यशप्राप्तीसाठी सकारात्मक विचार

 

यशप्राप्तीसाठी सकारात्मक विचार

यशप्राप्तीसाठी सकारात्मक विचार

Photo by cottonbro from Pexels

यशस्वी तो होतो जो शिखर गाठण्याची स्वप्ने पाहतो. त्या शिखरावर तो पोहोचणारच असा त्याचा ठाम विश्वास असतो. यश मिळवायचे असेल तर नियोजन वेळेच्या व्यवस्थापनाबरोबर सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. 'हे आपल्याकडून होणार नाही' यापेक्षा 'आपण हे कशाप्रकारे करू शकतो' असा मानस ठेवा. सकारात्मक विचार कसा करावा त्यासाठी आपण आपली विचारसरणी कशी असते ते बघूया.

 

मनातून सतत विचार उत्पन्न होत राहतात. मानसिक विज्ञानाने त्याचे विभाजन चार प्रमुख प्रकारात केलेले आहे. सकारात्मक विचार करताना मनात आलेल्या प्रत्येक विचारावर कल्पनेवर विचार करण्यास शिका.

 

·         स्वतःच स्वतःला प्रश्न विचारा, हा विचार उपयोगी आहे की नाही?

·         यापासून मला होणार फायदे कोणते? तोटे कोणते?

·         हा विचार सकारात्मक आहे का नकारात्मक?

·         जर नकारात्मक असेल तरी यापासून मला काय शिकण्यास मिळते?

 

माणसाच्या मनाची शक्ती खूप मोठी आहे. म्हणूनच प्रत्येक काम करताना, क्रिया करताना ते आपल्याला सतत सांगत असते, 'तू हे कर, यात फायदा आहे, हे नको करू, नुकसान होईल.' स्वतःशी अशा प्रकारे संवाद साधल्यास निश्चितच फायदा होतो.

 

1.    तुमच्यात दडलेल्या सुप्त मनातील शक्तीची तुम्हाला प्रचीती येईल. लोकांशी तुमचा व्यवहार बदलेल. छोट्या छोट्या गोष्टी, कामे करताना अडचण जाणवणार नाही.

 

2.    आयुष्यातील होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यास तुम्ही घाबरणार नाही. अचानक उभ्या राहणाऱ्या परिस्थितीस तुम्ही तोंड देऊ शकाल.

 

3.    इतरांकडे जितका वेळ आहे, तितकाच तुमच्याकडेही आहे. जेव्हा इतर लोक, काहींची कुवत तुमच्यापेक्षा कमीही असेल, ते यशस्वी होऊ शकतात, तेव्हा तुम्हीही यशस्वी होऊ शकता. प्रत्येक क्षणाचे रूपांतर सकारात्मक गोष्टीत कसे होईल याकडे पाहा.

 

4.    ज्या विचाराने आपले इतरांचे चांगले होते, ते सकारात्मक विचार. सकारात्मक विचाराने निर्माणाचे कार्य होते. नवनवीन कल्पना सुचतात. सकारात्मक विचार केल्याने आपली योग्य शक्ती, योग्य गुण योग्य वेळी वापरता येतो. या विचारामुळे माणूस चांगले कर्म करतो.

नकारात्मक विचार :

नकारार्थी ज्यामुळे आपले दुसऱ्यांचे नुकसान होत असेल अशा विचारांना 'नकारात्मक' म्हणतात. नकारात्मक विचारामुळे माणूस चिंता करत बसतो, ज्याचे रूपांतर तणावात होते.

 

गरजू विचार :

ज्या विचारांमुळे आपली दिनचर्या, जीवन हे चालत राहते आपणास आवश्यक असतात अशा विचारांना गरजू विचार म्हणतात.

 

उदा.

गावाला जावे की नाही?

शिक्षण कोणते करावे?  .

 

व्यर्थ विचार :

 

    आपल्याशी कसलाही संबंध नसलेला आपल्यावर कुठलाह परिणाम करणाऱ्या विचारांना व्यर्थ विचार म्हणतात. मानसिक विज्ञानान असा अदाज काढला आहे की सर्वसाधारण माणूस हा ८० टक्के व्यर्थ विचार कर असतो. मग व्यर्थ गप्पाटप्पा हा त्यातलाच भाग.

 

सकारात्मक विचार कसा कराल?

 

नैराश्य टाळा :

 

मागे जे झाले ते विसरा. समोर काय आहे याबाबतही निराशा टाळा. आशावादी बना. जीवनात सर्वच गोष्टी असाध्य नसतात. तुम्हाला स्वतःला दोष देणे टाळा. तुमच्या दुर्गुणांपेक्षा सद्गुणांना महत्त्व द्या. नवीन गोष्टींना सामोरे जाताना घाबरू नका. अडचण आल्यास ती जाणवू देऊ नका. ज्ञान माहितीच्या प्रकाशाने अंधार दूर करा. झालेल्या चुकांमुळे स्वतःवर राग राग करणे सोडा. इतरांनाही दोष देऊ नका. टीका झाल्यास खचून जाऊ नका. चुका सुधारण्यावर भर द्या. स्वतःच्या दुसऱ्याच्या भावनांना उचित न्याय द्या.

 

 

वस्तुस्थिती ओळखा :

 

जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वतःला करायचे आहे. नशिबावर अवलंबून बसू नका दुसऱ्यांकडून ते होईल अशी अपेक्षा करू नका.

 

इच्छाशक्ती वाढवा :

1.    आपल्या आसपासच्या वातावरणाबाबत सतर्क असा. संपूर्ण ज्ञान अर्जित करा, जेणेकरून अडचणींवर मात करण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल. 'हो, मी हे करू शकतो!' असे तुम्ही केव्हा म्हणाल?

 

2.    त्याबाबत संपूर्ण माहिती तुमच्यापाशी असेल तेव्हाच ना! तुमच्या ध्येयावर प्रेम करा, इच्छाशक्ती निर्माण होईल.

 

3.    स्वतःशी सकारात्मक संवाद साधा, तुमचे विचार ओळखा, त्यामुळे होणारी कर्मे कशी आहेत, ती बघा. “मी हे करू शकतो', 'मी हे करणारच', 'मलाच हे करावे लागेल', 'माझ्याशिवाय दुसरे कोण करणार' असा मानस ठेवा.

 

4.    आपण काय आहात आपल्याला काय व्हायचे आहे हे ओळखा. त्यातील अंतर बघा. तुमचे विचार तुम्हाला जे बनायचे आहे ते होऊ देतील का?

 

5.    उद्दिष्टे, ध्येय साध्य करण्याची जिद्द मनात निर्माण करा. ज्ञान इच्छा हे यशासाठी जिद्दीशिवाय अपूर्ण आहे. शिखर गाठण्याचा, ध्येय गाठण्याचा मानसिक हट्ट निर्माण करा.

 

6.    का करावे' यापेक्षाकसे करावे' याचा विचार करावा. उद्दिष्ट गाठण्याच्या जिद्दीमुळे तुम्ही नवनवीन संकल्पना निर्माण कराल, म्हणतात ना 'गरज ही शोधाची जननी असते.' ध्येय गाठण्याची जिद्द तुम्हाला अडचणींवर मात करण्याची शक्ती देईल.

 

7.    यशाच्या पथावर तुमच्या पदरात काही वेळा अपयशही पडेल, त्यालाच मैलाचा दगड मानून पुढे चला. मागे झालेल्या चुका पुन्हा करू नका. स्वतःचे १०० टक्के हे हातातील कामात देण्यास शिका.

 

 

जबाबदारी वाढवा :

 

    एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण केले तर तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. नवीन जबाबदारीस तयार राहा. रिकामे बसण्यापेक्षा हळूहळू पुढे चालत राहणे बरे. तुम्ही कमजोर आहात असा विचार करणे सर्वात मोठे पाप आहे. सकारात्मक विचारामुळे उचित निर्णय घेण्यास मदत मिळते.

 

सकारात्मक व्यवहार वाढवण्यासाठी सकारात्मक गोष्टी शोधा : मनाविरुद्ध जर एखादी घटना घडली. काही वाईट झाले, अनर्थ झाला, आपण चुकीच्या माणसांशी व्यवहार ठेवत आहोत असे निदर्शनास आले तरीसुद्धा त्यातून आपणाला सकारात्मक काय मिळेल याकडे लक्ष द्यावे. नाण्याला दोन बाजू असतात. चांगली किंवा वाईट या जगात कोणतीही वस्तू वा गोष्ट नाही. परिस्थिती, माणसाचे विचार त्याची उपयुक्तता त्या गोष्टीस चांगली किंवा वाईट ठरवतात. वाल्या कोळी जर वाईटच राहिला असता तर त्याचा वाल्मीकी होऊन रामायणाची रचना झालीच नसती...

माणसाने नेहमी त्याच्या सद्गुणांकडे पाहावे.

 

त्याच्या क्षमतेकडे कल्पकतेकडे पाहावे त्याला चांगल्या गोष्टी करण्यास, सकारात्मक गोष्टी घडवण्यास प्रोत्साहन द्यावे. सोनं शोधताना माती बाहेर काढावीच लागते, तेव्हा माणसांच्या गुणदोषांकडे बघता त्याच्यातील चांगल्या गुणांना वाव देऊन आपण काही सार्थक निर्माण करू शकतो का? हे बघावे.

 

नकारार्थी, वायफळ गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा :

 

शेखर शर्मा सतीश राय या दोघांनी शेअर बाजारातून चार-पाच नामांकित कंपनीचे शेअर्स खरेदी केले. शेखरला वाटले की गुंतवणूक दीर्घकाळ ठेवली की फायदा होईल. काही दिवसानंतर सतीश शेखरला सांगू लागला की बाजाराचे वातावरण लवकरच खराब होणार आहे, तेव्हा त्याने त्याचे अर्धे शेअर्स विकले. शेखरने प्रथम या वृत्ताकडे कानाडोळा केला; परंतु सतीशचे उपदेशाचे डोस निरंतर सुरूच होते. बाजार कोसळणार या वृत्तावर तो ठाम होता. सतीशने स्वतःचे शेअर्स पूर्णपणे विकले, त्याला थोडा तोटाही झाला होता. हे बघून शेखरच्या मनात शेअर्सच्या बाबत चिंता निर्माण झाली. त्याने इतर विक्रेत्यांना विचारले तेव्हा त्यांना तोटा झाल्याचे समजले. मग शेखरने तडक दोन महिन्यांच्या आत आपले खरेदी केलेले सर्व शेअर्स विकले. त्यालाही त्यावेळी तोटा झाला.

 

परंतु आणखी तीन महिन्यांनी जेव्हा त्या दोघांनी त्याच शेअर्सचा बाजारभाव पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्य झाले. त्या शेअर्सचे भाव दुपटीने वाढले होते. शेखर सतत सतीशचे नकारार्थी संकेत ऐकत होता. त्यावर त्याने शेअर विक्रेत्यास झालेल्या तोट्याचे ऐकून आपला निर्णय घेतला. एकंदरीत त्याने सकारात्मक काही एक शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याच्या प्रयत्नाने त्याची नकारार्थी भावना बळावत गेली परिणामही तोट्यात झाला. त्याने तर कंपनीची स्थिती पाहून इतर आर्थिक बाबी जसे कंपनीचे मागील दोन वर्षाचे प्रदर्शन बघून विचार केला असता तर याचा फायदा त्याला निश्चितच झाला असता; परंतु त्याने स्वतःला नकारार्थी वातावरणातून बाहेर काढलेच नाही.

 

आपणही बऱ्याचदा शेखरसारखे स्वतःला नकारार्थी वातावरणात ठेवतो. आपण स्वतः मग आपली ती भावना मोठी होऊ देतो चुकीचे निर्णय घेत स्वतःचे नुकसान करत राहतो. या सर्वापासून वाचण्यास एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वतः अशा वातावरणापासून फारकत घ्या. सत्याची पडताळणी करा, सारासार विचार करा मगच निर्णय घ्या.

 

तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापासून दूर नेणारी बरीच मंडळी तुमच्या अवतीभवती असू शकतात. तेव्हा शक्यतो सकारात्मक वर्तुळात वावरण्याचा प्रयत्न करा. तसे होत नसेल तर आपल्या प्रयत्नाने स्वतःचे एक सकारात्मक वर्तुळ तयार करा. नकारार्थी विचारास पूरक असलेले साहित्य वाचू नका, नीतिमूल्यांची अवहेलना होईल, अशा साहित्याचा, चित्रपटांचा बहिष्कार करा. ज्यात स्त्रीचे शोषण आहे. मानवी हक्कांची पायमल्ली होते, अशा विचारांचा बहिष्कार करा.

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास स्वतः दररोज मनाचा एक व्यायाम करा. झोपेतून उठल्यावर देवाचे आभार माना आजचा दिवस चांगला जावो अशी इच्छा ठेवा. आजचा दिवस चांगला आहे. सुंदर आहे माझ्यासाठी फायद्याचा आहे, अशा विचारांनी आपला दिनक्रम सुरू करा.

 

 

होकारार्थी व्यवहार

 

आपला इतरांशी व्यवहार इतरांचा आपल्याशी व्यवहार याचे मुळात चार प्रकार असतात.

 

निर्जीव व्यवहार : यामध्ये माणूस व्यवहार करणे टाळत असतो. 'जाऊ द्या काय होणार आहे?'

 

असे त्याचे विचार असतात. त्याची अपेक्षा अशी असते की लोकांनी त्याला समजून घेत, त्याला काय हवे आहे याची दखल घेत त्याच्याशी संवाद साधावा व्यवहार करावा. त्याचा पवित्रा हा एकदम बचावात्मक असतो बोलणे संकोचात्मक असते. बहुतेकदा तो स्वतःलाच दोष देत असतो. काही वेळा कारणे देताना जरूरीपेक्षा जास्त कारणे देतो. त्याला नेहमी मार्गदर्शनाची गरज असते. अशी व्यक्ती इतरांची सहानुभूती मिळवून आपले काम करवून घेत

असते.


आक्रमक व्यवहार :

 

हा व्यवहार करणारी माणसे नेहमी आपण कसे जिंकू याचाच विचार करत असतात. या व्यक्तींना दुसऱ्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे माहीत असतात. सरळसोटपणे आपले विचार मांडून आपल्या गरजा इतरांकडून पूर्ण करून घेतात. इतरांचा क्वचितच विचार करतात. इतरांच्या गरजा माहिती असून त्याचा वापर आपल्या इच्छापूर्तीसाठी करतात. इतरांना दोष देण्यात अशा व्यक्ती अग्रेसर असतात. मध्येच आपले विचार मांडून संभाषणात व्यत्यय निर्माण करतात. आपल्या याचना आदेशाप्रमाणे वापरतात.

 

संकोची व्यवहार :

 

असा व्यवहार करणारी माणसे कधी कधी निर्जीव असतात, तर कधी कधी एकदम आक्रमक भूमिका घेतात. धोका पत्करण्याची तयारी नसते. बोलताना अगदी तोलून मापून बोलतात. शक्यतो कमीच बोलतात. कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास दाखवत नाही तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपले विचार मांडण्यात पटाईत असतात.


सकारात्मक-होकारार्थी व्यवहार :

 

1.    अशी व्यक्ती स्वतःच्या हक्काबाबत जागरूक असते ती मिळवण्यास सतत तयार असते. त्याला माहीत असते की, आपल्या मर्यादा काय आहेत इतरांचे हक्क काय आहेत, इतरांच्या मनात काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, हे समजून घेतात. स्वतः मात्र खुल्या विचाराच, मितभाषी जास्तीत जास्त इतरांचे ऐकणारे असतात. इतर व्यक्तीस योग्य ता आदर देण्यात, तडजोड करण्यात, आपले विचार स्पष्टपणे मांडण्यात पटाईत असतात.

 

2.    आपला व्यवहार सकारात्मक होकारार्थी ठेवल्याने चांगले निकाल आपल्या हाती येण्यास सुरुवात होते. लोक तुम्हाला मान देतात. तुमचा आत्मसन्मान वाढतो.

 

3.    इतरांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या भावना जाणून घेण्यास शिका. बोलताना आपल्या भावनांचा आपल्या वाणीवर कमीत कमी परिणाम दिसू द्या. भाषा आदरयुक्त असू द्या तुम्ही इतरांना समजू शकता याची जाणीव इतरांना होऊ द्या.

 

4.    भावनांचे परिवर्तन : व्यवहार करणे बऱ्याचदा माणसाच्या हातात असतेही नसतेही. याला कारण आहे आपल्या भावना. परिस्थितीमुळे भावना निर्माण होतात भावनांमुळे विचारचक्रास गती येते. यातूनच निर्णय घेण्याची प्रक्रिया होते किंवा कधी कधी निर्णय घेताही हातून कामे होतात.

 

5.    आपण आपल्या भावना ज्या वेळी ओळखतो तेव्हा आपणाला समजते की, अशा भावनेमुळे आपल्याला फायदा होईल की नुकसान होईल. त्यामुळे आपण तेव्हा आपल्या भावनांचा सकारात्मक वापर केला तर परिस्थिती बदलू शकते. आपल्या हातून घडणारी क्रिया बदलू शकते.

 

6.    यासाठी परिस्थिती समोर आल्यास किंवा कुठल्याही परिस्थितीत आपल्या भावना नेमक्या कोणत्या आहेत हे ओळखावे. आपला स्वतःशी होणारा संवाद बदलावा. तो सकारात्मक होकारार्थी कसा होईल याकडे लक्ष द्यावे. माझ्याच बाबतीत असे का?

 

7.    म्हणण्यापेक्षा, “मी ही परिस्थिती कशाप्रकारे बदलू?'

 

8.    याचा विचार करा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपले विचार स्पष्टपणे मांडा, इतरांना आपल्या व्यवहारातून होणारे फायदे पटवून द्या.

 

 

लक्षात ठेवा :

 

1.    'मी काय करू' यापेक्षा 'मी हे कसे करू' यावर लक्ष द्या.

2.    कोणतीही परिस्थिती चांगली अथवा वाईट जास्त काळ नसते, याचे भान ठवा. या दोन्ही परिस्थितीतून आपण जास्तीत जास्त फायदा कोणता कशा प्रकारे करू शकतो हे बघा.

3.    आळस झटका. आळस केल्याने कामे प्रलंबित होतात त्यामुळे नकारात्मक विचारसरणी वाढते.

4.    इतरांकडून मदत घेण्यास संकोच करू नका. आपण स्वतः एक काल्पनिक भिंत उभारून स्वतःशी एक गोड गैरसमज केलेला असतो की, 'मी एकटा हे करा शकतो किंवा मला कुणाची गरज नाही.' इतरांची मदत घेतल्यावर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे तुमचे सामाजिक संबंध सुमधुर होतात.

5.    सतत काहीतरी शिकत राहा. आपल्या बुद्धीला, विचाराला पूरक खाद्य देत राहा. नवनवीन माहिती, कल्पनाशीलता हेच ते खाद्य. जसे एक लाकूडतोड्या आपल्या कुहाडीला नेहमी धारदार ठेवतो, तसेच आपले शस्त्र, आपली बुद्धी तीक्ष्ण ठेवा.

6.    रिकामे डोके सैतानाचे घर असते, तेव्हा स्वतःला कुठल्या कुठल्या चांगल्या, सकारात्मक कामामध्ये गुंतवा.

7.    आपण जी गोष्ट करत आहात, ती प्रेमाने मनापासून करा.

 

 

कार्यबिंदू

 

·         आपण निराश आहात का? कशामुळे?

·         आपले नैराश्य दूर होऊ शकते का?

·         कशामुळे?

·         कशाप्रकारे?

·         आपल्या मनात कोणते विचार चालू असतात?

·         आपण सकारात्मक विचार करतो का? किती?

·         आपण स्वतःशी संवाद साधता का?

·         आपल्या विचारांनी, आपले ध्येय आपणास मिळेल का?

·         ध्येय गाठण्याची आपली इच्छा किती प्रबळ आहे?

·         जिद्द मनाशी बाळगली का?

 

Post a Comment

0 Comments