत : ला गुरु न मानता मित्रच मानतात . ' भक्तोऽसि मे सखा चेति ' ( गीता ४। ३ ) ' इष्टोऽसि ' ( गीता १८। ६४ ) वेदांतही भगवंताला जीवाचा सखा म्हटले आहे 

द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते ।

( मुण्डक ० ३। १। १ ; श्वेताश्वतर ० ४। ६ ) ' 


    सदा साथ राहणारे तथा परस्पर सख्यभाव ठेवणारे दोन पक्षी - जीवात्मा आणि परमात्मा - एकाच वृक्षाचा - शरीराचा - आश्रय घेऊन राहतात . ' जो स्वतः मोठा असतो तो दुसऱ्यांनाही मोठे बनवतो . जो दूसऱ्यांना लहान छोटे बनवतो तो स्वतः छोटा होतो . 

    जो वास्तविक मोठा असतो त्याला लहान बनण्यांत लज्जाही वाटत नाही . क्षत्रियांच्या समुदायांत अठरा अक्षौहिणी सेनेमध्ये भगवान् सारथी बनले ( घोडे हांकणारे बनले ) अर्जुनाने सांगितले की दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा करा तर भगवान् शिष्याप्रमाणे अर्जुनाच्या आज्ञेचे पालन करतात . पाण्डवांनी यज्ञ केला तेव्हां तसे तर त्यांत सर्व प्रथम भगवान् श्रीकृष्णाचे पूजन केले गेले : परन्तु त्याच यज्ञात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे कामही भगवंतांनी केले . हलके काम करण्यांत भगवंतास लाज वाटली नाही . जो स्वत : छोटा असतो त्यालाच लज्जाही वाटते आणि भयही वाटते की कुणी मला छोटा तर समजणार नाही , कुणी माझा अपमान तर करणार नाही ! ' 

Post a Comment

0 Comments