नेतृत्व कसे करावे?

 

नेतृत्व कसे करावे?

 

नेतृत्व कसे करावे?

Photo by Pixabay from Pexels

 

नेतृत्व काय आहे?

 

नेतृत्व करणे म्हणजे दुसऱ्यांवर प्रभाव पाडून, त्यांना प्रोत्साहित करून आपल्याला किंवा आपल्या समुदायाला उद्दिष्ट मिळवून देणे. स्वप्नांना सत्यात रूपांतर करण्याचे सामर्थ्य नेतृत्वात असते. नेतृत्व करणारा हा कार्याची दशा दिशा ठरवतो. त्याचा त्याच्या संस्थेवर संपूर्ण ताबा असतो. तो आपल्या लोकांची काळजी घेतो. चुका झाल्यास स्वतः पुढाकार घेऊन चूक स्वीकारतो, यश मिळाल्यास, या यशाचे सर्व भागीदार आहेत. हे सांगतो तो आपल्या लोकांच्या गुणांची चांगल्याप्रकारे पारख करतो त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे कामे वाटतो. त्यांच्या कामावर बारीक नजर ठेवतो. त्याच्याकडे सर्व अधिकार असतात तो आपल्या वागणुकीने कर्माने नेहमी दुसऱ्यासमोर उदाहरण प्रस्तुत करत असतो. सतत प्रोत्साहन देऊन लोकांसाठी 'ऊर्जेचे अखंड स्रोत' अशी परिभाषा कायम ठेवतो. नेतृत्व करणारा नवनवीन संकल्पनांना नेहमी वाव देतो. त्याच्यात उत्कृष्ट श्रवणशक्ती, लवचिकता आढळते.

 

नेतृत्व करणाऱ्याची प्रमुख कर्तव्यं

 

अधिक्षता

धोरणांची अंमलबजावणी कशी होते कशी होईल याची खबरदारी घेणे. धोरण - आपल्या संस्थेसाठी, लोकांसाठी उद्दिष्टे ठरवणे.

 

कार्यप्रणाली

धोरणांची अंमलबाजवणी कोणत्या रीतीने कशी किती वेळेत करावी याचा आराखडा तयार करणे.

 

संवाद

सर्व लोकांना लागेल ती माहिती वेळोवेळी पुरवणे. त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे.

 

नियंत्रण

नेतृत्व करणारा हा संस्थेसाठी एका पित्यासमान असतो. तो आपल्या लोकांशी भावनिकपणे जुळलेला असतो. त्याचे त्याच्या संस्थेवर लोकांवर संपूर्ण नियंत्रण असते. नेतृत्व प्रमुखतः दोन प्रकारे करता येते -

 

अधिकृत

आपल्याला सर्व काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे आपण लोकांना काय करायचे काय नाही हे सांगणार. लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार नसतो.

 

स्वतंत्र

येथे नेतृत्व करणारा हा फक्त उद्दिष्टे, ध्येय ठरवतो. काम करण्याची पद्धत इतर बाबी तो लोकांवर सोपवतो.

 

नेतृत्व कसे करावे?

 

1.    निर्णय घेऊन तो लोकांपर्यंत पोचवावा.

2.    आपण घेतलेला निर्णय लोकांकडून मान्य करून घ्यावा.

3.    संकल्पनांना येणाऱ्या प्रश्नांना उचित सन्मान द्यावा.

4.    सूचना सल्ला द्यावा. काम करण्याची कार्यशैली, सीमा, मर्यादा ठरवाव्यात.

5.    स्वतः मूल्यांचे जतन करून दुसऱ्यासमोर उदाहरण द्यावे.

6.    लोकांना उद्दिष्ट गाठण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यावे.

7.    विपरीत परिस्थिती सर्व लोकांना एकत्रित करून परिस्थितीचा सामना करावा.

 

नेतृत्व करताना

 

हार मानू नका :

कुणी आपल्याला जर सातत्याने 'नाही' म्हणत असेल, नकार देत असेल तर तो नकार स्वीकारू नका.

सातत्याने कधी ना कधी होकार मिळेल या दृष्टीने प्रयत्न करा. भविष्यात याची चांगली फळे तुम्हाला मिळतील.

नकार देणाऱ्या व्यक्तींशी सातत्याने संपर्कात राहा. त्यांच्या गरजा

समजून घेत वाटाघाटी करा; परंतु नकार ऐकू नका.

 

अपेक्षा करा :

लोकांशी व्यवहार करताना त्यांच्याकडून चांगल्या दृष्टिकोनाची अपेक्षा करा. ते चांगले काय करतील याची अपेक्षा करा. याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. इतरांकडून वाईट अपेक्षा केल्यास निराशाजनक परिणाम हाती येण्याची शक्यता असते.

 

नव्या विचारांचे स्वागत करा :

बरेच लोक परिवर्तनास तयार नसतात. जुन्या रूढी, कल्पनांना चिकटून राहतात. नवीन विचार त्यांना आवडत नाही किंवा बदलण्याची त्यांची इच्छाच नसते. आपण जर अशाच कल्पनेने राहिलो असतो तर आज इतकी तांत्रिक प्रगती झालीच नसती. जरूर नाही की येणारी प्रत्येक नवीन कल्पना अंमलात आली पाहिजे; परंतु त्यावर विचार जरूर केला जाऊ शकतो. कल्पना करणाऱ्यास शाबासकी देता येऊ शकते. ती स्वीकारत नसेल तर त्यास अजून विचार करण्यास सांगू शकतो. शंभरातील एखादी कल्पना, विचार खरंच कधी तरी फायद्याचा ठरू शकतो.

 

पुढाकार घ्या :

पुढाकार घेणे आजकाल फार सोपे झाल्याचे दिसते. पुढाकार घेणे याचा अर्थ आपण कधीतरी नवीन सांगितले आहे त्यावर इतरांनी कसे काम करावे हे दर्शवणे नव्हे, तर पुढाकार घेणे म्हणजे स्वतः नवनवीन गोष्टीत रस घेऊन कामात एक स्फूर्ती निर्माण करणे आपल्या समोरील लोकांस स्वतःचे उदाहरण देणे, जेणेकरून त्यांनाही काम करण्यास उत्साह येईल. एखाद्या नवीन कामास सर्वप्रथम स्वतः सुरू करणे त्यास पूर्णत्वास नेणे.

 

व्यक्तींचा आदर :

इतरांना मशीनप्रमाणे वागणूक देऊ नका. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे हाताळा त्यांना आदर द्या. इतरांशी बोलताना सल्ल्याच्या भाषेत बोलणे सोडून मदतीची भाषा वापरावी.

 

आहे तसेच राहा :

एका व्यक्तीला पदोन्नती मिळाली. त्याची त्याच्या सहकाऱ्यांसोबत वागणूक एकदम बदलली. आता तो त्यांच्याशी अधिकारात्मक भाषेत बोलू लागला. त्यांच्यासोबत घरी परतणे त्याने सोडले. तो स्वतःला इतरांपेक्षा अधिक हुशार सामर्थ्यशाली समजू लागला. लक्षात ठेवा - पदामुळे माणसाचा मोठेपणा वाढत नाही, तर माणसामुळेच पदाचा मोठेपणा वाढतो. तेव्हा आपण आहे तसेच राहावे. आपण कुणीही एकमेकांच्या वर किंवा खाली आहोत असे समजता आपण सर्व सोबत काम करीत आहोत प्रत्येकाच्या त्या-त्या जबाबदाऱ्या आहेत, असे वागावे.

 

 

आपल्या माणसांचे तुम्ही स्वयंपाठीराखे व्हा :

इतरांकरवी कामे करून घेण्याची सर्वात यशस्वी कला म्हणजे इतरांना ती कामे त्यांच्या परीने, कलेने करू देणे तुम्ही त्यास 'माझा तुझ्या निर्णयाला पाठिंबा आहे, तू बरोबर करतोस' असे म्हणणे, अशा रीतीने त्यांचे त्यांना जास्तीत जास्त शिकण्यास मिळून कामातील होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होईल.

 

गंभीर मुद्रा सोडा :

आपण प्रत्येक काम किती गंभीरपणे करावयास हवे हे नेहमी इतरांना सांगत असतो. सतत 'गंभीर राहा' असे त्यांना बोलत असतो. प्रत्येक गोष्टीला त्याच्या महत्तेनुसार गांभीर्य असतेच लोकही ते गांभीर्य चांगल्या प्रकारे जाणतात. तेव्हा आपले बोलणे त्यांना कदाचित टोचून बोलल्यासारखेही वाटेल. अशा वेळी वातावरण सैल सोडण्याचा प्रयत्न करा. विनोदनिर्मिती करून वातावरण हलके फुलके होण्यासाठी काही जागा सोडा. याने तणाव निवळण्यास नव्या जोमाने काम करण्यास इतरांना स्फूर्ती मिळेल. खरा नेता खरा नेता तो असतो, जो सदैव सर्वांच्या पुढे असतो. जर त्याला त्याची माणसे प्रामाणिक, नियम पाळणारी हवी असतील तर त्याला स्वतःला प्रथम तसे वागावे लागेल. कोणत्याही परिस्थितीस त्याने प्रथम सामोरे जाण्यास हवे.

 

 

जर काम कठीण, अवघड आहे तर त्याने ते स्वतः

करावयास हवे. स्वतःचे उदाहरण इतरांसमोर प्रस्थापित करून इतरांचा विश्वास संपादन करणाराच खरा नेता असतो. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतरजणसुद्धा कामाला लागतात चांगले परिणाम देतात. चुकांना क्षमा करा नेतृत्व करणारा हे चांगल्या प्रकारे जाणतो की चुका होतात. माणसे चुका करीत असतात. त्यांना त्याबद्दल शिक्षा केल्यास त्यांच्या मनात आकस निर्माण होतो पुढील कामावर त्याचा परिणाम होतो. याउलट क्षमा केल्यास ती व्यक्ती नमते चुकांचे प्रमाण कमी होऊन चांगले परिणाम येण्यास सुरुवात होते.

 

नेतृत्वाचे महत्त्व आपण वस्तू खरेदी करू शकता, माणसे नाही. माणसांना पैसे देऊन मशिनीसारखे काम करून घेऊ शकता; परंतु प्रामाणिकता, एकनिष्ठता त्यांची गुणवत्ता खरेदी करू शकणार नाही. ती कमवावी लागते. माणसातील चांगल्या गुणांना वाव देऊन त्यांना सकारात्मक निर्माणाकडे नेणे येथेच नेतृत्वाचा कस लागतो.

 

 

नेतृत्व करणारा काय करतो?

 

नेतृत्व करणारा लोकांना उद्दिष्टपूर्तीकडे नेतो. जर तो फक्त उद्दिष्टाबाबत चिंतीत असेल लोकांना विसरेल तर त्याची वृत्ती ही तानाशाही होऊन जाईल. अशा वेळी लोकांचा रोष त्याने स्वतःवर ओढवण्याची शक्यता आहे. तसेच जर तो फक्त लोकांबाबत चिंतातुर असेल तर वातावरण एखाद्या क्लबसारखे होईल उद्दिष्टपूर्ती होणार नाही. तेव्हा नेतृत्व करणारा उद्दिष्ट लोक या दोघांबाबत जागरूक, चिंतातुर झटणारा असतो.

 

नेत्याचा प्रभाव ताकद

 

) पुरस्कृत करण्याची ताकद : एक नेता आपल्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल नेहमी त्यांना शाबासकी देऊन पुरस्कृत करीत असतो. कुणाला कसे पुरस्कृत करायचे हे त्यास चांगल्या प्रकारे माहीत असण्यास हवे.

 

) दबावतंत्र : एक नेता आपल्या लोकांकरवी दबावतंत्राचा अवलंब करून कामे करवून घेतो. कुणावर किती कशा प्रकारे दबाव टाकावा दबाव टाकल्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दखलही घेतो.

 

) विधायक ताकद : नेतृत्व करण्यास अधिकारत्व प्राप्त असते. आपल्या अधिकार शक्तीचा वापर करून तो घेतलेल्या निर्णयांवर इतर लोकांना कामास लावतो.

 

) प्रभावी व्यक्तिमत्त्व : त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी असे असते. इतर लोक त्यांच्याकडून सतत प्रेरणा घेत राहतात. निर्भीड, नम्र, नीतिमत्ता स्वशिस्त असे गुण त्यांच्यात असतात.

 

) अभ्यासू तज्ज्ञ : एक नेता एखाद्या विशिष्ट विषयात प्रवीण तज्ज्ञ असतो. त्याला त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असते आपल्या ज्ञानाचा वापर करूनच त्याने अनेक शिखरे गाठलेली असतात. नेतृत्वगुणाबाबत गफलत बहुतेक वेळा असे म्हणतात की नेतृत्व गुण जन्मताच अंगी असतात ते कुणालाही शिकवले जाऊन त्यांना नेता बनवता येत नाही. असेही म्हणतात की, नेतृत्व गुण शोधायचे झाल्यास लहान मुलांच्या खेळाकडे बघा. कुणीतरी एकजण इतर मुलांवर ओरडत असणार त्यांना सतत हे करा ते करा, असे सांगत असणार; परंतु याचा अर्थ त्याच्यातच नेतृत्व गुण आहे इतरांत नाही, असे मुळीच नाही आणि त्याच्या ओरडण्याला आपण नेतृत्वगुण म्हणायचे का?

नेतृत्व हा एक मानवगुण आहे. जो त्याला विकसित करील वापरील तो उत्कृष्ट नेता यशस्वी होतो. म्हणूनच विसाव्या शतकातील हिटलर महात्मा गांधी या दोन विपरित व्यक्ती आपल्या काळातील महान नेता होत्या.

संघटन कौशल्य नेतृत्व करणाऱ्यात लोकांना संघटित करून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे कौशल्य हवे.

 

) नियोजन करताना : बहुतेकदा असे होते की तुम्ही उत्कृष्ट नियोजन करता इतर लोक त्यात बारीक-सारीक चुका, त्रुटी शोधतात. त्यामुळे व्यत्यय येतो. तुमच्या विचारांवर एका प्रकारे नियंत्रण येते. तेव्हा या बारीक त्रुटी आपणच शोधून काढाव्यात दुरुस्त कराव्यात.

 

) बदलासाठी, बदलण्यासाठी तयारी ठेवा : परिवर्तन निसर्गाचा एक नियम आहे. जग क्षणाक्षणाला बदलत चालले आहे. कुठलीही गोष्ट, वस्तू माणसेसुद्धा एकसारखी राहत नाही. काल जे नवीन होते ते आज जुने झाले आहे. स्वतःमध्ये लवचिकता आणल्यास होणाऱ्या बदलात आपण समावून जाऊ शकता

 

) येणारे धोके ओळखा : आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गात कोणकोणते संभाव्य असंभाव्य धोके आहे, हे ओळखा त्या धोक्यांचे तुम्ही कशा प्रकारे निरसन कराल, याचा विचार करा.

 

 

 

) अतिउत्साहास आवर घाला : अतिउत्साह हा शांत नदीमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या भोवऱ्याप्रमाणे असतो. त्यामुळे कामे बिघडू शकतात. एक कुशल नेता आपल्या माणसांच्या अतिउत्साहास आवर घालून त्यांना शांत करतो.

 

) आपणाकडून चुका होतात हे ध्यानात ठेवा : माणूस कितीही मोठा असेल तरी चुका या होतातच; परंतु माणसाचा मोठेपणा तेव्हा दिसून येतो जेव्हा तो ती चूक लवकरात लवकर कबूल करून दुरुस्त करतो. आपणही चुका करू शकतो किंवा आपल्या हातूनदेखील चुका होतील हे लक्षात घेऊन तसे झाल्यास आपण आपल्या चुकांची कबुली त्वरित देऊन ती दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे. इतर लोक निश्चितच तुमच्या या वागण्याचे स्वागत करतील.

 

) चढाओढ करणे सोडा : इतर लोक किती सुखी आहे, श्रीमंत आहे, त्यांना कसलीच चिंता नाही. ते कमी मेहनत करून इतके यशस्वी कसे आहेत हे बघणे सोडून स्वतः स्वतःच्या उन्नतीकडे लक्ष द्या.

 

) नकार देताना, रद्द करताना वचने तोडताना : बहुतेकदा आपण एखादे काम करण्याचे ठरवतो. एखादे वचन देतो. इतरांसाठी काही नियोजित करून ठेवतो; परंतु काही केल्याने त्याची पूर्तता होऊ शकत नाही. इतर लोक यास वचनभंग विश्वासघात असेही मानतात. तेव्हा शक्यतो वचन देण्यापूर्वीच सारासार विचार करावा, कारण प्रथम नकार दिल्यावर इतर त्रास होत नाही जितका एकदा काही वचन देऊन ते पूर्ण केल्याने होतो.

 

) जबाबदारी : आपण आपल्या लोकांवरती नियंत्रण स्वतः ठेवा. त्यासाठी इतर एखाद्या व्यक्तीकरवी त्यांच्यावर नियंत्रण ठेवू नका. एवढ्या समूहावर एक व्यक्ती नेमून त्याद्वारे पुढील कामे करणे धोक्याचे आहे. संघटनेचा साचा तसा असेल तर वातावरण थोडे खेळीमेळीचे असू द्या. अधिकारांचा बागुलबुवा त्यांना सतत दिसेल, असे भासवू नका. तसेच एका समूहावर एखादी व्यक्ती असलीच तर त्याची महत्ताही कमी करू नका.

 

) आपण कोठेही असा परंतु काम मात्र सुरूच ठेवा : आपणाला वाटत असेल की एखादे काम तुम्ही फक्त तुम्हीच करू शकता. लक्षात ठेवा की परिस्थिती जर तुम्हाला ते काम करू देत नसेल तर इतरांची मदत घ्या. कोर्टात हजेरी लावण्याचीही आजकाल गरज भासत नाही. तेव्हा हे काम मीच केले पाहिजेत. माझ्याशिवाय ते जमणार नाही, असा अट्टहास धरू नका. आपण फिरतीवर असाल किंवा बाहेरगावी असाल तर आपले काम इतरांच्या मदतीने करून घ्या. ते काम हळूहळू का होईना सुरू ठेवा.

 

१०) इतरांनाही नेतृत्व करण्यास तयार करा : अनेकदा आपण बाहेर असल्यास, आपल्या कामाच्या ठिकाणी नसल्यास आपल्या माणसांना आपली गरज भासते, उणीव जाणवते. आपले काम तसेच पडून राहते. एक रिकामेपणा येतो. हे सर्व आपण आपली कामे स्वतः सतत केल्याने होते. आपली काही कामे इतरांना करण्यास शिकवा, म्हणजे जेव्हा आपण नसाल तर इतर लोक ती कामे करतील. इतरांवरही जबाबदारी टाकण्यास शिका. एक नेता नेहमी इतरांना नेतृत्व करण्यास प्रेरित करतो. त्यालाच खरा नेता म्हणता येईल.

नेतृत्व करणाराच्या जबाबदाऱ्या कार्य

 

जागरूकता :

 

1.    आपल्या समूहाची कामे कोणती आहे?

2.    ती आपण व्यवस्थितपणे त्यांच्यात विभागून दिली आहेत का?

3.    आपला समूह कसा आहे?

4.    त्याची एकंदरीत वागणूक कशी आहे?

5.    त्यांना सांगितलेले काम दिलेल्या सूचनांचे पालन ते करतात का?

6.    कशा प्रकारे?

7.    इत्यादीबाबत नेतृत्व करणारा जागरूकnअसतो.

 

समज :

 

त्यास चांगल्या प्रकारे समजते की कोणत्याही गोष्टी करताना त्याचे संपूर्ण ज्ञान आवश्यक आहे काम करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत त्याला समजली आहे का? ती पद्धत तो आपल्या समूहात रुजवू शकतो का?

 

कार्य :

 

) सूचनांची देवाण-घेवाण : उच्च स्तरावर सूचनांची देवाण-घेवाण करून त्या सूचनांवर नजर ठेवत कामे होतात का ते बघणे.

 

) नियोजन : समूहांची अल्पकालीन दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण होतात का हे बघणे. समूहांची उद्दिष्टे ठरवणे.

) तज्ज्ञता : समूहास अडचण आल्यास आपल्या ज्ञानाने त्यांना माहिती पुरवून समस्या सोडवणे.

) नियंत्रण : समूह त्यांच्या कार्यावर गतविधींवर पूर्ण नियंत्रण.

) शिक्षा पुरस्कार : समूहातील व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कृत करणे किंवा शिक्षा देणे हे ठरवणे.

) मध्यस्थी : आणीबाणीच्या वेळी एका मध्यस्थाप्रमाणे तंटा सोडवणे.

) विचारधारा रुजवणे : आपल्या तत्त्वांद्वारे, नीती मूल्यांद्वारे एक विचारधारा तयार करून ती आपल्या समूहात रुजवणे.

) वडीलधारी व्यक्तिमत्त्व : समूहास आपण मुलांसारखे नसून त्यांच्यासाठी एका पित्यासमान असणे. - आपण तयार आहात का? यशस्वी व्हायचे असेल तर या सूत्रांना नीट समजून घ्या. यापेक्षाही महत्त्वाचे आहे की तुम्ही कोणती परिस्थिती बदलू शकता कोणती तुम्हाला बदलता येणार नाही हे ओळखणे. परिस्थितीला बदलायचे तर स्वतःला बदला. स्वतःमध्ये बदल घडवणे म्हणजे सकारात्मक विवेकी विचारसरणी आचरणात आणणे. तुम्ही एखादे उद्दिष्ट मिळवले की, आनंदी होता तेव्हा तो आनंद चिरकाळ टिकवण्यासाठी अशी अनेक उद्दिष्टे मिळवत राहा. काळागणिक प्रत्येक माणसात बदल होतो. तुम्ही जर स्वतःला बदलले नाही तर तुमच्यातील शक्ती लुप्त होतील.

 

आयुष्यात सामोऱ्या येणाऱ्या बदलांना, विपरीत परिस्थितीस सामोरे जाताना भिऊ नका. तुम्ही घाबरले नाही तर काय होऊ शकते याचा विचार करा. बारीकरीत्या होणाऱ्या बदलांची जाणीव असू द्या, तसे केल्यास मोठ्याने होणाऱ्या बदलांच्या आश्चर्यापासून तुम्ही स्वतःला वाचवाल.

 

सुखामध्ये हुरळून जाऊ नका दुःख झाल्यास रडत बसू नका. आनंद दुःख या भावनांना दडपूही नका. सरत्या वेळेप्रमाणे त्या दोहोंची तीव्रता कमी होते, ती तशी होऊ द्या. तुम्ही मात्र आपल्या उद्दिष्टांकडे आपली वाटचाल सुरू ठेवा.

 

माणसाच्या भीती उत्सुकतेचे सर्वात मोठे कारण आहे. त्याचा स्वतःसाठीचा प्रश्न 'माझे काय होईल?' भविष्यात चांगले होणार किंवा वाईट हे तुम्हाला माहीत नाही, कुणालाही माहीत नाही. जर आपण आजच्या दिवसात या क्षणात काही सकारात्मक केले तर याचा परिणाम उद्यावर निश्चितच होईल. तेव्हा सर्वप्रथम मनातील भिती पळवून कोंडलेल्या विचारांना स्वातंत्र्य द्या. उद्दिष्टपूर्तीपूर्वी तुम्ही कल्पना करा की ते उद्दिष्ट तुम्ही साध्य केले आहे. या कल्पनेने तुम्हाला निश्चितच एक अव्यक्त प्रोत्साहन मिळेल. जुन्या कल्पनांना चिकटून राहाल तर मागे खेचल्या जाण्याची शक्यता आहे. होणाऱ्या बदलातून आनंद मिळवा (पुन्हा पुन्हा) बदलत राहण्याची तयारी ठेवा.

 

तुम्हाला जर माहीत असेल की तुम्हाला काय करायचे आहे. कोठे जायचे आहे, हे जग तुम्हाला ती वाट निर्माण करून देईल.

 

लक्षात ठेवा :

 

1.    नेतृत्व करणे म्हणजे इतरांकडून आपली कामे करवून घेणे नव्हे, तर आपण इतरांसाठी आपल्यासाठी कामे करणे होय.

2.    ज्यामध्ये शांत चित्त, विचारांची स्पष्टता, आत्मविश्वास, कटिबद्धता कल्पनाशीलता असते, तो उत्कृष्टपणे नेतृत्व करू शकतो.

3.    नेतृत्व करणारा झालेल्या चुकांची जबाबदारी एकटा स्वीकारतो झालेल्या चांगल्या गोष्टींसाठी इतरांना भागीदार करतो.

4.    नेतृत्व करणाऱ्यात सकारात्मक विचारसरणी, इतरांसाठी वेळ, चांगले वाईट ठरवण्याची ताकद आपल्या जबाबदारीची जाणीव आढळते.

5.    नेतृत्व करणारा त्या गवताप्रमाणे लवचिक असतो, जे वादळात नमते वादळ गेल्यावर पुन्हा ताठरतेने उभे राहते. जे झाडाप्रमाणे वादळातही ताठरता दाखवतात, ते मुळापासून उखडले जातात.

6.    इतरांची चूक झाल्यास ती शक्य तितक्या नम्रतेने त्यांच्या निदर्शनास आणावी इतरांच्या चांगल्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.

 

 

कार्यबिंदू

 

1.    तुम्ही पाहात असलेल्या एखाद्या नेतृत्वशील व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व गुण कोणते?

2.    याची यादी तयार करा.

3.    तुमच्यात आढळणाऱ्या नेतृत्व गुणांची यादी तयार करा.

4.    तुम्ही नेतृत्व करू शकता का?

5.    कशाप्रकारे?

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments